मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आश्रमशाळा लोणजेसाठी मा.शिक्षणमहर्षी नानासाहेब य.ना. चव्हाण यांचे योगदन,(श्री.सोनार मुख्याध्यापक हरिभाऊ चव्हाण प्रा.आश्रमशाळा लोणजे ता.चाळीसगाव(जळगाव))

  लोणजे हे गाव चाळीसगाव शहरापासून १५ कि . मी .  , दूरवर डोंगर पायथ्याशी व सर्व सुखसोयी पासून वंचीत होते . यात ९ ५ टक्के मागासवर्गीय बंजारा समाजाची वस्ती . दारिद्रय , अंधश्रद्धा व जुन्या चालीरिती यांनी अंधकारमय झालेल्या या वस्तीस खानदेशचे गांधी हरिभाऊ चव्हाण या महान व्यक्तिच्या रुपाने प्रकाश मिळाला . महात्मा गांधी यांच्या हाकेनुसार खेड्यात जा ! सेवा करा ! या साठी हरिभाऊ चव्हाण स्वत : या ठिकाणी राहून येथील गोरगरीबांची सेवा करीत करीत सामाजिक  कार्याकडे वळले . लहान मोठ्यांना शिक्षणाचे धडे देऊ लागलेत व कोणताही मोबदला न घेता रात्रंदिवस हा जनता जगन्नाथाचा रथ अनेक अनुयायींच्या मदतीने ओढू लागलेत .         त्यांच्यानंतर हे सामाजिक कार्याचे व्रत या गावाचे मा . आबासाहेब श्री . हि . भि . चव्हाण यांच्या रुपाने जोपासले गेले . आबांच्या रुपाने एक मार्गदर्शक हिरा लाभला . त्यांनी अनेक सहकारी बांधवांच्या मदतीने आपल्या समाज बांधवांना अंधश्रद्धा , शिक्षण , सामाजिक परिवर्तन , सुधारीत शेती , आदर्श ग्राम संकल्पना या अनेक बाबतीत प्रयत्नाची पराकाष्टा करून योग्य असे अहोरात्र...

तेथे कर माझे जुळती(श्री.नामदेव ओंकार पवार,चाळीसगाव)

  गु रुर्ब्रह्मा , गुरुर्विष्णु , गुरुर्देवो महेश्वर :  गुरुर्साक्षात् परब्रमह्य , तस्मै श्री गुरवे नमः ।।    आदरणीय श्री . नानासाहेबांबद्दल माझ्या सारख्या पामराने काही लिहिणे , म्हणजे साक्षात सुर्याला दीपक दाखविण्या सारखे होईल . कमरेला धोतर , अंगात खादीचा पांढरा गुरुशर्ट व डोक्यावर गांधी टोपी घातलेले नाना बघितले तर पूज्य सानेगुरुजी अगर  .विनोबाजी भावे यांची आठवण झाली नाही , तरच नवल ! धार्मिकता व वारकरी संप्रदायाचे बाळकडू बाळबोध वयातच नानांना मिळाले ते त्यांच्या घरातूनच . एक रुपया महिन्याने टपाल वाटप करुन प्राथमिक शिक्षण घेणारे नाना , बडोदा येथील समाजी मराठा वसतीगृहात कामकाजकरुन अर्धनादारीची सवलत मिळविणारे नाना , पुण्यात लॉ - कॉलेजच्या वसतीगृहाच्या खानावळीत परिश्रम करुन दोनवेळचे जेवण मिळविणारे नाना , न कळतच जिद्दीचे व स्वावलंबनाचे धडे शिकवून जातात , अशाप्रकारे विद्यार्थी दशेतच हालअपेष्टा सोसलेल्या नानांनी खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत गैरसोयी व गरजांचे ' मर्म ' जाणून चाळीसगाव सारख्या तालुक्याच्या व मध्यवर्ती ठिकाणी प्रथमत: वसतीगृह सु...

