मुख्य सामग्रीवर वगळा

मा.नानासाहेब य.ना.चव्हाण:अमृतमहोत्सवी चिंतन(प्रा.डाॅ.सौ.छा.द.निकम,मराठी विभाग प्रमुख राष्ट्रीय महाविद्यालय,चाळीसगाव)

 

जीवनाचा  हे क्षणभंगूर आहे ' हे शाश्वत सत्य गौतम बुद्धाने शोधून काढले .   पण या क्षणभंगूर जीवनाचा सदुपयोग झाला तरच या जीवनाला महत्व प्राप्त होऊ शकते. केला . ते गौरविले जाऊ शकते. या गौरवाला पात्र ठरलेले आमचे मा . नानासाहेब य . ना . चव्हाण हे एक व्यक्तिमत्त्व , मा . नानासाहेबांच्या वयाला आज ७५ वर्ष होत आहेत . त्यांच्या जीवनातील एकेक क्षण त्यांनी सत्कारणी लावला आहे . त्यांच्या या घोर तपश्चर्येतूनच आज भडगाव , पाचोरा , चाळीसगाव तालुके शिक्षणाच्या प्रकाशात उजळून निघाले आहेत . ' शिक्षण ' हे एक सर्वश्रेष्ठ ध्येय त्यांच्या नजरेसमोर होते आणि हे ध्येय गाठण्यासाठी नानासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य या शिक्षण कार्यात समर्पित केले . राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा  अधिकाधिक विकास व्हावा हे जणू त्यांचे ब्रीदच होते . विकासकार्यात  ते अविरत कार्यरत आहेत . मा . नानासाहेब म्हणजे राष्ट्रीय शिक्षण  संस्था आणि राष्ट्रीय शिक्षणसंस्था म्हणजे नानासाहेब असे जणु एक  समीकरणच होऊन गेले आहे . मा . नानासाहेबांनी सामाजिक  बांधिलकी मानून स्वत : ला या पवित्र कार्यात वाहून घेतले आहे . मा .  नानासाहेबांचे वय आज ७५ वर्ष झाले असले तरी तोच पूर्वीचा उत्साह  आजही त्यांच्या कामात दिसून येतो . त्यांच्या शैक्षणिक कर्तृत्वाने ' गाठलेला उच्चांक म्हणजे आमचे सर्वांग परिपूर्ण राष्ट्रीय महाविद्यालय  आणि महाविद्यालयाची वास्तू होय . बालवाडी पासून ते मर्यादित ठेवले न महाविद्यालयापर्यंत त्यांनी शैक्षणिक प्रगती साधलेली आहे . हे कुणीही  नाकारु शकणार नाही . त्यांनी एकूण ४६ , शैक्षणिक शाखांचा विस्तार  केला . ही अपूर्व अशी कामगिरी आहे . त्यांच्या या कर्तृत्वामागे म. गांधी , पुज्य साने गुरुजी , विनोबा भावे यांची प्रेरणा आहे . याशिवाय  त्यांनी बालपणी समाजात घेतलेले अनुभव , शिक्षणासाठी त्यांना घ्यावे लागलेले कष्ट , त्यांच्या आई - वडिलांचे संस्कार आणि त्यांनी  बालपणी वाचलेले धार्मिक ग्रंथ यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण घडण झालेली आहे . म्हणून ' कर्तृत्व ' , ' निष्काम सेवा ' हेच त्यांच्या जीवनाचे ब्रीद ठरले आहे . सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांनी शिक्षणाचा  प्रवाह नेऊन सोडला आहे . गोर - गरीब , गिरीजन बहुजनांपर्यंत  खेडोपाडी शिक्षणाची सुविधा त्यांनी केली . चाळीसगाव शहरापासून  दूर असणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थीनींना त्यांच्याच गावात किंवा  जवळपास शिक्षणाची व्यवस्था करुन देऊन खूप मोठे राष्ट्रीय कार्य  त्यांनी केले आहे . हे शिक्षणाचे पवित्र कार्य त्यांनी एकनिष्ठेने ,  नि : स्पृहतेने केले आहे आणि म्हणूनच जीवनात त्यांना कधी अपयश  आले नाही. त्यांनी समाजाची खरी सेवा केली आहे . या सेवेचे त्यांना फळ मिळाले ते मानसिक समाधान . खरा कर्मयोगी कुठल्याही  फळाची अपेक्षा करीत नसतो . असे भगवत् गीतेत म्हटले आहे . ' कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन् ।' मा . नानासाहेबांनी केवळ शिक्षणापुरतेच आपले कार्यक्षेत्र  मर्यादित ठेवले नाही तर त्यांच्या कार्याचे क्षेत्र हे विशाल आहे . राष्ट्रीय  सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . चाळीसगाव