मुख्य सामग्रीवर वगळा

आश्रमशाळा लोणजेसाठी मा.शिक्षणमहर्षी नानासाहेब य.ना. चव्हाण यांचे योगदन,(श्री.सोनार मुख्याध्यापक हरिभाऊ चव्हाण प्रा.आश्रमशाळा लोणजे ता.चाळीसगाव(जळगाव))

 

लोणजे हे गाव चाळीसगाव शहरापासून १५ कि . मी .  , दूरवर डोंगर पायथ्याशी व सर्व सुखसोयी पासून वंचीत होते . यात ९ ५ टक्के मागासवर्गीय बंजारा समाजाची वस्ती . दारिद्रय , अंधश्रद्धा व जुन्या चालीरिती यांनी अंधकारमय झालेल्या या वस्तीस खानदेशचे गांधी हरिभाऊ चव्हाण या महान व्यक्तिच्या रुपाने प्रकाश मिळाला . महात्मा गांधी यांच्या हाकेनुसार खेड्यात जा ! सेवा करा ! या साठी हरिभाऊ चव्हाण स्वत : या ठिकाणी राहून येथील गोरगरीबांची सेवा करीत करीत सामाजिक  कार्याकडे वळले . लहान मोठ्यांना शिक्षणाचे धडे देऊ लागलेत व कोणताही मोबदला न घेता रात्रंदिवस हा जनता जगन्नाथाचा रथ अनेक अनुयायींच्या मदतीने ओढू लागलेत .         त्यांच्यानंतर हे सामाजिक कार्याचे व्रत या गावाचे मा . आबासाहेब श्री . हि . भि . चव्हाण यांच्या रुपाने जोपासले गेले . आबांच्या रुपाने एक मार्गदर्शक हिरा लाभला . त्यांनी अनेक सहकारी बांधवांच्या मदतीने आपल्या समाज बांधवांना अंधश्रद्धा , शिक्षण , सामाजिक परिवर्तन , सुधारीत शेती , आदर्श ग्राम संकल्पना या अनेक बाबतीत प्रयत्नाची पराकाष्टा करून योग्य असे अहोरात्र परिश्रम घेतलेत. 
    त्यांनी अखंड सामाजीक कार्याचा वसा घेऊन समाज   बांधवांना योग्य अशा सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे जवळचे स्नेही   शिक्षणमहर्षी मा . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या सहकार्याने या  गावात ज्ञानाची गंगा म्हणून शिक्षणरुपी रोपटे लावणारे कै . हरीभाऊ चव्हाण यांच्या नावाने प्राथमिक आश्रमशाळा जून १ ९ ८२ पासून सुरु केली . लोणजे मजूर सोसायटीने ५ एकर जमीन थोड्या किंमतीत आश्रमशाळेस बहाल केली .
     जून १ ९ ८२ पासून आश्रमशाळा सुरु झाली . या पडीत जमिनीत ना पाण्याची सोय , ना झाडांची सावली . तेव्हा मा . नानासाहेबांनी १ जून ८२ पासून लोणजे गावी मुक्काम ठोकला . - सकाळी ६ वाजता तयार होऊन ६ ते १० वाजेपर्यंत गावात वर्गणी गोळा करणे , प्रत्येक घर घर , व्यक्ती व्यक्तिंना भेटून मिळेल ते १  रुपयांपासून वर्गणी जमा केली . नंतर १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत श्रमदान , यात जमीन समतल करणे , रस्ते , झाडांचे खड्डे , झाडी लावणे , कच्च्या ५ खोल्यांचे बांधकाम , त्यासाठी विटा तयार करुन २५ x ३० या साईजच्या झोपडीवजा ५ खोल्या पूर्ण श्रमदानातून तयार केल्यात . रात्री ८ ते १० पुढील दिवसांचे नियोजन . कामाची आखणी . या प्रमाणे सतत ६ महिने मा . नानासाहेबांनी मुक्काम ठोकला . यात सर्व कामे पूर्ण करुन घेतलीत . इ . १ ली व २ री चा वर्ग सुरु झाला . अगदी छोट्याशा कार्यक्रमाने मा . कै . देवरामभाऊ पाटील यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन झाले . सेवकवर्ग नेमून सदोदीत त्यांना मार्गदर्शन करुन आश्रमशाळेची प्रगतीकडे झेप सुरु झाली . सतत  आश्रमशाळेकडे लक्ष देऊन स्वत : शरीरास पेलवणार नाही असे श्रमदान करुन विविध शाखांची श्रमशिबिरे आयोजित करुन आश्रमशाळेची घडी अतिशय व्यवस्थित बसवून दिली .     