श्री. नानासाहेब य . ना . चव्हाण यांना शिक्षणासाठी जो त्रास सहन करावा लागला तो त्रास माझ्या गोरगरीब बांधवांना होऊ नये ही उर्मी मनाशी ठेऊन नानांनी शैक्षणिक संस्था स्थापन करुन तिचा विस्तार केला . यामुळे खेड्यापाड्यातील , झोपडीतील हजारो विद्यार्थी त्यांना दुवा देत आहेत . नानासाहेबांच्या जीवनात धुळ्याचा अतुट संबंध आहे . शेतकी व माध्यमिक शिक्षण धुळ्यात , स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्याचे धाडस धुळ्यात , विद्यार्थी आंदोलनामुळे घडणारी जेल यात्रा धुळ्यातील अशा विविध प्रसंगांनी धुळ्याने त्यांच्या मनात घर करणे साहजिक आहे .
आचार्य कुल व अ . भा . साने गुरुजी कथामाला या लोकशिक्षण करणाऱ्या व अनौपचारिक नीतिमूल्य शिक्षण देणाऱ्या संस्थामुळे नानांशी संबंध आला . आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि विनम्र वागणुकीने नानासाहेब चव्हाण समोरच्याला जिंकून जवळीक निर्माण करतात . एकदा झालेली मैत्री कमी न होता वाढतच जाते . अशा प्रकारे इतरांना जिंकणारे हृदय त्यांचेपाशी आहे .
सर्वांशीच मनमिळावूपणाने वागून खेड्यापाड्यात पायपीट करुन शाळा काढल्यात . यातून शिक्षण घेऊन अनेक डॉक्टर , वकील , इंजिनियर , शिक्षक , प्राध्यापक तयार झालेत . ते अनेक ठिकाणी नानांना भेटतात तेव्हा नानांचे अंत : करण भरुन येते . डोळे पाणावतात आणि धन्यता वाटते . नाना राजकारणात पडले असते तर त्यांना हा मुलांकडून मिळणारा निखळ आनंद अनुभवायला मिळाला नसता . त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा आणि त्यांनी शंभरी गाठावी ही सदिच्छा .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा