शिक्षण क्षेत्रातील एक ध्येयवादी ऋषीतुल्य कार्यकर्ते श्री .नानासाहेब(प्रा.ग.प्र.प्रधान माजी आमदार,महा.राज्य,पुणे)
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत संस्कारक्षम वयातील तरुणांना देशसेवेची जी शिकवण मिळाली तिच्यामुळे त्यांच्यापैकी अनेकांनी आयुष्यभर उज्ज्वल समाजसेवा केली . चाळीसगावचे य . ना . उर्फ नानासाहेब चव्हाण हे असेच एक आयुष्यभर ज्ञानाची व ध्येयाची उपासना करणारे थोर कार्यकर्ते . अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झालेले नाना कष्टाने शिक्षण घेत धुळ्याच्या गरुड हायस्कूल मध्ये शिकत होते . त्यावेळी साने गुरुजी अनेकदा धुळे येथे येत . साने गुरुजींच्या भाषणांनी प्रभावित होऊन हा हायस्कूल विद्यार्थी स्वातंत्र्य चळवळीकडे ओढला गेला आणि इंग्रजी सहावीत असतांना १ ९ ४२ च्या ' चले जाव ' आंदोलनात त्याने भाग घेऊन कारावास भोगला . सुटल्यावर पुन्हा शिक्षणासाठी भटकंती सुरु झाली . नादारी , कर्ज काढणे हे करीत नाना १ ९ ४८ साली बी . ए . झाले आणि पुण्याला लॉ कॉलेज मध्ये शिकावयास आले . वसतीगृहाच्या खाणावळीत काम करुन त्यांनी एल्.एल्.बी. ची परीक्षा दिली . नंतर ते चाळीसगाव येथे आनंदीबाई बंकट नि हायस्कूलमध्ये शिक्षक झाले . कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांच्या प्रयत्नामुळे प्रथम ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा पोहोचली . विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख , धुळ्याचे डॉ . दादासाहेब घोगरे , बार्शीचे कर्मवीर जगदाळे , मराठवाड्यातील स्वामी रामानंद तीर्थ , बाबासाहेब परांजपे आदिंनी ही हे शिक्षणाचे कार्य महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वाढविले . चाळीसगावला शिक्षक म्हणून काम करतांना श्री. नानासाहेब चव्हाणांनाही असे वाटू लागले की आपण केवळ एका संस्थेत न राहता जळगाव जिल्ह्यात शिक्षण प्रसाराचे काम व्यापक स्वरुपात करुन दाखवावे . ३१ डिसेंबर १ ९ ५३ मध्ये त्यांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली . ही संस्था हे नानासाहेब चव्हाणांचे जीवित कार्य ठरली . त्यांनी या संस्थेत दोन तपे चिटणीस म्हणून , १० वर्षे व्हाईस चेअरमन म्हणून आणि १ ९ ८७ ती पासून आजपर्यंत चेअरमन म्हणून काम केले . तरुण पिढीवर सुसंस्कार व्हावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण " मिळावे या ध्येयासाठी नानासाहेब हे आयुष्यभर तनमनधनाने । झिजले . या ध्येयाच्या पूर्ततेसाठी त्यांनी ' राष्ट्रीय शिक्षण प्रसारक - मंडळ ' , हे साधन प्रभावीपणे वापरले . नानासाहेबांच्या कामाच्या या प्रचंड विस्तारापुढे मी नतमस्तक आहे . या साठी नाना अहर्निष कसे राबले हे यदुनाथ थत्ते , प्रकाशभाई मोहाडीकर अशा त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनाच विशेष माहीत आहे . यदुनाथजींचे नानांवर निरतिशय प्रेम आहे . नानासाहेब चव्हाण यांचा लोकसंग्रह मोठा आहे . त्यामध्ये ध्येयाच्या भावबंधाने त्यांनी जोडलेले शिक्षक , कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांचेच स्थान महत्वाचे आहे . नानांच्या मार्गदर्शना खाली संस्थेच्या दीड कोटी रुपयांच्या शैक्षणिक संस्थासाठीच्या इमारती झाल्या . त्यांच्या या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये २५-३० लाख रुपयांची कामे होणार आहेत .शैक्षणिक क्षेत्रात हे काम करतांना नानासाहेब चव्हाण यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान पदयात्रेत आणि अलिकडे गीताई पदयात्रेत भाग घेतला . साने गुरुजी कथामाला आणि आचार्य कुल ही नानांची आवडती क्षेत्रे . त्यांचा अनेक रीतीने गौरव झाला . विविध अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या . स्वातंत्र्यलढ्यात धडाडीने भाग घेणारया नानासाहेब चव्हाणांनी स्वराज्याचे सुराज्य व्हावे म्हणून अविश्रांत धडपड केली. त्यांचे मन शैक्षणिक आणि विधायक कार्यात रमले. राजकारणाचा आणि राजकीय सत्तेचा मोह वाटला नाही . ते कधी प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत. असे विधायक कार्यकर्ते हे समाजाचे अज्ञात आधार असतात.
नानासाहेब चव्हाणांनी जेव्हा कामास सुरुवात केली त्यावेळे पेक्षा आता परिस्थिती फार बदलली आहे . बऱ्याच बाबतीत आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना आम्ही कालबाह्य झालो आहोत असे वाटते . असे असूनही विनोबा , साने गुरुजींच्या पासून प्रेरणा घेतलेले नानासाहेब चव्हाण अद्यापही कार्यरत आहेत . श्री . नानासाहेब चव्हाण यांना प्रदीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभो . त्यांची ध्येयविषयक स्वप्ने साकार होवोत आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन अक्षय मिळो हीच सदिच्छा !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा