मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...

अमृताचे डोहाळे(डाॅ.हेमंतराव देशमुख,माजी आमदार,दोंडाईचा)

  सु खी माणसाचा सदरा शोधायला लागलो तेव्हा विज्ञानाचा व विवेकी बुद्धिवादाचा कैफ उतरला होता ; मी पस्तीशी ओलांडली होती आणि माझ्या अर्ध्या दमदार आयुष्याचा इतिहास झाला होता .     एव्हाना मी प्रथितयश डॉक्टर झालो होतो . राजकारणात मुसंडी मारली होती . पैसा व नावलौकिक मिळाला होता . व्यावसायिक , सार्वजनिक व राजकीय जीवनात मी अधिकाधिक व्यस्त व लौकिकदृष्ट्या यशस्वी होत होतो . इर्षा , स्पर्धा , राजकीय लढाया आणि जिंकण्याची जिद्द यांनी सर्व जगणे व्यापून टाकले होते . हे चक्र कधी थांबेल , याचा शेवट कशात होईल व याचे फलित काय निघेल याचे उत्तर दृष्टिपथात नव्हते .     जीवनाची क्षणभंगुरता सर्वांना समजते . डॉक्टर म्हणून मी ती जवळून व सातत्याने अनुभवित होतो . आयुष्याचा एक एक पळ हातातून निघून जातांना पाहात होतो . जे मिळविले ते व्यावहारिक जीवनाचा व जागृत मनाचा भाग होते . आतले मन समाधानी नसावे . म्हणून ते सुखी माणसाचा सदरा शोधायला लागले तेव्हा मी अस्वस्थ झालो . तसे आपण सगळे केव्हातरी आपल्या जीवनात सुखी माणसाचा सदरा शोधू लागतो . अर्थात त्यासाठी आधी सुखी माणूस सापडावा लागतो . तुकारा...

एक आगळा वेगळास्वातंत्र्य सैनिक नानासाहेब य.ना .चव्हाण ,(श्री.जीजाबरावजी वाघ ,चाळीसगाव ,दैनिक रघुनंदन-स्वतंत्रता दिन विशेषांक यांचे सौजन्यैने)

  नानासाहेब य.ना. चव्हाण आपल्या शैक्षणीक कार्याच्या प्रसाराने संपूर्ण महाराष्ट्रात आदरस्थानी आहेत. मात्र नानासाहेब हे प्रसिद्धी , सत्ता व संपत्ती यापासून नेहमीच दूर राहिल्याने त्यांचे सामाजिक क्षेत्रातील प्रचंड असे योगदान जनते समोर आले नाही.  सन १ ९ ४२ च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊनही नानासाहेबांनी कधीही स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या सुविधांची अपेक्षा बाळगली नाही . त्यांच्या स्वभाव विशेषातील त्याग हा एक पैलू यामुळे चकाकून निघाला आहे . त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानावर हा संक्षिप्त दृष्टीक्षेप !  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १ ९ ४२ या वर्षातील ऑगस्ट महिना हा क्रांतीकारी व एक वेगळ्या आशयाने इतिहासात नोंद झालेला महिना आहे . ह्या चित्तथरारक महिन्याचा इतिहास भारताच्या हजारो पिढयांना जगण्याची नवी उर्मी देणारा ठरला आहे . प्रत्यक्षात ज्यांनी १ ९ ४२ च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊन देशसेवेसाठी आपले आयुष्य थोडेफार का होईना वेचले त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत आगळे वेगळे नाव म्हणून नानासाहेब य.ना. चव्हाण यांचा प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल.    ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

सामाजि कृतज्ञतेचा एक आदर्श(प्रा.डाॅ.एस्.एम्.विसपुते राष्ट्रीय महाविद्यालय ,चाळीसगाव)