स्काऊट गाईड चळवळीचे स्फूर्ती स्थान नानासाहेब य.ना.चव्हाण(श्री.बी.डी.वाबळे ,सहाय्यक जिल्हा कमिशनर,जळगाव भारत स्काऊट आणि गाईड जि.जळगाव)

  महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड संस्थेच्या  कौन्सिलर पदी माझी निवड झाली असता , माननीय  नानासाहेबांनी एके दिवशी खास मला बोलावून माझी मुलाखत घेतली . ह्या मुलाखतीत स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास , ह्या शिक्षणाची गरज , उद्दिष्ट्ये , महत्त्व जाणून घेतले . ह्या संबंधित असलेली पुस्तके माझे जवळून मागून जिज्ञासापूर्वक वाचलीत . राष्ट्राला , समाजाला आदर्श , सुसंस्कृत , शिस्तबद्ध , निष्ठावान नागरिक व नेतृत्व देणारी ही चळवळ अतिशय मोलाची आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले . काळाची गरज विचारात घेता राज्यातही चळवळ उत्तम प्रकारे कशी राबविली जाईल असे प्रयत्न करा , असे त्यांनी आवाहन केले .   स्वावलंबन व श्रमदान यावर नानासाहेबांची मोलाची श्रद्धा . संस्थेच्या शांखावरील स्काऊट गाईडचे मेळावे व कॅम्पमध्ये नानासाहेब श्रमदानात व वृक्षारोपणात सातत्याने सहभागी असतात . १ ९ ८४ साली महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड या संस्थेने चाळीसगाव येथे ५ दिवसांचा चार जिल्ह्यांचा नासिक विभागीय मेळावा आयोजीत केला होता.मेळाव्याचे उद् -घाटक     नानासाहेब य.ना. चव्हाणच होते.सदर मेळाव्यात तीन हजार मुला...

मा.श्री.रा.रा.यशवंतराव उर्फ नानासाहेब चव्हाण अमृत महोत्सव(डाॅ.श्यामकांत देव,चाळीसगाव)

  मी चाळीसगावांत चाळीस वर्षांपूवी , जेव्हा प्रथम पाऊल ठेवले तेव्हा दोन प्रमुख संस्थांची मला माहिती  देण्यात आली . एक म्हणजे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी व दुसरी म्हणजे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ , पहिल्या संस्थेचे प्रमुख होते मा . श्री . दादासाहेब पाटसकर , त्यांचा व माझा परिचय झाला होता . त्याकाळी त्यांचे राजकारणात नाव गाजत होते .       दुसऱ्या संस्थेचे प्रमुख होते श्री . मा . यशवंतराव उर्फ नानासाहेब चव्हाण , त्यांचेही नाव अनेकांच्या बोलण्यात नेहमी  यावयाचे . परंतु त्यांचा व माझा अजून परिचय झालेला नव्हता . श्री . नानासाहेबांनी लहान लहान खेड्यातून शाळा काढलेल्या आहेत . मुलांमध्ये - चाळीसगाव तालुक्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून ते प्रयत्न करत आहेत . मागासलेल्या व गरीब मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांना फार कळकळ आहे . अशा मुलांना चाळीसगावात राहता यावे म्हणून त्यांनी  एक वसतीगृह पण सुरु केले आहे . अशा प्रकारची विविध माहिती मला नेहमी मिळत असे . त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य डोळ्यापुढे ठेवून ते कार्यरत आहेत . हे माझ्या लक्षात आले . ह...

धैर्याचा महामेरू (प्रा.म.सु.खैरनार,चाळीसगाव)

  रामजणगावच्या गढी शेजारी माती - शेणानं सारवलेल्या भिंती असलेलं अत्यंत स्वच्छ , चौसोपी , प्रशस्त घर , ओसरीच्या खुंटीवर टांगलेले टाळ , पाटावर ठेवलेली ज्ञानेश्वरी व बाजूला असलेली वीणा . डोईवर भरदार पागोटे , प्रसन्न चेहरा , निरागस डोळे , झुबकेदार मिशांतून खुललेली पारमार्थिक चर्चा . , ज्ञानदेव , तुकारामांच्या ओवी - अभंगातून शेत - मळयाचे भान विसरलेले दादा आणि आल्या - गेलेल्यांची आस्थेने वास्त - पुस्त करुन त्यांच्या आतिथ्यात कमी पडू नये म्हणून स्वत : ला पुरते विसरलेल्या नानांच्या मातोश्री . ' प्रपंची असावे । असोनि नसावे । ' अशा वारकरी कुटुंबातून नानांची जडण - घडण झाली . सावकारी , जमीनदारी गाव . दादा आणि आजींनी स्वत : तालेवार नसूनही आल्या - गेलेल्यांची निकङ पुरी करावी , भाकरीतला घास - तुकडा देऊन भुकेल्यांची भूक भागवावी . प्रेमानं विचारपूस करावी . देता येईल तेवढं देत रहावं , लहान - मोठयांचं कोड कौतुक करावं , मायेच्या चार शद्वांनी गावातील सायऱ्यांवर , कारु - नारूंवर , बलुतेदारांवर , सालदारांवर , त्यांच्या लेकी - बाळींवर , पै - पाहुण्यांवर प्रेमाचा वर्षाव करावा असं हे मोठया मनाचं . दिलदा...

मी पाहीलेले नानासाहेब(प्रा.एस.आर.जाधव,भौतीकशास्त्र विभाग प्रमुख,राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव)

  आदरणीय शिक्षण महर्षि कर्मवीर नानासाहेब य  ना . चव्हाण यांनी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात  पदार्पण केले त्या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सव विधायक   कार्यक्रम , शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून आयोजित करण्यात  येत आहे व येणाऱ्या नविन पिढीला त्यांचा एक आदर्श डोळयापुढे  ठेवून वाटचाल करता यावी म्हणून त्या निमित्ताने स्मरणिकेचे प्रकाशन  होत आहे . याबद्दल या संस्थेचा माजी विद्यार्थी व कर्मचारी म्हणून  अतिशय समाधान होत आहे ,       ग्रामीण भागातील गरीब , दलित व आर्थिक परिस्थितीने  खचलेला बहुजन समाजातील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नानासाहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे श्रम , मेहनत घेऊन आपल्या मार्गदर्शनाखाली   रा.स.शि.प्र.मंडळ या संस्थेच्या चाळीसगांव , भडगांव , पाचोरा या तीन तालुक्यात सुमारे ४६ शाखा सुरू केल्या . त्यात बालवाडीपासून  तर थेट संगणक , इलेक्ट्रॉनिक्स व विज्ञान ही उच्च शिक्षणाची गंगोत्री  खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात रुजविली व एक आदर्श संस्था म्हणून  नावलौकिक मिळविला आहे . विद्यादानाचे पवित्र...

मा.नानासाहेब य.ना.चव्हाण:अमृतमहोत्सवी चिंतन(प्रा.डाॅ.सौ.छा.द.निकम,मराठी विभाग प्रमुख राष्ट्रीय महाविद्यालय,चाळीसगाव)

  जीवनाचा  हे क्षणभंगूर आहे ' हे शाश्वत सत्य गौतम बुद्धाने शोधून काढले .   पण या क्षणभंगूर जीवनाचा सदुपयोग झाला तरच या जीवनाला महत्व प्राप्त होऊ शकते. केला . ते गौरविले जाऊ शकते. या गौरवाला पात्र ठरलेले आमचे मा . नानासाहेब य . ना . चव्हाण हे एक व्यक्तिमत्त्व , मा . नानासाहेबांच्या वयाला आज ७५ वर्ष होत आहेत . त्यांच्या जीवनातील एकेक क्षण त्यांनी सत्कारणी लावला आहे . त्यांच्या या घोर तपश्चर्येतूनच आज भडगाव , पाचोरा , चाळीसगाव तालुके शिक्षणाच्या प्रकाशात उजळून निघाले आहेत . ' शिक्षण ' हे एक सर्वश्रेष्ठ ध्येय त्यांच्या नजरेसमोर होते आणि हे ध्येय गाठण्यासाठी नानासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य या शिक्षण कार्यात समर्पित केले . राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा  अधिकाधिक विकास व्हावा हे जणू त्यांचे ब्रीदच होते . विकासकार्यात  ते अविरत कार्यरत आहेत . मा . नानासाहेब म्हणजे राष्ट्रीय शिक्षण  संस्था आणि राष्ट्रीय शिक्षणसंस्था म्हणजे नानासाहेब असे जणु एक  समीकरणच होऊन गेले आहे . मा . नानासाहेबांनी सामाजिक  बांधिलकी मानून स्वत : ला या पवित्र कार्यात वाहून घेतले आहे ....

