मुख्य सामग्रीवर वगळा

शिक्षण - महर्षि- श्री.नानासाहेब चव्हाण(श्री.गोविंदराव शिंदे,प्रमुख कार्यवाहक,अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला शांतीवन ,पुणे)


  चाळीसगावचे शिक्षण महर्षी श्री. नानासाहेब चव्हाण  यांचा ७५ वा वाढदिवस अमृतमहोत्सव 7 जानेवारी १ ९९ ८ रोजी त्याच्या जन्मगावी चाळीसगावला साजरा होत आहे .है ऐकून खूप आनंद झाला . चाळीसगाव है जळगाव जिल्हातील एक प्रमुख शहर आहे . तेथे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ ही  संस्था नानासाहेबांनी स्थापन केली . त्या संस्थेचे चेअरमन म्हणून आज ते काम पहात आहेत , सर्वस्व झोकून देणारे खंबीर नेतृत्व संस्थेला मिळालं आहे . त्यामुळे संस्थेची गेल्या ४८ वार्षात केवढीतरी भरभराट झाली आहे . या संस्थेचे आज एका प्रचंड वटवृक्षांमध्ये रुपांतर झालेले आहे . विद्यादान हे सर्वश्रेष्ठदान आहे . तळागाळातील खेड्यात वास्तव्य करत असलेल्या सामान्य विद्याथ्याला शिक्षण सहजपणे मिळेल यादृष्टीने संस्थेने सर्वत्र शाळा सुरु केल्या आहेत , शाळेची भकम इमारत , सुसज्ज प्रयोगशाळा , विपुल ग्रंथ संख्या , समृद्ध ग्रंथालय. या सर्व शाळांतून हजारो विद्यार्थी शिकून मोठमोठ्या थोत्रात काम करत आहेत . 

   श्री . नानासाहेबांनी शिक्षणाचे काम एकांगीपणे केले नाही , त्यासाठी जनशक्ती उभी केली . त्यामुळे एवढे प्रचंड काम ते व त्यांचे सहकारी उभे करु शकले . शिक्षणामध्ये मुलांना नैतिक शिक्षण मिळेल यासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरु केले . मुलांवर लहानपणी चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी आपल्या शाळांमधून साने गुरुजी कथामालेचे काम प्रभावीपणे वाढवले . त्यामुळे त्यांच्या संस्थेला यंदाचा सानेगुरुजी बालसेवा पुरस्कार मिळाला आहे . गोष्ट ही परिणामाने , प्रभावाने व सामर्थ्या ने महान आहे . गोष्टीचे हे सामर्थ्य श्री . नानासाहेब चव्हाणांनी जाणलं व वाढवलं .

       शिक्षणाच्या कार्याबरोबर त्यांनी सामाजिक काम व्यापक प्रमाणावर केले . प्रथम माझी त्यांची भेट आचार्य विनोबाजींनी सुरु केलेल्या भूदान यज्ञ आंदोलनाच्या निमित्ताने झाली . त्यावेळी सर्वत्र जाऊन सामुहिक पदयात्रा काढून खेड्यापाड्यात हिंडत असू १ ९ ६० साल असावं . जळगाव जिल्ह्यातील या कामाचे एक शिबीर चाळीसगावला झालं . शंभरावर कार्यकर्ते आम्ही जमलो होतो . त्यावेळची आमची ती सामुहिक पदयात्रा अत्यंत यशस्वी झाली . स्वत : मागे राहून काम कसं यशस्वी करायचं हे त्यावेळी आम्हा मंडळींना शिकायला मिळालं . अ . भा . साने गुरुजी कथामालेत त्यांच्या सोबत अनेक वर्षे काम करत आहे . फार बोलायचे नाहीत . बोलतील ते ठाम व निर्णायक असेल . त्यांच्यांशी कुणाच कधी भांडण झाल्याचं मी पाहिलं नाही ते कधी कुणावर रागावलेलेही दिसले नाहीत . आपलं काम चोख करण्याची त्यांची वृत्ती . स्वत : सर्व लक्ष घालून करणार , समाजातला जो शेवटचा आहे त्याच्याकडे त्यांचे लक्ष असते . त्यामुळेच गरीब पददलीत मुलांसाठी त्यांनी फार मोठे काम केले आहे . आम्ही धुळे जिल्ह्यात सातपुड्यात धडगाव भागात अगदी जंगलात आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे काम करतो . नानासाहेबांनी ते एकदा पहाव म्हणून त्यांना तिकडे एका कार्यक्रमाचे निमित्ताने घेऊन गेलो . जंगल भागातल्या आमच्या शाळा पाहून नानासाहेबांना खूप आनंद झाला . त्यावेळी त्यांची विद्यार्थ्यासाठी जी उत्स्फूर्त भाषणे झाली ती त्या आदिवासी मुलांना प्रेरणादायक ठरली . करी मनोरंजन जो मुलांचे , जडेल नाते प्रभुशी त्याचे असे नानासाहेबांचे अद्भूत जीवन आहे . त्यांचे जीवन असेच मुलांसाठी कार्यरत राहो व त्यांना निरोगी भरपूर आयूष्य लाभो ही प्रार्थना .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...