मुख्य सामग्रीवर वगळा

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

 

 ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.
    भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगाव शाखेत अध्यापक म्हणून माझा प्रवेश झाला .तेथून राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव येथे बदली झाली व   त्यानंतर माध्यमिक विद्यालय रांजणगाव येथे मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली . त्यामुळे सुदैवाने नानासाहेबांचा सहवास मला लाभला . त्यातून त्यांच्या जीवन कार्यपद्धतीची जवळून ओळख झाली . त्यांनी केलेल्या विशाल , उत्तुंग , उदात्त पवित्र - शैक्षणिक कार्याचा मी एक साक्षीदार आहे .
  शिक्षणाचे त्रिकालबाधीत महत्त्वाचे सत्य जाणून शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी भगिरथ प्रयत्न करणारे माननीय नानासाहेब य . ना . चव्हाण हे एक खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षि आहेत . बहुउद्देशिय शिक्षण प्रणालीद्वारे सामाजिक , राजकीय , आर्थिक समतेचा सुखी , सुसंस्कृत , सुदृढ समाज निर्मितीचा दुरदर्शीपणा ठेवून त्यांनी ज्ञानदानाचे ४८ वर्षांपूर्वी बीजारोपण केले . त्याचे आज प्रचंड वटवृक्षात रुपांतर झालेले आहे . अनेक वर्षापूर्वी आजच्या प्रमाणे कोणत्याही प्रकारच्या शासकीय सोयी , सवलती नसतांनाही त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण संस्थेची स्थापना करुन समस्यांची आव्हाने स्वीकारीत व तितक्याच तत्परतेने समस्या सोडवित त्यांनी शैक्षणिक कार्य अव्याहतपणे सुरु ठेवले . विद्यालयांसाठी स्वत : च्या मालकीच्या भव्य इमारती , प्रशस्त क्रीडांगणे , सुसज्ज प्रयोगशाळा , समृद्ध ग्रंथालये आदींसाठी त्यांचे अथक प्रयत्न चालू राहिले . त्यासाठी संस्थेला निधी , वर्गणी , देणग्या मिळविण्यासाठी त्यांची ऊन , वारा , पाऊस , थंडी या मध्येही पदयात्रा चालू राहायची . विद्यार्थीदशेत स्वानुभवलेल्या समस्या , अडीअडचणी , व्यथा यांची त्यांना पूर्ण जाण असल्यामुळे निराधार , गोरगरीब , दीनदुबळ्या , उपेक्षित व सर्वसामान्य मुलामुलींची स्वप्ने साकार होण्यासाठी , बालवाडी ते महाविद्यालय , अंधशाळा , आश्रमशाळा , विद्यार्थी वसतीगृह , कन्या छात्रालय आदींची अपार कष्टातून उभारणी करुन ज्ञानदानाचे व ज्ञानसंवर्धनाचे पवित्र कार्य सुरु ठेवले . आजच्या समाजासाठी हीच आधुनिक तिर्थक्षेत्रे ठरावित , केवळ व्यावसायिक , शैक्षणिक , कारखानदारी न करता बहुउद्देशीय शिक्षणप्रणाली स्वीकारुन वैज्ञानिक , तांत्रिक आदी विद्या शाखा उघडून ज्ञानाची क्षितीजे अधिक उंचावलीत , विस्तारीत केलीत . सामाजिक उत्तरदायित्वाची जाण ठेवून विद्यार्थीनीसाठी स्वतंत्र कन्या विद्यालय व कन्या छात्रालय अनेक वर्षांपूर्वी सुरु करुन महात्मा फुले , शिक्षणमहर्षि कर्वे आदि समाज सुधारकांची स्त्री शिक्षणाची ध्येयवादी परंपरा नानासाहेबांनी पुढे चालू ठेवली . निराधार , उपेक्षित , परावलंबी , दुःखी , अंधजनांच्या रुक्ष , निरस जीवनातील अंधार दूर करुन त्यांच्या जीवनता आनंद , चैतन्याचा फुलोरा फुलविण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास जागृत करुन ते स्वावलंबी होण्यासाठी त्यांना नवी वेगळी दृष्टी देण्यासाठी त्यांनी अंधशाळेची स्थापना केली . यातून त्यांची करुणा , मानवता प्रतिबिंबीत होते . निराधार , निराश्रीत , उपेक्षित , दीनदुबळ्या गोरगरीबांसाठी आश्रमशाळा उघडल्यात . क्रीडा , कामगार , धार्मिक , सांस्कृतिक , सामाजिक शिक्षण आदी क्षेत्रातील सक्रीय योगदानातून   आदरणीय नाना साहेबांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची साक्ष मिळते . उत्तुंग , विशाल कर्तृत्वातून किर्ती , मानसन्मान प्रतिष्ठा लाभून देखील ते प्रसिद्धीपासून दूर राहिलेत । पदप्रतिष्ठेचा कधीही दुरुपयोग केला नाही . उच विद्याविभूषित । असूनही अहंकार दाखविला नाही . शांत , सालस , सोज्वळ , संयमी ,  निगर्वी , निस्पृह , निस्वार्थी स्वभाव गुणांमुळे त्यांच्या किर्तीत तेजोवलय अधिकच प्रभावीपणे खुलून दिसते . साधी राहणी , उच्च विचारसरणीचे प्रतीक म्हणजे माननीय नानासाहेब चव्हाण ! सानेगुरुजींच्या सेवा , त्याग , करुणा या सारख्ये नीतिमूल्यांवर आधारित ध्येयवादी जीवनाचा मार्ग त्यांनी अनुसरला . ' बहुजन हिताय , बहुजन सुखाय ' असे मानून सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी , कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले . एका सेवाभावी समर्पित जीवनाती ती एक गाथा आहे . ' कर्म हाच धर्म ' हे जीवनाचे सूत्र समजून या कर्मयोग्याची पूजा , यात्रा अखंडपणे चालू आहे .आदरणीय नानासाहेबांच्या शक्षण कार्याचा गौरव भविष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहीला जावा असे महान ,उदात्त ,पवित्र कार्य केल्याने ते खरया पूर्णार्थाने शिक्षण महर्षी झाले आहेत.माननिय नानसाहे 'यशवंत' आहेत.ते 'किर्तीवंत' आहेत,ते 'आयुष्यवंत' होवोत . हीच प्रभुचरणी प्रार्थना.     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...