मुख्य सामग्रीवर वगळा

एक निस्वार्थ कर्मयोगी (निंबा तुकाराम लोहार ,चाळीसगाव)

 

 माननीय नानासाहेबांची ओळख १ ९ ५ ९ साली कै .  रामराव जिभाऊ यांचे सान्निध्यांत प्रथम झाली . दोघांचे संस्थेच्या कामकाजाबाबत मंथन चालू होते . सुखसंवाद चालू होता . हा मुलगा कोण ? म्हणून परिचय झाला . कॉलेजमध्ये शिकत असतांना घरुन येणारा डबा खाण्यासाठी वसतीगृहात येत असे . अधूनमधून कामकाजाच्या माध्यमातून भेट होत असे . एवढ्याच संबंधातून पुढील जीवनातील कार्याने नानासाहेबांनी बरेच शिकविले . नानांचे आदर्श व लोकोत्तर पुरुषाचे जीवन हे आपणसाठी प्रात्यक्षिक आहे . ध्येयपूर्तीसाठी , अडीअडचणीवर हिंमतीने मात करुन समाजसेवा करीत आहेत . ध्येयाशी एकनिष्ठ , अचल , तेजस्वी , सत्वशील राहून कार्य करीत आहेत . यशाने न बिघडता , अपयशाने निराश न होता , कर्मामागील हेतू चांगला असल्यामुळे निर्भयपणे कार्य चालू आहे . कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता , आदर्शध्येयनिष्ठा , जीवननिष्ठा , ईश्वरावर निष्ठा ठेवून , संयमीबुद्धी , दक्ष विचार व कार्यकुशलता यामुळे आज संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष झालेला आहे . यामध्ये त्यांच्या कृतीशील ज्ञान व प्रभावी नेतृत्वाची झलक आहे .

    नानांच्या प्रयत्नवादाची फलश्रुती ४६ शाखांतून २५,००० विद्यार्थ्यांचे शिक्षण आपण पहातच आहोत . यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे . केल्याशिवाय मिळत नाही , केलेले फुकट जात नाही . काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे , काम करीत जा , हाक मारीत जा , या उक्तीप्रमाणे सार्थ जीवनाचा विचार केलेला आहे. त्यांचे कुटुंबात धार्मिक संस्कार होते . श्री क्षेत्र वालझिरी संस्थेत सहभाग , संस्कार केंद्राची स्थापना , संत विनोबा व साने गुरुजी अशा आदर्शाचा सहवास , गीताई पदयात्रा , भाव जागरण दिंडी , गीताई प्रतिष्ठान मधील योगदान , गीताई अभ्यास केंद्र , गीताई प्रवचनाच्या प्रती खपविणे या सर्व कार्यातून त्यांच्यावर अध्यात्मिक संस्कार असल्याचे दिसते . राजकारणाला व समाजसेवेला अध्यात्माची जोड देवून समाजाची आर्थिक , सामाजिक , बौद्धिक व अध्यात्मिक उन्नती करणे हा खऱ्या अर्थान लोकसंग्रह आहे . तो नानांकडे आहे . 

    कर्मयोगी हात , ज्ञानी नेत्र , विलक्षण शांती व भक्तीयुक्त हृदय असा संगम नानांच्या जीवनात झालेला आहे . ते आदर्श व लोकोत्तर पुरुष आहेत .

      प्रयत्नानंतर यश मिळून देखील अंहकार नाही , तिरस्कार नाही , निरपेक्ष प्रेम , संयमी बुद्धीने जीवन जगण्याचे प्रात्यक्षिक नानासाहेबांनी समाजापुढे ठेवलेले आहे , त्याग , तप , स्नेह , सहकार असे भावयुक्त अहंकार विरहित निस्वार्थ , निरपेक्ष जीवन जगवून दाखवित आहेत . स्वत : परीश्रम करुन कायद्याचे शिक्षण पूर्ण करुन , शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देवून समाजसेवेचे व्रत घेतले . 

   नानासाहेब दानीही आहेत . नुसते वित्त देवूनच दानी होत नाही तर वित्त , समय , बुद्धी , शरीर यांचे समर्पण म्हणजे दान . नानांनी कुटुंबासाठी असलेल्या वेळे व्यतिरीक्त आपला वेळ संस्थेच्या  कामा साठी देवून समयदान केलेले आहे. कुशाग्र बुध्दी वापरून स्वच्छ प्रशासनाने ४६ शाखांतून २५००० विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन बुद्धीदान केलेले आहे . बहुतेक सर्व शाखांच्या इमारतीचे भव्य दिव्य व प्रशस्त शाळांचे बांधकाम श्रमदानाने करून शरीरदान केलेले आहे कामासाठी देवून समयदान केलेले आहे . विद्यार्थी व शिक्षकवृंदात आध्यात्मिक विचार रुजविण्यासाठी कृतज्ञतेच्या भावाने गीताई शिबिरे घेवून प्रयत्न केलेला आहे . 

    समाजाने टाकून दिलेल्या , तिरस्कृत केलेल्या , नेत्रहीन अपंग , मतीमंद , गरीब मुलांना शिक्षण देवून त्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे . ज्ञानदान व ज्ञानसंर्वधनाचे पवित्र कार्य अव्याहतपणे चालू आहे . समाजाच्या तळागाळातील , गरीब , हीनदीन अशा मुलांना प्रेमाची उब देवून जीवन जगण्याचा उत्साह निर्माण करुन नवजीवन प्रदान केलेले आहे . असे कार्य भगवंताला अपेक्षीत आहे .

    नानासाहेबांनी आपले उभे आयुष्य सर्वसामान्य विद्यार्थ्यांची उन्नती , विकास करण्यासाठी चंदनासारखे , निरपेक्ष - निस्वार्थ भावाने   झिजवून , तन - मन - धनाने कार्य करण्यासाठी वेचलेले आहे . काटकसर हा स्वावलंबी जीवनाचा पाया आधारभूत धरुन संस्थेचे आर्थिक व्यवहार केलेले दिसतात . समाजकल्याण , परोपरकार , सर्व सामान्यांचा उद्धार करीत आहेत . कणभर बोलून मणभर कृती करणारे , दिलेले वचन पाळणारे , सत्यनिष्ठा , तप , त्याग , संयम यांनी आचरण करुन तपस्वी व्यक्तिमत्त्व कर्मयोगी असे नानांचे जीवन सर्वांना स्फुर्तीदायक ठरेल . नानासाहेबांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाचा व उपकाराचा प्रभाव जीवनभर आठवणीत राहील . 

   आज अशा कर्मयोगी नानासाहेबांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य करण्यासाठी निरामय स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो अशी भगवंताचे चरणी प्रार्थना करतो .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...