या संस्थेची स्थापना  होणेपूर्वी मा . नानासाहेबांनी चाळीसगाव येथे इ . स . १ ९ ५० मध्ये गोरगरिबांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून राष्ट्रीय वसतीगृहाची उभारणी केली . इ . स . १ ९ ५१ ते १ ९ ५४ पर्यंत चाळीसगाव येथील आ . बं . हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि ज्ञानदानाचे कार्य केले . सर्व सामान्य गरीबांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून डिसेंबर १ ९ ५३ मध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे छोटेसे रोप लावून प्रयत्नाने त्याचे आज वटवृक्षात रूपांतर केले . या वटवृक्षाच्या छायेत अनेक विद्यार्थी ज्ञानग्रहण करीत आहेत . अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन मा . नानासाहेबांनी केलेले हे महान कार्य पाहिले म्हणजे या संस्थेत आपण काम करीत आहोत याचा आभिमान वाटतो . 
  मा . नानासाहेब उस्मानाबाद - लातूर येथे भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी , त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी साने गुरुजी कथामाला संचलित मनोबल भावजागर दिंडीत सहभागी झाले होते . साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव मा . नानासाहेबांमध्ये खूप खोलवर असा रुजलेला आहे . त्यामुळेच साने गुरुजींच्या विचारांचे स्वत : प्रत्यक्ष कृतीतून पालन करुन विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत , साने गुरुजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावेत या उद्देशाने त्यांचा सानेगुरुजी कथामाला या संस्थेत सक्रीय सहभाग आहे . साने गुरुजींचे विचारधन मनसोक्त सर्वांना लुटता यावे म्हणून साने गुरुजी वाचनालय सुरु केले . खानदेशाचा शैक्षणिक विकास अधिक व्हावा म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे स्थापन करावे या चळवळीतही ते सहभागी होते . विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टीने ते सतत प्रयत्नशील असतात . विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळावे , श्रमाची प्रतिष्ठा वाढावी म्हणून ते सतत श्रमदानाची शिबिरे भरविण्यात आनंद मानतात . विद्यार्थ्यांचा बौद्धिक , मानसिक विकासा बरोबरच त्यांचा शारीरिक विकास व्हावा म्हणून क्रीडा क्षेत्राकडेही ते आवर्जून लक्ष देतात . म्हणूनच ते राष्ट्रीय क्रीडा मंडळाचे संस्थापक व अध्यक्षपदाची धुरा आजतागायत सांभाळीत आहेत . विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ' विनोबा गीताई अभ्यास केंद्राची निर्मिती त्यांनी केली . 
  मा . नानासाहेबांच्या एकूणच कर्तृत्वाचे चिंतन करता त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण सत्कारणी लागलेला आहे . त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य बहुमोल आहे . राष्ट्रीय शिक्षण संस्थारुपी मंदिराचा त्यांनी पायाही घातला आणि त्यावर राष्ट्रीय महाविद्यालयीन शिक्षणरुपी कळसही चढविला . या कळसावर बालसेवा आणि नंदिनी पुरस्काररुपी ध्वज फडफडत आहे . या पुरस्करातून मा . नानासाहेबांच्या कार्याचा किर्तीसुगंध सर्वदूर गेला आहे . त्यांचे कार्य उदंड आहे . त्यांचा आज ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठ्या चैतन्यरुपी वातावरणात साजरा होत आहे . ही त्यांच्या कार्याची पावतीच त्यांना मिळाली आहे . परमेश्वर मा . नानासाहेबांना उदंड आयुष्य देवो हीच शुभेच्छा .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...