नासाहेब चव्हाण यांचा अमृतमहोत्सव . यशवंतराव चव्हाण यांनी जीवनाची ७५ वर्षे पूर्ण केली म्हणून त्यांच्या आजवरच्या कामाची कृतज्ञता म्हणून त्यांच्या सुहृदनांनी , अभिनंदनाचा , सदिच्छेचा , शुभचिंतनाचा कार्यक्रम योजला ही फार यथोचित गोष्ट आहे . साने गुरुजी कथामालेचे कार्यकर्ते , मग कोषाध्यक्ष म्हणून मी नानांकडे बघत होतो . त्यांच्या सामाजिक कार्याची मला कल्पना नव्हती . एक सत्वशील , सतत कार्यात मग्न असणारा , वक्तशीरम्हणून मी दुरुन त्यांच्याकडे बघत होतो . प्रत्यक्ष कथामालेच्या सक्रीय कार्याशी माझा संबंध नसल्यामुळे व सतत चालणाऱ्या नित्याच्या कार्याबद्दल जास्त माहिती मी करुन घेत नसल्यामुळे प्रत्यक्ष त्यांचा फक्त जुजबी संबंध यावयाचा , पण साने गुरुजी कथामालेने पू . जमनालाल बजाज यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मुलांना जमनालालजींचे जीवन गोष्टीरुपाने सांगण्याची जबाबदारी स्वीकारुन जेव्हा कार्य हाती घेतले तेव्हा खान्देशमध्ये सधन कार्य करण्याचे ठरविले . त्यावेळी मला चाळीसगावी जाण्याचा प्रसंग आला . आणि नकळत नानांचे कार्य जवळून पहाण्याची संधी मिळाली . केवढा मोठा शिक्षण पसारा त्यांनी उभारला . किती शाळा व शैक्षणिक प्रकल्प उभे केले . सर्वत्र शिस्त , संयोजन व शास्त्रीय विचार याचा सुरेख संगम निर्माण केला . सर्वत्र सौंदर्याची जाण ठेवली , मंगलमय वातावरण निर्माण केले व संस्कृतीची प्रेरणा मिळेल अशीरा . ग . मोहार्ड अध्यक्ष , कुष्ठरोग निवारण स परिस्थिती सर्वत्र पसरविली , उत्तम इमारती , आतबाहेर संयोजन आणि आधुनिक साहित्य यामुळे ग्रामीण भागातील विद्यालयेही सरस्वतीची मंदीरे झाली. हजारो शिक्षणाला वंचित असणाऱ्यांची सोय केली . हे सर्व पाहत असतांना नानांच्या दूरदृष्टीची कल्पना आली . कार्याचा व्याप पाहीला आणि आश्चर्याने थक्क झालो आणि हे सर्व प्रचार ,प्रसीध्दी पासून दूर राहून , कोठे फोटो नाही , सत्कार नाही की वाच्यता नाही. एक सव्यसाची कार्यक्षम कार्यकर्ता , विधायक प्रवृत्तीचा, विशाल दृष्टीकोनाचा , सरळ मनाचा , शुद्ध चारित्र्याचा प्रामाणिक प्रवृत्तीचा मनुष्य सातत्याने ध्येयवादाने एकनिष्ठे काय काम करू शकतो याचा आदर्श नानांनी घालून दिला आहे . नानांचे वैशिष्ट्य म्हणजे नानांनी एक टीम तयार केली आहे. सेवावृत्तीने कामाची धुरा वाहण्याची ताकद त्यांच्यात आहे.दिलेले कामच नव्हे तर नवीन कार्य हातात घेणे , व्यवस्थि पार करणे याचा आत्मविश्वास त्यांच्यात आहे . निर्णय घेण्याचे धैर्य आहे.त्यामुळे त्यांच्या कामाला गती आहे , अंतर्गत स्पर्धा आहे ,नवनवीन प्रयोगाला सुसंधी आहे म्हणून सर्वत्र विकास आहे . नानांचा साधासुधा वेष , शुभ्र पांढरी टोपी , धोतर व शर्ट यात बदल आढळत नाही . पण त्यातच त्यांच्या स्वच्छ मनाचे, चिंतनशिल चारित्र्याचे व सेवावृत्तीचे दर्शन घडते . सव्यसाची जीवनशैलीची प्रचिती त्यांच्या सानिध्यात आले म्हणजे हा सर्वांग परिपूर्ण माणूस कळतो. . राष्ट्रीय गाणी असो , गोष्ट असो वा शैक्षणिक विचार असो , शास्त्रीय विवेचन असो की आधुनिक प्रबोधन असो त्यांच्या शांत व मुद्दे सूद वाणीने त्यांची छाप पडते. . प्रामाणिकपणाची प्रचिती येते व नकळत त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो . एक सज्जन , सहृदयी , सतिप्रवृत्त , स्नेही मिळाल्याचा आनंद होतो . नाना तसेच सुदैवी आहेत . सुखी समाधानी , सुशिक्षित , संस्कृत कुटुंबाचे ते कुटुंब प्रमुख आहेत . जीवनाला आज आणखीकाय पाहिजे ? नानांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर समाज जीवनातही मानाचे , सन्मानाचे व आदराचे स्थान निर्माण केले आहे . घराण्याचा तो वारसाच आहे . अमृतमहोत्सव निमित्ताने लोकमानसातील त्यांची प्रतिमा अनेकांना प्रेरणा देईल अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांना आयुरारोग्य लाभो हीच प्रार्थना .
माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण , सा.न.वि.वि. आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते . नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा