मुख्य सामग्रीवर वगळा

नाना साहेब - एक प्रसन्न व्यक्तिमत्व(प्रा.अ.वा.बागड,राष्ट्रीय महाविद्यालय,चाळीसगाव.)

 

    मी . राष्ट्रीय वसतिगृहाचा विद्यार्थी . आज २७ वर्षापूर्वीची विद्यार्थी दशेतील आठवण झाली . सकाळचे ५ वाजले होते . घंटा झाली , वसतिगृहाच्या प्रांगणात प्रार्थनेसाठी मुले एकत्र जमली . प्रार्थनेला सुरूवात झाली . 
स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे । 
कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा ।। 
प्रार्थनासंपली . नानासाहेबांनी प्रार्थनेचा अर्थ आपल्या रसाळ वाणीने साध्या , सोप्या आणि सरळ भाषेत सांगितला . ही प्रार्थना रोज म्हणत असल्यामुळे मुखपाठ झाली . आजही ही प्रार्थना मी रोज म्हणतो . नानासाहेबांमुळे गीताईचा संस्कार झाला . 
    सामाजिक कार्याची आवड , ध्येयनिष्ठा आणि त्याग या सद्गुणांचे बाळकडू त्यांना आई वडिल आणि थोर गांधीवादी नेते कै . हरीभाऊ चव्हाण यांच्याकडून मिळाले . आईची जात्यावरची घरघर आणि वडिलांचा टाळांचा निनाद मनाला स्फुरण देतो . घरातील धार्मिक वातावरणामुळे अभंग आणि ज्ञानेश्वरीचे सतत वाचन चाले , त्यामुळे त्यांना अध्यात्माची गोडी लागली .
    नानासाहेब अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे . फायनलच्या परीक्षेचे जळगाव हे केंद्र होते . १५०० विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी तृतीय क्रमांक पटकावला . महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीमुळे त्यांनी शेतकीशिक्षण घेतले . माध्यमिक शिक्षण घेत असतांना धुळयाच्या शेतकी शाळेतील विद्यार्थ्यांकडून भोजनाची विनामुल्य सवलत मिळाली . विद्यार्थ्यांचे ते आदरस्थान होते . त्यांना विद्यार्थी ' बापू ' म्हणत . कारण नानासाहेबांच्या प्रत्येक कृतीला विचारांची जोड होती .                    परिस्थितीशी  झुंज देत नानासाहेब  बी.ए.एल.एल.बी झाले.    ते नामवंत वकील झाले असते . ऐष आरामात राहिले असते . पण हा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही . आपण मानवसमाजाचे देणे लागतो . गोर - गरीब जनतेसाठी , खेडयातील अशिक्षितांसाठी आणि स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी शिक्षणप्रसाराचे व्रत घेतले . 
   आ.बं. हायस्कूलमध्ये शिक्षक असतांना नानासाहेब गणित शिकवत , ते गणित शिकवतांना इतके तल्लीन होत की त्यामुळे विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत . विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक कमविला . पायी सहली काढण्याची प्रथा त्यांनी सुरू केली होती . विद्यार्थ्यांची निसर्गाशी ओळख व्हावी , त्यांनी झऱ्याचे गाणे ऐकावे , फुलाफळांचा गंध घ्यावा , सृष्टीच्या काव्याचा आस्वाद घ्यावा हा त्यांचा दृष्टिकोन होता . राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाखांचा विस्तार करीत असतांना त्याकाळी एस.टी. ची सुविधा सर्वत्र नव्हती . पावसाळयात एस.टी. जात नसे . त्यामुळे त्यांना पायी प्रवास करावा लागे . सानेगुरूजींची ' श्यामची आई ' आणि ' पत्री ' यांच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मंगल वाड : मय प्रसारासाठी त्यांनी पदयात्रा केलेली आहे .
   बालमनावर खोलवर संस्कार होण्यासाठी त्यांनी सानेगुरूजींचे ओजस्वी वाड् : मय विद्यार्थ्यांना दिले .
    ' करी मनोरंजन जो मुलांचे , जडेल नाते प्रभुशी तयाचे । ' हे ब्रीद असलेल्या अखिल भारतील सानेगुरूजी कथामालेचे नानासाहेब कार्यकारिणी सदस्य होते . या संस्थेचे ते कोषाध्यक्ष म्हणून आजतागायत काम पहात आहेत . 
