मुख्य सामग्रीवर वगळा

सामाजि कृतज्ञतेचा एक आदर्श(प्रा.डाॅ.एस्.एम्.विसपुते राष्ट्रीय महाविद्यालय ,चाळीसगाव)

 

 महाराष्ट्राची भूमी म . जोतिराव फुले , राजर्षी शाहु  महाराज , महर्षि धोंडू कर्वे , भाऊराव पाटील यांच्या कार्याने व त्यागाने पावन झालेली आहे . याच भूमीत आज सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात उदासिनता निर्माण झालेली आहे . पण या उदासिनतेच्या काळोखात आदर्शाचा एक प्रकाश अजून तेवत आहे तो नानासाहेबांच्या कर्तृत्वातून . कर्मवीर नानासाहेबांचा जन्म खानदेशाच्या समृद्ध व पवित्रभूमीत रांजणगाव येथे झाला . त्यांचे वडील व सर्व कुटुंबच आध्यात्मिक , धार्मिक प्रवृत्तीचे , सत् चारित्र्याचे आई - वडिल आणि काका मा . कै . हरीभाऊ चव्हाण यांच्याकडून त्यांना सामाजिक सेवेचा , शैक्षणिक कार्याचा व सद्गुणाचा वारसा मिळाला . लहान वयापासूनच त्यांच्यावर आध्यात्मिक , समाजसेवेचे व सुसंस्कारांचे संस्कार झालेत . म्हणूनच देशभर पेटलेल्या स्वातंत्र्याच्या होमकुंडात त्यांनी स्वत : ला झोकून दिले होते . १ ९ ४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनातील गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे करा अथवा मरा ! हा महामंत्र व त्यांची प्रेरणा घेऊन ' भारत छोडो ' आंदोलनात शिक्षण सोडून भाग घेतला . त्यात त्यांना अल्पकाळ शिक्षा झाली . शिक्षा संपल्यावर देखील भूमीगत राहून त्यांनी  जनजागृतीचे कार्य काकांच्या प्रेरणेतून केले. त्या नंतर  शिक्षण पूर्ण केले . कायद्याची पद् वी पुण्यासारख्या शहरात घेऊन देखील भौतिक सुखाच्या आहारी न जाता, शहरी जीवनाची कास न धरता ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी चाळीसगाव शहरात शिक्षकाची नोकरी स्वीकारली .

   चळवळीला जोडून घेणे व त्या चळवळीच्या प्रवाहात स्वतःला झोकून देणे हा नानासाहेबांचा जणू छंदच आहे . त्या जोडण्यात आणि झोकून देण्यात स्वत : च्या संसाराची कोणतीही काळजी न करणे हा त्यांचा स्वभाव , स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात १ ९ ४२ च्या आंदोलनात त्यांनी स्वत : ला झोकून दिले . अगदी स्वातंत्र्यानंतरच्या शैक्षणिक चळवळीत स्वत : ला वाहून घेतले . विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन चाळीसगाव तालुक्यात शिक्षणाची गंगोत्री आणली . ज्या काळात जेथे पाऊलवाटही नव्हती अशा ग्रामीण भागातील गरीब व शेतकऱ्यांच्या मुलांना शिकायला मिळावे म्हणून प्रथम राष्ट्रीय वसतीगृह स्थापन केले . मुलांसाठी राहण्याची व खाण्याची सोय केली . वसतीगृहातील मुलांना सुसंस्कारीत करता यावे , त्यांच्यासाठी जास्त वेळ देता यावा म्हणून स्वत : च्या प्रपंचाची नोकरी सोडली . महात्मा जोतिराव फुले , महात्मा गांधीजी , हरीभाऊ चव्हाण , शाहू महाराज , कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची शिदोरी घेऊन शैक्षणिक क्षेत्रात विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ३१ डिसेंबर १ ९ ५३ रोजी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली . कै . हरीभाऊ चव्हाणांची प्रेरणा व आशीर्वादाने राष्ट्रीय विद्यालयाचे उद्घाटन केले . त्यायोगे सामाजिक बांधिलकीची जाण व समाज कृतज्ञतेचा भाव होता . ह्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा  ग्रामीण भागात ज्ञानार्जनासाठी सुरु केल्यात . त्यात प्रसंगी चिखल तुडवीत अथक परिश्रम केले . त्यांच्या त्यागातून ग्रामीण भागातील झोपड्यातून तेजाचे दिवे चेतविलेत . ज्या कुटुंबात कधीही शिक्षणाचे किरण पोहचणे शक्य नव्हते त्या घरात शिक्षणाचा प्रकाश गेला . त्यातून असंख्य कुटुंब उजळून निघालीत . चाळीसगाव , पाचोरा , भडगाव तालुक्यातील दुर्गम भागापर्यंत शिक्षणाचा नंदादीप पेटवला . त्यामुळे सामान्य शेतकऱ्याची व कष्टकऱ्यांची मुले शिकून सुजाण झालीत व कष्टक - यांच्या संसारात नवा फुलोरा फुलला आहे . नानांनी हे कार्य करतांना कुणाकडूनही काही अपेक्षा केली नाही . निष्काम सेवाव्रताचे फक्त पालन केलेले आहे . संस्थेचे संस्थापक , चिटणीस , उपाध्यक्ष व चेअरमन ही महत्वाची पदे भूषविलीत व त्यात आदर्श आणि ध्येयवेड सोडलेले दिसत नाही . अहंमभाव दिसत नाही . आपण उभारलेल्या शिक्षण संस्थेलाच आपला संसार समजून संस्थेच्या सर्व शाखांवर पितृवत प्रेम आणि सहकार्य केले . त्यादृष्टीने ते पितामह आहेत . पाऊस , ऊन , वारा , थंडी यांची तमा न करता आपल्या ह्या मुलांना सुदृढ करण्याचा , गुणवत्तेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला . त्यासाठी मानापमानाची तमा केली नाही . निग्रही व नि : स्वार्थपणे निरंतर संस्थेला खतपाणी देण्याचे कार्यात सातत्य ठेवले . आजच्या धकाधकीच्या जीवनात हा सामाजिक कृतार्थाचा महान आदर्श आहे . भावी पिढीला व आम्हाला आपले कार्य व जीवन दीपस्तंभासारखे आहे . त्यामुळे आपले शारीरिक वय वाढले पण कामाचे वय आणि मन मात्र तरुणांना लाजवणारे असेच आहे . ते आम्हाला प्रेरणा व उब देणारे आहे . आपल्या द्रष्ट पणाने , निष्कामसेवेने , कृतीशिलतेमुळेच संस्थेच्या एकूण ४६ शाखांचा प्रचंड वटवृक्ष आज डौलाने उभा आहे . आपल्या प्रगल्भ विचारांचे प्रतिक ठरावे असे राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय , दुर्गम  भागातील आश्रमशाळा , माध्यमिक विद्यालये व संगणक विभाग आहेत . 