'यशवंतराव नाना चव्हाण शिक्शणातील एक अखंड तेवती ज्योत'(प्रा.वसंत चव्हाण,संपादक साप्त.शब्दशक्ती,जळगाव)'

  आज यशवंतराव नानांच्या व्रतस्थ जीवनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत . त्यातील ४५ वर्षे अगदी उमेदीच्या काळापासून ते आजतागायत बहुजनांच्या जीवनातील अंधार हा शिक्षणानेच दूर होवू शकेल हया श्रध्देपोटी खेडयापाडयात ज्ञानाची गंगा पोहचवण्याचे अविरत कार्य करणाऱ्या यशवंतराव नाना चव्हाणांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या चरणावर आमुचा माथा !     मी हिमालय तर अद्याप पाहिला नाही पण त्याची उंची गाठणारे माझ्या सार्वजनिक जीवनात जे थोडेफार लोक आलेत त्यापैकी एक श्री . य.ना. तथा नानासाहेब चव्हाण हे आहेत . आम्ही लहान असतांना राष्ट्रसेवादलाच्या शाखेवर जायचो . साने गुरूजींच्या गाण्यांची पारायणे करता करता गुरूजींचा फोटो जो घरात लावलेला होता त्याकडे निरखून पाहता पाहता तशीच एक मूर्ती आपल्या वडिलांकडे वारंवार येते हे लक्षात यायचं ... ते हॉलमध्ये बसतात आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या संदर्भात काही - बाही चर्चा करतात . काहीच कळत नव्हत , पण ते बालपण शाखेवरच्या संस्काराने पोसले जाणारे असल्याने तुलना करू लागले की शाखांनायकाने सांगितलेल्या गोष्टीतील गुरूजींसारखा पेहराव व गोड मिठास वाणी . हेच तर गोष्टीतले साने गु...

श्रमयज्ञाचे आम्ही पुजारी!(बाळासाहेब विश्वासराव चव्हाण,प्राचार्य,राष्ट्रीय कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

  नुकताच आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा केला . भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारतमातेच्या असंख्य सुपुत्रांनी हसतहसत हौतात्म्य पत्करले . अनेकांनी तुरुंगवास पत्करला . लाठीमार सहन केला . आपल्या सौख्याची , कुटुंबियांच्या सौख्याची पर्वा केली नाही . अनेकांनी विविध आंदोलनामध्ये सक्रीय राहून अज्ञातवास पत्करला . स्वातंत्र्यापूर्वीची पिढी देश स्वतंत्र करण्याच्या ध्यासाने भारावून गेली होती . वाटेल तो त्याग करण्यास सज्ज होती . त्या भाग्यवान पिढीतील नानासाहेब आहेत .     देशाला स्वातंत्र्य मिळाले . स्वातंत्र्यानंतर मातृभूमीची सेवा कशी करायची ? कोणता मार्ग पत्करायचा ? नानासाहेबांच्या मनात प्रश्न निर्माण झाले . ध्येयासक्त मनाने कौल दिला , नोकरी करायची नाही , वकिलीही करायची नाही . शिक्षणप्रसाराच्या माध्यमातून भारतमातेची सेवा करायची . आपल्या गरजा अतिशय सीमित ठेवायच्या , अर्थार्जन करायचे नाही आणि शिक्षणप्रसाराचे पुण्यकर्म त्यांनी स्वीकारले.      ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत , गावात शाळा नसल्यामुळे ती शिकू शकत...

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

गोरगरिबांचे कैवारी(श्री.आत्माराम मुंगा पाटील,चेअरमन समाज सुधारक मंडळाने दीनबंधू बालकगृह,धुळे)

