मुख्य सामग्रीवर वगळा

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि.चाळीसगाव(माधव साखरदंडे,मुंबई)

 

४५ वर्षाच्या अवधीत एका तालुक्याच्या शहरात स्थापन झालेली शिक्षणसंस्था फुलारते , डवरते , आहे आणि एखाद्या वटवृक्षासारखी ती अनेक शाखा,उपशाखांची अक्षरश: सावली होते.  

    ही चित्तरकथा आहे चाळीसगावच्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण  प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची आणि त्या वटवृक्षाची पेरणी आणि  मशागत करणाऱ्या एका चिरतरुण उत्साही व्यक्तिमत्त्वाची , नानासाहेब  तथा यशवंत नारायण चव्हाण , वय वर्षे ७५ फक्त ! 

    १ ९ ५० साली चाळीसगावात एक राष्ट्रीय वसतीगृह उभारुन  नानांनी आपल्या कार्याची मुहुर्तमेढ रोवली . १ ९ ५३ साली राष्ट्रीय  सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ सहकारी तत्वावर स्थापन करुन त्या  रोपट्याला एक दिशा दिली . ती दिशा होती राष्ट्रीयत्वाची , आपल्या एकात्मतेची , माणुसकीची , विश्वात्मकतेची . 

    शिक्षणाचा ढाचा कसा असावा ? त्यात कोणते विषय  असावेत ? इत्यादी विषयांचा उहापोह करणारे तीन चार आयोग आले - गेलेत . त्यांच्यावर शिक्षणतज्ज्ञ , शिक्षणसम्राट आदींनी खूप चर्चा केल्या . शेवटी जे काही निष्पन्न झाले ते आज आपल्या शिक्षण   व्यवस्थेच्या रुपात आपल्या समोर आहे .            या सर्व चर्चेतून आपल्या मोठमोठ्या शिक्षणतज्ज्ञांचे मत असे  झाले आहे की , आज शिक्षणात मुल्य विचार नसल्याने समाजाची  फार मोठी अधोगती होत आहे . तेव्हा राज्यकर्त्यांनी मोठा विचार  करुन शालेय शिक्षणात मुल्य शिक्षणाच्या एका तासिकेची भर घातली आणि सर्व आहे . या एका तासिकेच्या द्वारे मुलांना शक्यतोवर पहिल्या तासाच्या वेळी मुल्य शिक्षण द्यावे . त्यासाठी काही ठिकाणी मनाचे श्लोक काही ठिकाणी  ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाठांतरासाठी दिल्या जातात असे ऐकिवात आहे .या सर्व पार्श्वभूमीवर ४६ वर्षापूर्वी एका तालुक्याच्या गावी स्थापन झालेल्या एका सहकारी शिक्षण संस्थेने राबविलेला अभ्यासक्रम पाहिल्यावर मुल्य शिक्षणाचा गाजावाजा करणारयाना त्यांची इच्छा असल्यास आत्मपरिक्षणाची चांगली संधी मिळणार आहे.

     भविष्यवेध घेणा - या या शिक्षणसंस्थेने ११ वर्षापूर्वीच संगणक अभ्यासक्रम सुरु केला . पण आपला पाया मजबूत करण्यासाठी श्रमसंस्कारांचे मुल्यही ही संस्था प्राणपणाने जोपासत आहे . आपली विद्यामंदिरे , त्यांचा परिसर सुंदर हिरवागार करण्यासाठी या संस्थतेची मुले घडपडत असतात . दुष्काळी भागात मदत करण्यासाठी ती धावतात . अंघांच्या शाळा ही संस्था चालविते . बालकांमध्य असलेल्या सुप्त गुणांची जोपासना , वाढ करणे हा तर या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे . म्हणून चित्रकला , संगीत , नृत्य , नाट्य आदी कलांचा विकास करणान्या स्पर्धाही ही संस्था आयोजित करते आणि आयोजित केलेल्या अशा स्पर्धातून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा म्हणून प्रयत्न करते.

 आपल्या देशाची नीट माहिती व्हावी या हेतुने विद्यार्थ्यांच्या सहली काढल्या जातात . संसदीय लोकशाहीची माहिती देणारी व्याख्याने आयोजित केली जातात . राष्ट्रपुरुषांचे स्मृती दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात 

  आणि मुख्य म्हणजे ज्या साने गुरुजींनी मुलांवर अपार प्रेम करून त्यांची एक पिढीच घडवून राष्ट्र कार्यासाठी उद्युक्त केली त्या साने गुरुजींची कथानाला या संस्थेत जागृतपणे कार्यरत आहे .

   सर्व शिक्षक विद्यार्थी यांची ही सहकारी संस्था आहे . कारण या संस्थेचा मुळपुरुष स्वत: काम करणारा कार्यकर्ता आहे . त्याने आपल्या जीवनसंग्रामातून हे मुल्य संस्थेत आणि शिक्षक विद्यार्थी सहकार्यात रूजविले आहे.म्हणून हा वृक्ष असाच फोफावणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...