  बहुजनांची भाषा आणि संवेदना आपल्या कर्तृत्वातून जिवंत ठेवणारा हा कृतिशील माणूस वयाच्या उतरणीवर सुद्धा चढत्या क्रमाने नवी क्षितीजे शोधतो . भ्रमंती , मोठा गोतावळा , मंगलवाङमयाविषयी प्रेम त्यांच्या कृतीतून व साध्या बोलण्यातून स्पष्ट होते.राहणीत  साधेपणा , वागण्यात आत्मीयता , सहानुभूती , मुत्सद्दीपणा , हुशार । व कलावंताबद्दल आदर , अथक परिश्रम , ध्येयवेड असे नवनीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत . शिक्षणाचा विलक्षण ध्यास हा तर त्यांचा श्वासोच्छवास् झाला आहे . दरवर्षी , दररोज नानांच्या डोक्यात नव्या योजना , नवे विचार , नवे कार्य , नवे प्रकल्प ह्यांचे स्फुल्लींग बाहेर पडत असते . त्यांच्या ह्या नव्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांनी भूदान पथकात सहभाग दिला.  विद्यापीठ जळगाव जिल्ह्यात व्हावे म्हणून प्रयत्न , गीताई पदयात्रा , गाडे गुरुजी पदयात्रा , भावजागरण दिंडी , संगणक विभागाचे अत्याधुनिककरण यात झोकून देवून नवी दृष्टी दिली . नवा कार्यक्रम व प्रेरणा दिल्यात .     सामाजिक कृतज्ञतेचे कार्य करतांना निंदा , टीका व स्तुतीची पर्वा केली नाही . विरोधकांच्या कारवायांना डगमगले नाहीत . आपल्या जीवनाने व कृतीशीलतेने समाजाला पेटवून , करुणेला लपेटून ७५ व्या वर्षात आपण पदार्पण केले . येणारा प्रत्येक दिवस समाधानाचे , तृप्तीचे वलय घेऊन तुमच्या भावी जीवनात अविरत प्रकट होवो , आभाळा येवढा माणूस पण पाय मातीचे असल्याने जननी व जन्मभूमीचे पांग फेडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या कृतार्थतेचा आपण आदर्श नमुना आहात . आपल्या अमृतमहोत्सवी संमारंभाच्या निमीत्ताने हे श्रध्दारूपी शब्दफूल अर्पण   करुन लाख लाख प्रणाम . आपण शंभर वर्षे जगावे , ही प्रभुचरणी प्रार्थना आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...