  श्री. नानासाहेब य . ना . चव्हाण यांना शिक्षणासाठी जो त्रास सहन करावा लागला तो त्रास माझ्या गोरगरीब बांधवांना होऊ नये ही उर्मी मनाशी ठेऊन नानांनी शैक्षणिक संस्था स्थापन करुन तिचा विस्तार केला . यामुळे खेड्यापाड्यातील , झोपडीतील हजारो विद्यार्थी त्यांना दुवा देत आहेत .     नानासाहेबांच्या जीवनात धुळ्याचा अतुट संबंध आहे . शेतकी व माध्यमिक शिक्षण धुळ्यात , स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्याचे धाडस धुळ्यात , विद्यार्थी आंदोलनामुळे घडणारी जेल यात्रा धुळ्यातील अशा विविध प्रसंगांनी धुळ्याने त्यांच्या मनात घर करणे साहजिक आहे .     आचार्य कुल व अ . भा . साने गुरुजी कथामाला या लोकशिक्षण करणाऱ्या व अनौपचारिक नीतिमूल्य शिक्षण देणाऱ्या संस्थामुळे नानांशी संबंध आला . आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि विनम्र  वागणुकीने नानासाहेब चव्हाण समोरच्याला जिंकून जवळीक निर्माण करतात . एकदा झालेली मैत्री कमी न होता वाढतच जाते . अशा प्रकारे इतरांना जिंकणारे हृदय त्यांचेपाशी आहे .    सर्वांशीच मनमिळावूपणाने वागून खेड्यापाड्यात पायपीट करुन शाळा काढल्यात . यातून शिक्षण घेऊन...

मनाच्या गाभाऱ्यातील देव माणसं ति.स्व.नानासाहेब व सौ.ताई (सौ.सुनेत्रा दि.कुलकर्णी,जळगाव)

 ति . स्व . नाना आणि ति . सौ . ताई यांची आठवण मला भूतकाळात घेऊन जाते . १ ९ ६१ चा जून महिना , माझ्या वडिलांसोबत मी दुपारी ति , नानांच्याकडे प्रथम गेले . घरात शिरल्याबरोबर बाहेरच्या रखरखीत उन्हाचा विसर पडला . सौम्य स्मित करीत अतिशय आपुलकीनं आमचं स्वागत करणारे नाना , सौ . ताई आणि घरातलं साधं , स्वच्छ व शितल वातावरण नकळत मनाच्या कप्प्यात स्थान पटकावून बसलं . मी कॉलेज शिक्षणासाठी चाळीसगावच्या कन्या छात्रालयात प्रवेश घेतला . माझ्यासारख्या साध्या शाळामास्तरांच्या मुलीला त्या काळात स्वतंत्र खोली घेऊन राहणं परवडणार नव्हतं . पण नानांच्या , होय वि नानांच्याच , कारण सौ . ताई आणि ती . नाना हे छात्रालयातील सर्व विद्यार्थिनींचे आईवडिलच होते . छात्रालयानं मला सामावून घेतलं , मदतीचा हात दिला , स्वावलंबन शिकवलं , सहजीवन शिकवलं , माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवायला अप्रत्यक्षपणं मदत केली , प्रोत्साहन दिलं , संरक्षण दिलं आणि आश्वासन केलं . छात्रालयात प्रवेश घेणाऱ्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय गरीब विद्यार्थिनी गहू , ज्वारी , बाजरी , डाळी व वरखर्चाचे पैसे बऱ्याचदा वेळेवर देऊ शकत नव्हत्या . पण आमची रोजी रो...

द्रष्टे शिक्षण तज्ञ -नानासाहेब चव्हाण (डाॅ.मु.ब.शहा,एम्.ए.पी.एच्.डी.,धुळे)

 खानदेशात साने गुरूजींच्या संस्काराने प्रभारित होऊन स्वत : ला समाजसेवेत झोकून देणाऱ्या ज्या काही अत्यंत थोडया कर्तृत्व संपन्न व्यक्ती आहेत , त्यात चाळीसगांवच्या श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाणांचा क्रम फारच वरचा लागतो . सध्या शिक्षणक्षेत्र म्हणजे पैसे कमविण्याचा धंदा झालाय . शिक्षणाचा कुठलाही संस्कार नसलेली माणसं या क्षेत्रात येतात . आणि सत्ताप्राप्तीसाठी किंवा टिकवण्यासाठी शिक्षणसंस्थाचा एक साधन म्हणून उपयोग करतात . नानासाहेब या गोष्टीचा एक सन्माननीय अपवाद आहेत .     शिक्षण म्हणजे सततचा संस्कार . या प्रक्रियेत संस्काराचे देणे आणि घेणे निरंतर चालू असते . अत्यंत कष्टपूर्वक शिक्षण घेतलेल्या नानासाहेबांनी ही संस्काराची संपन्नता स्वप्रयत्नांनी तर मिळवलीच पण अनंत हस्ताने ती इतरांनाही दिली .       शाळा माणूस घडविण्याचे कार्यालयअसते . या कार्यालयात येवून बसणाऱ्या आणि शिक्षण घेण्याऱ्या मुलांमुळे समाजाचे भवितव्य जसे घडते तसेच शाळेबाहेर प्रचंड संख्येने विखुरलेल्या अशिक्षित मुलांमुळेही घडते . नानासाहेबांनी शाळेत येणाऱ्या मुलांची जितकी काळजी वाहिली तितकीच , किंबहु...

नाना साहेब - एक प्रसन्न व्यक्तिमत्व(प्रा.अ.वा.बागड,राष्ट्रीय महाविद्यालय,चाळीसगाव.)

      मी . राष्ट्रीय वसतिगृहाचा विद्यार्थी . आज २७ वर्षापूर्वीची विद्यार्थी दशेतील आठवण झाली . सकाळचे ५ वाजले होते . घंटा झाली , वसतिगृहाच्या प्रांगणात प्रार्थनेसाठी मुले एकत्र जमली . प्रार्थनेला सुरूवात झाली .  स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे ।  कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा ।।  प्रार्थनासंपली . नानासाहेबांनी प्रार्थनेचा अर्थ आपल्या रसाळ वाणीने साध्या , सोप्या आणि सरळ भाषेत सांगितला . ही प्रार्थना रोज म्हणत असल्यामुळे मुखपाठ झाली . आजही ही प्रार्थना मी रोज म्हणतो . नानासाहेबांमुळे गीताईचा संस्कार झाला .      सामाजिक कार्याची आवड , ध्येयनिष्ठा आणि त्याग या सद्गुणांचे बाळकडू त्यांना आई वडिल आणि थोर गांधीवादी नेते कै . हरीभाऊ चव्हाण यांच्याकडून मिळाले . आईची जात्यावरची घरघर आणि वडिलांचा टाळांचा निनाद मनाला स्फुरण देतो . घरातील धार्मिक वातावरणामुळे अभंग आणि ज्ञानेश्वरीचे सतत वाचन चाले , त्यामुळे त्यांना अध्यात्माची गोडी लागली .     नानासाहेब अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे . फायनलच्या परीक्षेचे जळगाव हे केंद्र होते . १५०० विद...

……आणि मुलींचे वसतीगृह सुरू झाले.(प्रा.सौ.हिरादेवी ल.पाटील,राष्ट्रीय ज्यु.काॅलेज,चाळीसगाव)

 ' जे उरात उरते काही   ती प्रेरक शक्ती मजला         जगण्याची देते ग्वाही . " या काव्यपंक्तीची मला सदैव आठवण होते ती ऋषीतुल्य , परमपुजनीय , पितृतुल्य मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण यांच्या  जीवनचरित्राकडे बघून . नानासाहेबांचा सामान्य परिस्थितीच्या ,  मध्यमवर्गीय घरात जन्म झाला . खडतर प्रयत्नांनी परिस्थितीशी झुंज देत त्यांनी प्रायमरी शिक्षणापासून ते एल.एल.बी. पर्यंतचे शिक्षण घेतले . शिक्षणात खूप अडथळे आलेत , प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत देत जीवनाचा मार्गाक्रमण केला . आपल्या घरगुती परिस्थितीविषयी कधी नाराजी दाखविली नाही- म्हणतात ना , " "जन्मा येणे देवा हाती , करणी जग हासवी ।         गाणे व्यर्थची कुलथोरवी ॥ "  हे नानासाहेबांनी सार्थ करून दाखविले . आपल्या कर्तृत्वाने , नानासाहेब स्वत : साठी कधीच जगले नाहीत . अहर्निश त्यांनी स्वतःला वाहून घेतले ते शैक्षणिक कार्याला . विविध शैक्षणिक संस्था काढून तालुक्यातील , तालुक्याबाहेरील नव्हे जिल्हयाबाहेरील तरूणांना देखिल नानासाहेबांनी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यात , त्यांनी ' शिक्षणा ' ...