मुख्य सामग्रीवर वगळा

कर्मयोगी श्री.नानासाहेब चव्हाण(अरविंद बळवंत क्षीरसागर,एम.ए., प्रमुख कार्यवाहक साने गुरूजी कथामाला मुंबई जिल्हा समिती)

 

साने गुरुजींच्या तेजस्वी व प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे ध्येयवादी व सेवाभावी तरुणांची एक पिढी त्यांच्याकडे आकर्षित झाली . १ ९ ५० साली साने गुरुजींच्या आकस्मिक निधनामुळे भावविव्हल झालेल्या तरुणांनी गुरुजींच्या स्मृतीने व प्रेरणेने स्वत : ला शैक्षणिक , सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात निरपेक्ष भावनेने झोकून दिले . आमचे नानासाहेब चव्हाण हे या पिढीचे कर्तव्यनिष्ठ आणि कर्तबगार प्रतिनिधी आहेत . हे त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त नमूद करण्यात मला आनंद होत आहे . शिक्षणाचा प्रसार केल्याशिवाय समाजामध्ये जागृती होणार नाही याची नानांना जाणीव होती . आणि याच भावनेतून त्यांनी १ ९ ५३ साली राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ नावाची शिक्षणसंस्था स्थापन केली . आज नानांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या अंतर्गत पाचोरा , भडगाव , चाळीसगाव तालुक्याच्या परिसरांमध्ये अनेक बालवाड्या , प्राथमिक शाळा , माध्यमिक शाळा , कनिष्ठ / वरिष्ठ महाविद्यालये , अंधशाळा , आश्रमशाळा विद्यादानाचे पवित्र कार्य करीत आहेत . आपल्या शाळेतील , महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय प्रवृत्तीची भावना निर्माण व्हावी यासाठी नाना सदैव प्रयत्नशील असतात .

    महात्मा गांधी , साने गुरुजी , विनोबाजी ही नानांची आराध्य दैवते आहेत . महात्मा गांधींच्या आदेशानुसार त्यांनी १ ९ ४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला . धुळे शहरामध्ये ब्रिटीश राजवटीचा निषेध करण्यासाठी त्यांनी काढलेल्या विद्यार्थ्यांच्या मिरवणूकीमुळे त्यांना धुळे तुरुंगात २ महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली . साने गुरुजींच्या विचारांचा परीस स्पर्श नानांना लाभला . साने गुरुजींचे चिरंतन स्मारक असणारया " साने गुरुजी कथामालेच्या स्थापने पासून ते आजतागायत कथामालेच्या सर्वांगीण विकासासाठी नाना प्रयत्नशील असतात . साने गुरुजी कथामालेची अधिवेशने , विविध सांस्कृतिक कार्यक्रम , साने गुरुजींच्या साहित्याचा प्रसार  इ . कामात रममाण होण्यात ते स्वत : ला धन्य समजतात . पू . विनोबाजींचा अमृततुल्य सहवास लाभणाचे भाग्य नानांना मिळाले . विनोबाजींचा भूदान यात्रेत नानांनी सहभाग घेतला . विनोबाजींचे शिष्य श्री . गाडे गुरुजींच्या पदयात्रेत , गीताई प्रचार यात्रेत नानांनी मोलाचे सहकार्य दिले . १ ९ ५१ मध्ये पवनार येथे पू . विनोबाजींच्या उपस्थितीत झालेल्या कांचनमुक्ती व कृती शिबिरात नानांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला . विनोबाजींच्या नुकत्याच झालेल्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये नानांनी ' मैत्री ' मासिकाचे १०० वर्गणीदार केलेत . गीताईच्या १०,००० प्रती संपविल्या . गीता प्रवचनांच्या ५०० प्रती संपविल्या . 

    नानांनी अनेक संस्था स्थापन केल्या . तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते , शिक्षणप्रेमी मंडळींचा एक संच उभा केला आहे . काही दिवसांपूर्वी नानांनी स्थापन केलेल्या जळगाव येथील महाविद्यालयाचे विनम्र , विद्याव्यासंगी प्रा . राजु निकम यांच्या भेटीचा मुंबईत योग आला . त्यांच्या प्रत्येक शब्दातून आणि कृतीतून नानांविषयी असणारा आदरभाव आणि जिव्हाळा दिसून येत होता . नानांच्या संस्थेतील सर्व अध्यापक आणि प्राध्यापक वर्ग नानांविषयी हाच आदरभाव बाळगून आहेत . 

   साने गुरुजी कथामालेच्या अनेक कार्यक्रमातून नानांचा आणि माझा संबंध आला . त्यांची साधी राहणी , विनयशील स्वभाव , अध्यात्मिक प्रवृत्ती सदैव कार्यरत राहून इतरांना कार्यप्रवृत्त करण्याची हातोटी ही त्यांच्या जीवनातील कार्यवैशिष्ट्ये आहे . व याची प्रचिती आली . नानांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला अध्यात्माची जोड असल्यामुळे त्यांचे कार्य अधिक प्रभावी ठरत आहे . नानांनी जमविलेला अफाट पैसा लोकसंग्रह हाच त्यांचा बँक बॅलन्सआहे . आणि त्यांच्या लोकप्रियतेची पोच पावती आहे .

    श्रीमद् भगवतगीतेत श्रीकृष्णांनी सांगितले आहे , " कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । ' भगवंताच्या वचना प्रमाणे कोणत्याही फळाची , मानपानाची अपेक्षा न करता नानासाहेब एखाद्या कर्म योग्या प्रमाणे मोलाचे सामाजिक , शैक्षणिक कार्य करीत आहेत.

    श्री योग वृदांवन धामचे स्वामी अखंडानंदजी स्वामीना आपल्या' जीवन एक योग ' या पुस्तकात म्हटले आहे की , जी व्यक्ती जीवनामध्ये चांगली कर्मे करण्याचा संकल्प करते , चांगले कर्म प्रयत्नपूर्वक करते त्या व्यक्तीची जीवनयात्रा सफल होत असते . माझ्या दृष्टीने सत्कर्माचा , सत्संकल्पाचा सडा शिंपणारया नानांची जीवनयात्रा सफल झाली आहे असे म्हणणे रास्त ठरेल .

   साने गुरुजी कथामाला मुंबई जिल्हा समिती , स्व बळवंतराव क्षीरसागर अध्यात्म केंद्रातर्फे नानांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! नानांना अभिप्रेत असणारी शिक्षणप्रेमी , संस्कारक्षम , सामाजिक बांधिलकीच्या भावनेने परिपूर्ण असणारी आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्याची शक्ती आपल्यामध्ये यावी हीच नानांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रभुचरणी विनम्र प्रार्थना .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...