मुख्य सामग्रीवर वगळा

कर्मवीर नानासाहेब चव्हाण(श्री.मधु नाशिककर,संपादक-कथामाला ,नौपाडा,ठाणे)

 

चाळीसगावचे श्री.य.ना.उर्फ नानासाहेब चव्हाण अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे कोषाध्यक्ष झाले तेव्हा त्यांची आणि माझी पहिली भेट झाली . पांढरे शुभ्र धोतर त्यावर पांढरा शुभ्र सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी असा अत्यंत साधा वेश , विनम्र आणि मृदु बोलणे या त्यांच्या प्रथम दर्शनाने मी भारावून गेलो . 

  प्रथम मला असे वाटले की नाना कुणी काँग्रेसवाले राजकीय कार्यकर्ते असावेत परंतु जसजसा त्यांचा परिचय होत गेला तसे कळले की नाना कुठल्याही राजकीय चौकटीत काम न करता केवळ शैक्षणिक क्षेत्रात काम करत असून सामाजिक बांधिलकीने आणि समर्पित वृत्तीच्या भावनेने त्यांनी स्वत : ला या क्षेत्रात झोकून दिलेले आहे . नाना ध्येयनिष्ठ असून आपल्या विचारांवर दृढ आहेत . हे त्यांनी अनेकवेळा सभांमधून आपले विचार मांडले तेव्हा दिसून आले . नानांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात ७ जानेवारी १ ९ २३ रोजी झाला . आई - वडिल वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांच्यावर लहानपणीच संत वाडमयाचा प्रभाव पडला . नानांची आई अत्यंत कष्टाळू , प्रेमळ आणि सोशिक होती . तेच संस्कार नानांमध्ये बालपणी उतरले . नानांचे प्राथमिक शिक्षण म्हणजे पूर्वीची मराठी सातवी (व्हर्नाक्युलर फायनल ) आपल्या गावीच झाले . त्यावेळी ते जळगावा जिल्ह्यात १५०० मुलांत तिसरे आले . तरीही पुढे न शिकता शेती करुन सामाजिक कार्य करण्याचे त्यांनी ठरविले . कारण त्यावेळी  महात्मा गांधीच्या राष्ट्रीय आंदोलनाचा जोर होता . शेती करता करता नाना सामाजिक व राजकीय चळवळीतही भाग घेत होते . त्यावेळी त्यांना असे आढळून आले की आपण अधिक शिकले पाहिजे . तेव्हा त्यांनी हायस्कूल मध्ये प्रवेश घेऊन पुन्हा शिकायला सुरुवात केली १ ९ ४२ च्या चळवळीतही हायस्कूलमध्ये असताना आंदोलनात भाग घेतला आणि कारावासही भोगला . तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर आपले महाविद्यालयीन शिक्षण बडोदा येथे पूर्ण केले . बी . ए . झाल्यानंतर त्यांनी लॉ कॉलेजमध्ये कायद्याचेही शिक्षण पूर्ण केले आणि या काळात चाळीसगावच्या आनंदीबाई बंकट हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम केले आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून लौकिकही मिळविला . याच काळात त्यांना हायस्कूल मध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून आल्या . तेव्हा शिक्षणक्षेत्रासाठी जीवन देण्याचे त्यांनी ठरविले . शिक्षकी पेशातील नोकरीचा राजीनामा देऊन १ ९ ५४ च्या अखेरीस त्यांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना केली नाना स्वभावत : मृदु , सहनशील , बुद्धीवादी आणि दुसऱ्यासाठी सतत काहीतरी करण्याची प्रवृत्ती यामुळे त्यांचा मित्रपरिवार वाढत गेला आणि अनेक सहकारी त्यांना मिळत गेले . नानांनी स्थापन केलेल्या संस्थेचे काम नाना आणि त्यांचे सहकारी निरपेक्ष भावनेने  करतात . हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यात लोकांचे उदार सहकार्य मिळत गेले.

   नानांवर विद्यार्थी जीवनामध्ये महात्मा गांधी , आचार्य विनोबा आणि साने गुरुजी यांच्या जीवनाचा प्रभाव पडलेला होता आणि त्यामुळेच नानांनी आपला जीवनप्रवाह निश्चित केला . नानांचे सारे जीवन त्याग , करूणा , सेवा यावर आधारलेले आहे . ध्येयवादी आणि विनम्र सामाजिक कार्यकर्ते असा त्यांचा लौकिक आहे . नानांचा स्वतःचा परिवारही मोठा आहे . मुले , सुना सुशिक्षित आहेत परंतु नाना आपल्या घरच्या परिवारात न अडकून राहता त्यांनी निर्माण केलेल्या शिक्षणक्षेत्रातील बृहत परिवाराला स्वतःला वाहून घेण्याचे टरविले ते आजतागायत           आज जळगाव जिल्ह्यात ४५ वर नानांनी आणि त्यांच्या सहकार्यानी निर्माण केलेली बालवाडीपासून तो महाविद्यालयापर्यंतची सर्व शिक्षणकेंद्रे आहेत . ही केंद्रे उभी करताना नानांनी अगदी दगडाच्या पाट्या वाहून नेणान्या सेवकापासून तो संस्थेचे संचलन करणान्या अध्यक्षापर्यंतच्या सर्व भूमिका अत्यंत नम्रतेने आणि पूर्णतेने साकार केलेल्या आहेत . या शिक्षणक्षेत्रात त्यांची एक अंधशाळा आहे आणि साने गुरुजींचे आंतरभारतीच केंद्रही  आहे .                            

       साने गुरुजींच्या श्यामची आई सुवर्णमहोत्सवात त्यानी श्यामच्या आईच्या शेकडो प्रती घरोघर पोहचविल्या . तर विनोबांच्या गीताईच्या १०००० प्रती आणि गीता प्रवचनाच्या ५०० प्रतीह घरोघर पोहचविल्या . या प्रती घरोघर पोहचविल्या एवढेच नव्हे तर त्यांचे वाचन करण्यास सर्वांना प्रवृत्त केले .      नानांनी शिक्षण क्षेत्राखेरीज विविध क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

अशा या आमच्या नानांना ७ जानेवारी  1998 ला ७५ वर्ष पूर्ण    होतात आणि त्यानिमित्ताने त्यांचा अमृतमहोत्सव साजरा करायचे ठरविले नसते तरच नवल घडले असते . नानांचा अमृतमहोत्सव ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी चाळीसगाव येथे भव्य प्रमाणात होत आहे .   या निमित्ताने नानांच्या कर्ममय जीवनाला  माझे नम्र अभिवादन आणि नानांना त्यांच्या अभीप्सित कार्यासाठी आरोग्यमय दीर्घायुष्य लाभावे ही हार्दिक शुभेच्छा.


 .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...