चार ते पाच वर्षांनंतर पक्क्याखोल्यांचे बांधकाम हाती घेतले . आर.सी.सी. बांधकामाच्या १० खोल्या , सर्व खोल्यांना सलग ६ फुटाचा व्हरांडा , ई आकाराच्या इमारतीच्या मध्यभागी स्टेज , जिना , वसतीगृहासाठी ४०x२० चा भोजन हॉल , कोठी , स्वंयपाक खोली असे १५ खोल्यांचे बांधकाम केले . ह्याच बरोबर जि . प . शाळेच्या ५ खोल्या ताब्यात मिळवून त्या ५ खोल्यांची दुरुस्ती अतिशय चांगल्या प्रकारे करुन घेतली . सतत विहिरींचे खोदकामाचे श्रमदान करुन २५x३०x२५ या आकाराची भव्य विहीर तयार करुन , बांधकाम करुन इले . पंप बसवून घेतला . आश्रमशाळेच्या संपूर्ण परिसरात १५०० झाडे लागवड करुन जेव्हा जेव्हा आलेत तेव्हा तेव्हा पाणी न घेता झाडांची , शेतीची पाहणी करुन मार्गदर्शन केले . त्याच बरोबर वसतीगृहातील मुलांसाठी प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे म्हणून परस बाग तयार करुन घेतली . यात विविध प्रकारची फुलझाडी , शोभेची झाडे , वेली लावल्यात .
    त्याच बरोबर अतिशय चांगला प्रशिक्षीत तळमळीचा सेवक वृंद नेमून वेळोवेळी वर्गांना भेटी देवून बहुमोल मार्गदर्शन केले . प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन हे लहानसे रोपटे त्यांच्या प्रेरणेने , मार्गदर्शनाने व परिश्रमाने वेगाने वाढू लागले . जसे -
   इवलेसे रोप लावियले दारी । तयाचा वेलू गेला गगनावरी ॥ या शाळेची सुरुवात पहिलीपासून होऊन आज सातवीपर्यंत  वर्ग असून ७ ९ ४ विद्यार्थी शिक्षणाचालाभ घेत आहेत . आश्रमशाळेस आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्य , फर्निचर उपलब्ध करुन दिले . आजपर्यंत आश्रमशाळेत लहानमोठे , शैक्षणिक उपक्रम यशस्वी ठरले आहेत . यात साने गुरुजी कथामाला , गीताई पाठांतर  परीक्षा , श्यामची आई प्रज्ञा परिक्षा , वक्तृत्त्व स्पर्धा , गायन स्पर्धा , निबंध स्पर्धा , क्रीडा स्पर्धा यात तालुका व जिल्हा पातळीपर्यंत सहभाग घेतला जातो . तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत ३५ विद्यार्थी पास झालेले आहेत . हिंदी , चित्रकला व काही अवांतर परिक्षांमध्ये सहभाग घेतला जातो . आश्रमशाळेचे कामकाज सुरुवातीपासूनच अधिकारी वर्गानी भेटी देऊन त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे . जिल्ह्यात अतिशय चांगली आदर्श आश्रमशाळा म्हणून नावलौकिक मिळविला . तसेच वरिष्ठ , राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पाच आश्रमशाळांतील एक आश्रमशाळा म्हणून गौरव केलेला आहे व त्याबाबत मा . नानासाहेब यांची भेट घेऊन अभिनंदनही केलेले आहे . आजपर्यंत आश्रमशाळेतून १८०० विद्यार्थी शिक्षण शिक्षण घेऊन बाहेर पडतील .यातील बरेचसे उद्योगास लागलीत ,नोकरीस लागलीत . काही उच्च शिक्षण घेत आहेत या सर्व गोष्टींचे श्रेय,योगदान आदरणिय नानासाहेब य.ना.चव्हाण यांचेच आहे .यांना शतायुष्य लाभो ही   शुभेच्छा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...