   महाराष्ट्राची भूमी म . जोतिराव फुले , राजर्षी शाहु  महाराज , महर्षि धोंडू कर्वे , भाऊराव पाटील यांच्या कार्याने व त्यागाने पावन झालेली आहे . याच भूमीत आज सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात उदासिनता निर्माण झालेली आहे . पण या उदासिनतेच्या काळोखात आदर्शाचा एक प्रकाश अजून तेवत आहे तो नानासाहेबांच्या कर्तृत्वातून . कर्मवीर नानासाहेबांचा जन्म खानदेशाच्या समृद्ध व पवित्रभूमीत रांजणगाव येथे झाला . त्यांचे वडील व सर्व कुटुंबच आध्यात्मिक , धार्मिक प्रवृत्तीचे , सत् चारित्र्याचे आई - वडिल आणि काका मा . कै . हरीभाऊ चव्हाण यांच्याकडून त्यांना सामाजिक सेवेचा , शैक्षणिक कार्याचा व सद्गुणाचा वारसा मिळाला . लहान वयापासूनच त्यांच्यावर आध्यात्मिक , समाजसेवेचे व सुसंस्कारांचे संस्कार झालेत . म्हणूनच देशभर पेटलेल्या स्वातंत्र्याच्या होमकुंडात त्यांनी स्वत : ला झोकून दिले होते . १ ९ ४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनातील गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे करा अथवा मरा ! हा महामंत्र व त्यांची प्रेरणा घेऊन ' भारत छोडो ' आंदोलनात शिक्षण सोडून भाग घेतला . त्यात त्यांना अल्पकाळ शिक्षा झाली . शिक्षा संपल्यावर देखील...

नानासाहेब एक पुरूशोत्तम योगी(श्री.एस्.ए.बागुल,सेक्रेटरी,साने गुरूजी कथामाला संघ,चाळीसगाव)

  गीता प्रवचनातील एका प्रवचनात विनोबाजी आपले विचार मांडतांना म्हणतात , ' ' कर्म , भक्ती , ज्ञान यांचा अलगपणा मला सहन होत नाही . काही साधकांची निष्ठा अशी असते की त्यांना फक्त कर्मच सुचते . कोणी भक्तीचा मार्ग कल्पितात व त्यावरच भर देतात . काहींचा कल ज्ञानाकडे असतो . जीवन म्हणजे केवळ कर्म , केवळ भक्ती , केवळ ज्ञान असा केवल वाद मी मानू इच्छित नाही . उलटपक्षी कर्म , भक्ती व ज्ञान यांची बेरीज असा समुच्चयवादही मला पटत नाही . आधी कर्म मग भक्ती मग ज्ञान अशा सारखा क्रमवादही मी स्वीकारत नाही . तिन्ही वस्तूंचा मेळ घालावा असा सामंजस्यवादही मला पटत नाही . मला असे अनुभवावेसे वाटते की कर्म म्हणजेच भक्ती म्हणजेच ज्ञान . एका दृष्टांताद्वारे अत्यंत मार्मिकपणे समजावतांना ते म्हणतात , ' बर्फीच्या तुकड्यातील गोडी , तिचा आकार , तिचे वजन या गोष्टी वेगवेगळ्या नाहीतच . ज्या क्षणी बर्फीचा तुकडा तोंडात टाकला त्याच क्षणी तिचा आकारही खाल्ला तिचे वजनही पचवले , तिची गोडीही चाखली . तिन्ही गोष्टी एक आहेत . बर्फीच्या कणाकणात आकार , वजन , गोडी आहे . त्याचप्रमाणे प्रत्येक कृत्य सेवामय , प्रेममय व ज्ञानमय व्हाव...

जीवनाचा नम्र उपासक(प्रा.मनोज शितोळे,पदव्युत्तर मराठी विभाग ,राष्ट्रीय महाविद्यालय,चाळीसगाव)

 'निश्चयाचा महामेरु बहु जनासी आधारु ' असे खानदेशचे शिक्षणकर्मी नानासाहेब चव्हाण सात जानेवारीला वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण करीत आहेत . नानासाहेबांचे सर्व आयुष्य महान यज्ञ म्हणावा लागेल . १ ९ ५३ पासून ज्ञानदानाचं महान कार्य सातत्याने करण्यात धन्यता मानणारे नानासाहेब दुर्मिळच व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल .      साहित्य हा नानासाहेबांचाआवडता प्रांत.साहित्य हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे त्यामुळे ते जीवनवादी साहित्याचा  पुरस्कार करतात . साहित्याची निर्मिती ही चिंतनशील प्रवृत्तीतून व्हायला पाहिजे . साहित्यातून वास्तवदर्शन चित्रीत झाले पाहिजे . साहित्यिकांना आदर्श जीवनाचे उन्नयन होईल असे जीवनाचे सखोल तत्वज्ञान साहित्याच्या माध्यमातून साहित्यिकानी समाजाला सांगावे साहित्य हा समाजाचा आधारस्तंभ आहे     आजच्या शिक्षकाविषयी नाना म्हणतात , की शिक्षकांनी  विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास न करता खेळांना प्राधान्य देऊन त्यांचा शारीरिक विकासही करावा व नैतिक मुल्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे . शिक्षक हया शब्दाची संकल्पना ते अशी करतात  शि - स्वत : ची ...