'निश्चयाचा महामेरु बहु जनासी आधारु ' असे खानदेशचे शिक्षणकर्मी नानासाहेब चव्हाण सात जानेवारीला वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण करीत आहेत . नानासाहेबांचे सर्व आयुष्य महान यज्ञ म्हणावा लागेल . १ ९ ५३ पासून ज्ञानदानाचं महान कार्य सातत्याने करण्यात धन्यता मानणारे नानासाहेब दुर्मिळच व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल .
साहित्य हा नानासाहेबांचाआवडता प्रांत.साहित्य हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे त्यामुळे ते जीवनवादी साहित्याचा पुरस्कार करतात . साहित्याची निर्मिती ही चिंतनशील प्रवृत्तीतून व्हायला पाहिजे . साहित्यातून वास्तवदर्शन चित्रीत झाले पाहिजे . साहित्यिकांना आदर्श जीवनाचे उन्नयन होईल असे जीवनाचे सखोल तत्वज्ञान साहित्याच्या माध्यमातून साहित्यिकानी समाजाला सांगावे साहित्य हा समाजाचा आधारस्तंभ आहे
आजच्या शिक्षकाविषयी नाना म्हणतात , की शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास न करता खेळांना प्राधान्य देऊन त्यांचा शारीरिक विकासही करावा व नैतिक मुल्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे . शिक्षक हया शब्दाची संकल्पना ते अशी करतात
शि - स्वत : ची
शिस्त क्ष - क्षमता
क - कर्तव्य
विद्यार्थी हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून त्याला विज्ञानवादी भूमिकेतून जीवनाच्या दिशा शोधायला लावायला पाहिजे .
आज धर्माविषयी अनेकांची अनेक मते आहेत . परंतु नानासाहेब ' मानवता ' हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानतात . मानवी संस्था टिकविण्यासाठी नानांना निर्लेप असे मानवी जीवन हवे आहे . जातीभेदाच्या , धर्मभेदाच्या पलिकडे त्यांची दृष्टी स्थिर झाली आहे . ' सत्यनीति धर्म ' हेच खऱ्या धर्माचे मर्म आहे . साने गुरुजींप्रमाणे मानवाने एकमेंकावर प्रेम करावे , बुद्धीवादाने जीवनाच्या दिशा शोधाव्यात व आपल्या कर्तव्यात सातत्य ठेवावे असे ते आपले विचार मांडतात .
परंपरेने वारकरी सांप्रदायाचे तत्वज्ञान नानासाहेबांच्या घरात नांदत होते . त्यातच साने गुरुजी , विनोबा भावे , गांधीजींची प्रेरणा नानासाहेबांना मिळाली . Man is not developed they develop themselves असे विधान प्रसिद्ध विचारवंत डॉ . नेरेरे करतात . परंतु समाजाचा किंवा स्वत : चा विकास करण्यासाठी कोणते तरी तत्वज्ञान घेऊन मार्गक्रमण करावे लागते . नानांनी ' ईश्वर जन जो तेणे कहीत् जो दिन पराये जाने रे ' या तत्वाचा आयुष्यभर पुरस्कार केला .
शिक्षण हे समाजसुधारणेचे मूळ आहे . जीवनाचे दर्शन घडविणारे महान साधन आहे . शिक्षण हीच ग्रामीण समाजाची गरज आहे . यावर नानासाहेबांचा दृढ विश्वास होता . नानांच्या ज्ञानदानाच्या महान कार्याला प्रतिकुलतेच्या रखरखत्या उन्हात सुरुवात झाली . परंतु प्रतिकुलतेशी झुंज घेणारेच समाजाचा चेहरामोहरा बदलत असतात . मानभंग , उपेक्षा हे शब्द त्यांच्या शब्दकोषात नसतात . नाना त्याच परंपरेचे पाईक होते . आपल्या जीवनात तत्वनिष्ठ भूमिका व चिरंतन जीवनमुल्यांना त्यांनी महत्वाचे साहित्य हा नानासाहेबांचा आवडता प्रांत , साहित्य हे स्थान दिले .
नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला विश्वात्मक अधिष्ठान आहे . अनेक गुणांचे एक अभूतपूर्व रसायन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकरुप झाले आहे . ते कुशल संस्थाचालक आहेत , शिक्षणतज्ज्ञ आहेत , साहित्यप्रेमी आहेत . मराठी भाषेचे प्रेमदाते आहेत . याही वयात काम करण्याचे सातत्य आहे . जीवनाच्या ह्या नम्र उपासकास ईश्वर दीर्घायुष्य देवो हेच अभिष्टचिंतन !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा