मुख्य सामग्रीवर वगळा

आमचे प्रेरणास्थान (प्रा.सौ.बी.एस्. देशपांडे राष्ट्रीय.ज्युनि.काॅलेज,चाळीसगाव)

 

शि क्षणमहर्षी मा . नानासाहेबांविषयीचे हृद्य बोल पुढील मुक्तछंदातून व्यक्त झाले आहेत .

 " नानासाहेब म्हणजे आहे प्रत्यक्ष शांत मूर्ती ,

 पण शिक्षणक्षेत्रात केली आहे अग्रगण्य प्रगती ।

 जिद्द असते त्यांची सतत शैक्षणिक प्रगती वाढविण्याची , 

मात्र जोड असते त्याला कठोर परिश्रमाची । 

आमच्या शालेय कामात सुद्धा त्यांची नजर असते प्रशासकाची , म्हणूनच सर्वांना आदरयुक्त भिती आहे त्यांची । 

आधी केले मग सांगितले असा आहे त्यांचा बाणा , 

आदर्श त्यांचा गिरवण्या सेवक लागतात आपापल्या कामा । तळागाळातल्या लोकांसाठी केला हा जिद्दीने अट्टाहास , 

शिकून सवरुन अनेक गेली आपापल्या कर्तव्य सदनास । रात्रीचा दिवस नि दिवसाची रात्र करुन , 

केली राष्ट्रीय सहकारी संस्थेची स्थापना । 

आहे महत्वाकांक्षा त्यांची ,

 ही संस्था असामान्य करण्याची ।

 होवो पूर्ण ही महत्वाकांक्षा त्यांची ,

 म्हणून करते प्रार्थना शारदेची ॥ 

असे हे आगळे वेगळे व्यक्तिमत्व लाभलेले , ऋषितुल्य , शिक्षणमहर्षी , आमचा विश्वास नि आमचा आदर्श म्हणजे  नानासाहेब उर्फ यशवंतरावजी चव्हाण हे होत . येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी आमचे श्रद्धास्थान असलेल्या मा . नानासाहेबांना वयाची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत . या अमृत - महोत्सवानिमित्त मा , नानासाहेबांच्या कार्याने , त्यांच्या झुंझार व्यक्तिमत्त्वाने , त्यांच्या ठिकाणी असलेल्या निरपेक्ष वृत्तीने माझ्या भावना उत्स्फूर्त झाल्या । आहेत . वास्तविक मा . नानासाहेबांविषयी मी काही लिहावे म्हणजे , " गागर में सागर भरने के समान है । ' ' तरीसुद्धा माझा आंतरिक उमाळा , त्यांच्याविषयीची कृतज्ञता मी दोन शब्दात व्यक्त करण्याचे धाडसवकरीत आहे.  

   आपल्या भारतीय परंपरेत अठरा पुराणे मानली जातात व्यासमुनींनी अठरा पुराणे लिहली . अनेक व्यक्तिरेखा साकारल्या , अनेक शास्त्राचा उहापोह केला . तरी त्यांची ज्ञानतृषा तृप्त झाली नव्हती . तेव्हा श्री नारदमुनींनी त्यांना सांगितले की , " तू परमेश्वराचे चरित्रगान , यशोगान लिही . " हे ऐकून व्यासमुनींनी भागवत पुराणाची रचना केली . म्हणजे ज्ञानाला भक्तीचा ओलावा मिळाल्याशिवाय मनाला शांती लाभत नाही असे नारदमुनींनी जणू व्यासांना अप्रत्यक्ष सांगितले . तद्वतच मा . नानासाहेबांनीही अठरापुराणरुपी फक्त राष्ट्रीय विद्यालयच काढून त्यांची तृप्ती झाली नाही तर तळागाळातील  खेड्यापाड्यातील बहुजन समाजा विषयीची त्यांची आंतरीक भक्ती  तथा प्रेम चाळीसगाव ,भडगाव व पाचोरा या ठिकाणी काढलेल्या विविध शाळांच्या माध्यमातून व्यक्त होत् आणि त्याचीच परिणीती  म्हणजे शिक्षणाचा विशाल वटवृक्ष साकारलेला दिसत आहे . म्हणजे व्यासमुनीप्रमाणे नानासाहेबांनीही त्यांच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाला या शाळा काढून गरीब जनतेविषयीचा प्रेमरुपी , भक्तीरुपी ओलावा स्पष्ट केला आहे , असे म्हटले तर अनुचित होणार नाही  असे मला वाटते . 

   मी साने गुरुजी कथामालेची एक सदस्या असल्याने नानासाहेबांची व्याख्याने ऐकण्याची मला अनेक वेळा संधी मिळाली आहे . त्यांच्या भाषणातून नेहमी अध्यात्माविषयीचे विचार प्रगट झालेले मी ऐकले आहेत . अध्यात्माचा त्याच्या मनावर जबरदस्त पगडा आहे . संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की , " जगातील सर्व शास्त्राचा अभ्यास केला आणि जर अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केला नाही तर बाकी सर्व ज्ञान , अभ्यास कुचकामी ठरतो " म्हणजे जीवनाला अध्यात्माची झालर हवी . या विचाराने पुरेपुर पडसाद  नानासाहेबांच्या व्यक्तीमत्वातून दिसून येतात.

