मुख्य सामग्रीवर वगळा

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)



चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन ! 
    या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी'पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची बातमी वाचण्यात आली आणि  अमृतमहोत्सवी वर्षात एका जेष्ठ शिक्षण तज्ञाचा यथोचीत सन्मान होतोय याचा मनस्वी आनंद झाला.
    सुप्रसिध्द आंग्ल कवी आणि नाटककार शेक्सपिअर यांनी
म्हटले आहे त्याप्रमाणे काही व्यक्तींना जन्मजात थोरपण लाभलेले असते तर काही व्यक्ती स्वकर्तृत्वावर थोरपण प्राप्त करुन घेत असतात आणि काहींवर लादलेले असते . आदरणीय नानासाहेबांना लाभलेलं थोरपण ही त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची आणि स्वकर्तृत्वाची साक्ष आहे . साने गुरुजींची सेवाभावीवृत्ती नानांनी प्रत्यक्षात मनोभावे जपली आहे त्यामुळे त्यांचे एकूणच व्यक्तित्व आदरयुक्त आणि सर्जनशील बनले आहे . राष्ट्रीय शिक्षण संस्थेला त्यांच्या रुपाने सर्वस्व झोकून देणारे खंबीर नेतृत्व प्रथम पासूनच लाभल्याने गेल्या ४८ वर्षात १ ९ ५३ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे आज एका प्रचंड वटवृक्षात रुपांतर झालेले आहे . संस्थेच्या . चाळीसगाव शहर आणि तालुका तसेच भडगाव आणि पाचोरा तालुक्यातही बालवाडी , प्राथमिक शाळा , माध्यमिक शाळा , कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये , अंधशाळा आणि आश्रमशाळा अशा ४६ शाखांमधून सुमारे २५,००० विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे आणि ज्ञानसंवर्धनाचे पवित्र कार्य अव्याहतपणे सुरु आहे . एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून लौकिक असतांनादेखील राष्ट्रीय वसतीगृहाच्या कामात पूर्ण वेळ देता यावा म्हणून १ ९ ५४ साली नानासाहेबांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पुढे राष्ट्रीय शिक्षणसंस्थेची अधिकृत नोंदणी केली . शिक्षणासोबतच नानासाहेबांनी सामाजिक कार्याची देखील मनस्वी आवड आहे . ' ज्ञानदाना सोबतच श्रमदान ' हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव आहे . संत विनोबा भुदानपदयात्रा , गीताई पदयात्रा , भावजागरण दिंडी , साने गुरुजी मंगल यात्रा या सारख्या रचनात्मक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता . या वयातही आश्रमशाळेच्या बांधकामावर स्वत : लक्ष ठेवण्यासाठी नानासाहेब जेव्हा तहानभूक विसरुन जातात आणि काटकसरीने नवनिर्मिती करतात . तेव्हा त्यांच्याविषयी विलक्षण आदर वाटतो . " साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ' हे त्यांच्या यशस्वी जीवनाचे गमक आहे . त्यांचा वाचनाचा व्यासंगही चांगल्यापैकी आहे . एखाद्या महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन असो की पाटणादेवीच्या रम्य परिसरातील आमच्या सारख्या राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर असो नानासाहेबांचे  विचार अनुभल कथन सारयांनाच भावून जाते आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करते.
  आदरणीय नानासाहेबांच्या या अमृतमहोत्सवी वाटचालीत त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ. सुशीलाताई यांचा तसेच सारया कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे .
 आठवणीच्या साठवणीत अनेक प्रसंग आहेत . तूर्त एव्हढेच. मा. नासाहेबांना दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना ! !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...