  बालपणी मराठी शाळेच्या सुंदर बागेमुळे वृक्ष - वेलींविषयी आवड निर्माण झाली . सर्व शाखांवर त्यांनी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले . केवळ वृक्षारोपणच केले असे नाही तर वृक्षाला लहान मुलासारखे वाढविले . खऱ्या अर्थाने वृक्षसंवर्धन केले . यासाठी भावजागरण दिंडी - आयोजित केली होती . ही दिंडी अगदी वारकरी दिंडीसारखी होती हातात टाळ घेऊन ' ज्ञानोबा - तुकाराम ' ' मुक्ताई जनाई ' म्हणत ही वृक्षदिंडी फिरली . आजही झाड शीतल छाया देत आहेत . पर्यावरण संतुलनास मदत करीत आहेत . 
   नानासाहेबांजवळ दूरदृष्टी आहे . श्रमदानाने हिरापूर रोडला तांत्रिक शिक्षणासाठी वास्तु उभी केली . ही जागा अक्षरश : एक माळरान होते , एक नाला तेथे वहात होता . या जागेवर मला सर्कस पाहिल्याचे आठवते . आज या ओसाड माळरानावर नंदनवन फुलले आहे . ही जागा सपाट करण्यासाठी दर रविवारी संस्थेच्या शाखांवरील विद्यार्थी आणि शिक्षक येत . नानासाहेबांबरोबर श्रमदान करीत . 
   तांत्रिक शिक्षणासाठी १२ लेथ मशिन्स , सर्व साधनसामुग्रींनी उपलब्ध करून दिली . महाराष्ट्रात दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नाव झाले . मोठया प्रमाणावर इंजिनियर , तंत्रज्ञ या परिसरात तयार झाले . ते सर्व श्रेय राष्ट्रीय विद्यालय या शाळेला आणि पर्यायाने " आदरणीय नानासाहेबांना देतात .
   १ ९ ८६ साली पुणे विद्यापीठाने बी.सी.एस. म्हणून अभ्यासक्रम केला आणि राष्ट्रीय महाविद्यालयाच्या संगणक विभागाला हा अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली . नानासाहेबांनी भलातधीत ससज अशी पयोगशाळा तयार करून दिली . ज्या स्थानिक चौकशी समितींनी या विभागास भेट दिली त्यांनी या विभागाची प्रशंसा केली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कायम संलग्रीकरण समितीचे अध्यक्ष श्री . अँड.नानासाहेब झेड.बी. पाटील यांनी देखील अतिशय समाधान व्यक्त केले . 
   नेत्रांना भुरळ घालणाऱ्या सुंदरपुष्पहारातील सुगंध दरवळणारी मोहक आणि रंगीत फुले यांनीच मनुष्य आकृष्ट होतो , त्याचेच कौतुक  होते . तथापि ज्या दोरीच्या सहाय्याने ही फुल गुंफली जातात त्या दोरीचे महत्व काही कमी नाही . नानासाहेबांचे विविध क्षेत्रातील नेत्रदीपक यशाने नटलेले जीवन घडविण्यात नानासाहेबांच्या सुविद्द  पत्नी सौ . सुशीलाताईचा वाटा फार मोठा आहे . नानासाहेबांचा आणि त्यांचा सुखी संसार पाहिल्यावर त्याची प्रचीती येते . 
  नानासाहेबांच्या कार्याचा गौरव म्हणून २५ डिसेंबर १ ९ ८८ रोजी मराठी विज्ञान परिषद चाळीसगाव विभागातर्फे २३ वे अखिल भारतील मराठी विज्ञान संमेलनात संमेलनाध्यक्ष होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबईचे संचालक श्री . वि गो . कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र , शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले . 
  नानासाहेबांच्या या विशाल कार्याबद्दल नाशिक येथील सारडा प्रतिष्ठानने यावर्षीचा ' नंदिनी पुरस्कार ' रू . २५,००० / - जाहीर केला . 
अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला संघाने यावर्षाचा ' बालसेवा ' पुरस्कार रू . २५,००० / - राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळास जाहीर केला . या दोन्ही पुरस्कारांमुळे नानासाहेबांच्या किर्तीचा सुगंध सर्वत्र दिशांमध्ये दरवळतो आहे . सर्व शिक्षक , विद्यार्थी , जनतेचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे . 
नानासाहेबांचा अमृतमहोत्सव हा तमाम जनता जनार्दनाचा आनंदोत्सव आहे . शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मी आपला ऋणी आहे . मी आपल्याला दीर्घ आयुष्य चिंतीतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...