आम्हाला मार्गदर्शन करतानांनानसाहेबांनी त्यांच्या   भाषणातून आत्मा आणि परमात्म्यात अद्वैत आहे . ते वेगळे नाहीत असे अनेक वेळा सांगीतले आहे. त्यांचा हा विचार हिंदी साहित्यातील प्रसिद्ध संतकवी कबीर यांच्या विचारांशी कसा जुळता मिळता आहे हे पुढील दोह्यातून स्पष्ट होते .

 " जल में कुम्भ कुम्भ में जल है , बाहर भीतर पानी । 

फूटा कुम्भ जल जलहि समाना , यह तथ्य कश्यो ग्यानी ।।            आजही या वयात तरुणांना लाजवेल असे श्रमदान ते करतात . श्रमदानातून त्यांनी संस्थेच्या विविध शाखांमध्ये विनामूल्य सुधारणा केली आहे . ' Work is Worship ' हे त्यांचे तत्व आहे . या तत्वाचा परिचय त्यांच्या सतत कष्ट करण्याच्या प्रवृत्तीतून दिसून येतो .

    भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव नानासाहेबांनी संस्थेच्या विविध शाखांमध्ये दि.९ - ८ - ९ ७ ते १८-८ - ९ ७ पर्यंत श्रमदानाने व वृक्षारोपणाने साजरा केला . या काळात बौद्धिक कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी आम्हाला सुसंगाचे महत्व आणि कुसंगतीचे दुष्परिणाम सांगितले.त्यांचे या बाबतचे वक्तव्य म्हणजे संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या  विचारसरणी मुळे सुसंस्कारीत झालेले आहे.याची प्रचीती संत कबीराच्या पुढील दोह्या मधून येते.या प्रमाणेच त्यांचेही सुसंग आणि कुसंगा बद्दलचे विचार आहेत.

"मूरिष संग न कीजिए,लोहा जली न तिराई ।

कदली सीप भवंग मुष ,एक बुँद तिहूँ भाई।।

  मा . नानासाहेबांना ईश्वराने उत्तम आरोग्यही दिले आहे . ' शरीर माध्यम् खलु धर्म साधनम् । ' किंवा ' Sound mind in a sound booy या उक्तीप्रमाणे त्यांचे शरीर नि मन दोन्ही निकोप असल्या मुळे आम्हाला ते तासन् तास उत्तम मार्गदर्शन करतात.

   मा . नानासाहेब यांचे कौटुंबिक जीवन सुखी संपन्न व समाधानी आहे . सौ . ताईसारख्या त्यांना धर्मपत्नी लाभल्या आहेत . सौ . ताईसाहेब या त्यागी आहेत , सोशिक आहेत एवढेच नाही तर त्या एक आदर्श गृहिणी व आदर्श माता आहेत . म्हणतात ना , "स्त्रीस्य चरित्रम् पुरुषस्य भाग्यम्", याप्रमाणे सौ . ताईनी आपल्या पतीच्या उदात्त हेतुची मंगल पूर्तता करण्यासाठी कन्याशाळेच्या कन्या छात्रालयात अनेक वर्षे विनामूल्य काम केले . देणग्या  मिळवून छात्रालयास आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले . नानासाहेबांचे प्रापंचिक जीवन भरलेले आहे . सुखी व यशस्वी  आहे . डॉ . विनायक चव्हाण उर्फ बापूसाहेबांसारखे वैद्यकीय व्यवसायात निष्णात असलेले , गोरगरीबांना आधार देणारे , दिलखुलास नम्र असे पुत्ररत्ल त्याला लाभले आहे .           ज्याप्रमाणे सुपीक जमिनीत उत्तम पीक येते त्याचप्रमाणे नानासाहेबांचा जन्मच मुळी बाळबोध , वारकरी कुटुंबात झाल्याने संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम यांच्या अनुक्रमे ओव्या आभंगाने मन सुसंस्कारित झाले होते . त्यामुळेच त्यांच्या मनरूपी जमीनीत उदात्त , निर्मळ व स्वच्छ विचार जोपासले गेले. 

   मा . नानासाहेब यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त मला असे म्हणावेसे वाटते , नानासाहेब जे आमचे प्रेरणास्थान आहे . जोआमचा आदर्श आहे . यांना उत्तम आरोग्य नि दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी पूनःश्च प्रार्थना करते . शेवटी संपवता संपवता पुढील ओळी ओठावर येतच आहेत . 

" शुभचिंतन नानांचे करते . 

पुढील आयु आरोग्य सुखाचे जावो ।

 भवितव्य नव घडवायाला , 

चैतन्य त्यांना लाभो ।

 लाभो सुख शांती समाधाना त्यांना , 

म्हणूनच करते शारदेची वंदना ॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...