मुख्य सामग्रीवर वगळा

य.ना.चव्हाण तथा नानासाहेब एक कर्मविर शिक्षणमहर्षी( डाॅ.एम्.टी.तेली ,प्रपाठक,भौतिकशास्र विभाग,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ,औरंगाबाद)

 

ज्यांचा स्वभावात सज्जनता , सहृदयता व संतांचे गुण असतात अशा व्यक्तिंना असे वाटत असते की आपल्या वाट्याला शिक्षण घेतांना जीवनाची चढण चढतांना ज्या हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागले . वाईट व लाजीरवाणी परिस्थिती भोगावी लागली अशा हालअपेष्टा , परिस्थिती इतरांच्या वाट्याला येऊ नये व त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे हे गुण , ही विचारसरणी श्री . य . ना . चव्हाण तथा नानासाहेबांची होती आणि म्हणूनच त्यांनी १ ९ ५० पासून आजतागायतच्या काळात चाळीसगाव परिसरातील लोकांसाठी शैक्षणिक सुविधांचा अभाव व विद्याथ्यांची वसतीगृहाची उणीव दुर करायचा चंग बांधून लोकसेवेला वाहून घेतले व इ.स. १ ९ ५० मध्ये चाळीसगाव येथे राष्ट्रीय वसतीगृहाची उभारणी करुन आपल्या कार्याची मुहुर्तमेढ रोवली . त्यांना स्वतःला शिक्षणासाठी धुळे , पुणे असे भटकत कोणातरी सज्जनाच्या घरी आश्रय घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे लागले . अडचणी बरोबर वयही वाढत गेले . परंतु उशीरा का होईना त्यांनी बी ए . एल.एलबी पर्यंतचे शिक्षण त्या कठिण काळात पूर्ण केले . त्यांच्यासारखीच गुणी मुले चाळीसगाव परिसरात गरीबीत खितपत पडलेली बघुन त्यानी प्राथमिक व माध्यमिक शाळा चाळीसगाव व आसपासच्या खेड्यात उदा.पातोंडे , वाघळी , हिरापूर , तळेगाव , रांजणगाव , पाटणादेवी इ . ठिकाणी उघडून शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या . त्या काळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे ए.बी. हायस्कूल व कॉलेज होते . व तेथे. शिक्षणाच्या सोयी उच्च दर्जाच्या होत्या . पण ही शिक्षणसंस्था ग्रामीण . भागात उतरली नाही . तिचे कार्यक्षेत्र शहरी भागापूरते मर्यादित राहिले . या पार्श्वभूमीवर नानासाहेब चव्हाणांचे कार्य महान आहे . 
    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी नानासाहेबांनी शिक्षणसोयी त्यांच्या दारात आणून द्यायचा प्रयत्न केला . त्यात शहरी श्रीमंती नसेल , पडके घर , पडकी मोडकळीस आलेली एखादी जिनींग फॅक्टरी , अल्पश : भाड्याने घेऊन त्यात विद्यार्थी व शिक्षक यांच्या श्रमदानाने चिखल , माती वापरून डागडुजी करुन वरुन पत्रा किंवा धाबे बनवून विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उन्हापासून सावली व पावसापासून निवारा मिळवून दिला . ज्याला शिकविण्याची आवड , तळमळ आहे असे सुविद्य व ज्ञानी शिक्षक नेमण्याचा प्रयत्न केला . आर्थिक पुरवठा करण्यासाठी प्रत्येकी चार आणे याप्रमाणे विद्यार्थी , पालक व परिसरातील रहिवाशी यांचेकडून ऐच्छिक वर्गणी गोळा केली . 
  अशा सुरु केलेल्या शैक्षणिक सुविधांचा ज्या विद्याथ्यांना फायदा घ्यायचा होता त्यांनी घ्यायचा होता . नानांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन होतेच , शैक्षणिक प्रकल्प उभारण्याचा उद्देशच तो होता . बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशा सवलतींचा फायदा घेतला . त्यात मी एक होतो , इ.स. १ ९ ५ ९ साली ३ वर्षांच्या शिक्षण खंडानंतर मी नानांनी वाघळीच्या सुरु केलेल्या हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला . वाघळीला हायस्कूल सुरु करायला नानांनी आणखी १/२ वर्षे उशीर लावलाअसता तर कदाचित मी हायस्कूलचे व तद्नंतरचे उच्च शिक्षण घेऊ शकलो नसतो व मी आज जो एक नामांकित प्राध्यापक व शास्त्रज्ञ आहे तो होऊ शकलो नसतो . माझ्यासारखाच फायदा मिळणाऱ्यात वड्याळ्याचे श्री . खुशाल गोजर पाटील ( बी.ई. ) नुतन मराठा कॉलेजचे प्राचार्य डॉ . के . आर . सोनवणे व डॉ . शिवाजी नाना पाटील ( एम.बी बी एस् . ) . औरंगाबादचे श्री . तेजकिरण आशकरण चोपडा ( बी.ई. ) , वाघळीचे डॉ . अभिमान कडू माळी ( एम.बी.बी.एस् . ) , गुरांचे प्रसिद्ध डॉक्टर श्री . भंगाळे इ . अनेक नामवंत व्यक्ती इतर परिसरातून नानासाहेबांनी सुरु केलेल्या हायस्कूलमधून निर्माण झालेल्या आहेत . असे आम्ही सर्व जण नानासाहेबांचे आयुष्यभर ऋणी आहोत . 
    साने गुरुजींची पुस्तके व वाङमय वाचून माझ्या मनात साने गुरुजींविषयी आदर व ओढ निर्माण झाली . नानासाहेबांची विचारसरणी , राहणीमान व व्यक्तिमत्त्व साने गुरुजींसारखे होते . त्यामुळे मला त्यांचा सहवास हवाहवासा वाटु लागला . म्हणून मॅट्रीक झाल्यावर मी नानांना विनंती केली की , मला आपल्या संस्थेत सामावून घ्यावे . नानांनी माझी व्यवस्थित समजूत काढली . उच्च शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले व उच ध्येयाची प्रेरणा देऊन मार्गदर्शन केले . त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरीत होऊन मी पुढील उच्च शिक्षणाची वाटचाल सुरु केली . तथापि प्रत्येक सुट्टीमध्ये चाळीसगावी आल्यावर नानांची भेट घेऊन त्यांना माझ्या शिक्षणाचा अहवाल सादर करुन पुढील मार्गदर्शन घेतल्याशिवाय मी राहात नसे . माझे शैक्षणिक जीवन घडविण्यात प्राचार्य म . वि . फाटक , प्रा . द . ऊ . काकडे , प्रा . व्ही . डी . जोशी , प्रा . जी.डी. राठोड , अमळनेरचे प्रा . व्ही . पी . नेने , पुण्याचे प्रा . व कुलगुरु राम ताकवले , कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु कै अप्पासाहेब पवार यांची भर पडली . या सर्व भरभराटीला नानासाहेबांचे योगदान कारणीभूत झाले म्हणून अशा थोर कर्मवीर शिक्षणमहर्षि महात्म्याला माझे शतश : प्रणाम .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...