मुख्य सामग्रीवर वगळा

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

 

सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली . 

     समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .

 अन्नम् दानम् महादानम् । 

विद्यादानम् महत्तमम् ॥ 

न अन्येय क्षणिका तृप्ती । 

यावत जिवतू विद्यया ॥

     या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्यापर्यंत पोहचवणाऱ्या राष्ट्रीय सह . शिक्षण-प्रसारक मंडळाने   कमी कालावधीत फार मोठी प्रगती व आपलं उद्दीष्ट साध्य केलं आहे . नानांच्या शाळा मला रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन सारख्या वाटतात . जिथे अंधार आहे कि दीपप्रज्वलीत करण्याची नानांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.  संस्थेजवळ सुरुवातीला आर्थिक , सामाजिक पाठबळ काही नसतांना नानासाहेबांनी शून्यातून राष्ट्रीय शिक्षण मंडळाचं विश्व निर्माण केलयं . आज तिथं सरस्वती नांदतेय . सरस्वतीची पूजा होते . खरं तर समाजकार्य करणं सोपं काम नाही . स्वत : चा संसार , मुलींची जोपासना , त्यांचे शिक्षण , आजारपण , नातेवाईक हे सर्व सांभाळून समाजकार्य करणं म्हणजे महाकठीण काम . 

   नानांची संस्था दिसायला साधी आहे . तिथं निटनेटकेप आहे . संस्कृती पण जोपासली जात आहे . प्रत्येक शाळेवर , वर्गावर नाना स्वत : लक्ष देतात . नानांनी माणसं तर जोडली पण त्याबरोबर  त्यांची मनही जुळवली . प्रत्येकामध्ये आपल्या शाळेविषयी आपलेपणा निर्माण केला . साधी राहणी , उच विचारांच्या नानांनी स्वत : च्या उपयोगासाठी संस्थेचा पैसा खर्च केला नाही . संस्थेच्या कामाकरिता मुंबईला जात असतील तर बहुदा पॅसेंजर रेल्वेने एक्सप्रेस रेल्वेने नाही . एक दिवशी मी ५ वाजेला दवाखान्यात जात असतांना मला नाना एस्.टी.स्टँड जवश बॅग घेऊन जातांना दिसले .मी मेटारसायकल त्यांच्या जवळ थांबवून नानांना म्हटले;'  चला नाना , कुठे सोडून देऊ ? ' नाना म्हणाले , ' अरे नको डॉक्टर ! इथं जवळच रेल्वे स्टेशनला जायचे आहे . तू जा . तुझे पेशंट तुझी वाट बघत असतील ' मी आग्रह केल्यावर ते माझ्याबरोबर आले . स्टेशनवर नाना म्हणाले , ' संस्थेच्या कामासाठी मुंबईला निघालो . ' मी म्हटले , ' नाना रात्री पठाणकोट होती . रिझव्हेशन मिळाले नाही का ? ' नाना हसत म्हणाले , ' कशाला एक्सप्रेससाठी पैसे खर्च करायचे , पॅसेंजर बरी ' , असे आपले नाना , संस्थेचे काम आणि कंटाळवाणा प्रवास नानांनी सहन करायचा का ? कशासाठी ? हा विचार बरेच दिवस मनात घोळत होता . शेवटी उत्तर मिळालं . त्याग ! सर्वस्वी त्याग केल्याशिवाय चांगल्या गोष्टी होत नाही , आदर्श निर्माण होत नाही . शिक्षणकार्य करीत असतांना नानांजवळ लोकसंग्रह होता . तरी नानांनी राजकारणात प्रवेश केला नाही आणि राजकीय पक्षांनाही संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करू दिला नाही . राजकारणापासून दूर असलेले नाना सतत कार्यरत आहेत . साने गुरुजी वाचनालयाची निर्मिती करुन भावी पिढीस ज्ञान मिळणार आहे . ह्या कार्यासाठी  नानांना सर्वांनी स्वखुशीने हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे . : चाळीसगावकरांना नानांनी ज्ञानसंपदा उपलब्ध करुन दिलीतर सतत २८ वर्ष नगराध्यक्षपदाची धुरा यशस्वीरितीने सांभाळणारे नगराध्यक्ष मा . अनिलदादा देशमुख यांनी सुरक्षा , अशा व्यक्तिंचे आदर्श भावी पिढीस मार्गदर्शक ठरणार आहेत , 

  चांगला समाज राजकीय सत्तेमुळे होणे शक्य नाही . मात्र शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे साधन बनते . त्यामुळे ' शिक्षण ' ही काळाची गरज आहे , हे जेव्हा शिक्षणसमाजकार्य करणाऱ्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी ' रयत शिक्षण संस्था ' ' विद्या प्रतिष्ठान ' ' प्रवरा शिक्षण संस्था ' , ' भारती विद्यापीठ ' , ' राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ ' सारख्या संस्थांची निर्मिती झाली आणि आज हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कार्य ह्या संस्था करीत आहेत . समाज सुशिक्षित बनविला असेल , खरा माणूस घडविला असेल तर यांनीच अशा या शिक्षणमहर्षी , शिक्षणदात्यांना विनम्र अभिवादन , ***

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...