मुख्य सामग्रीवर वगळा

माझे नाना(अँड.हिरालाल चव्हाण ,जेष्ट स्वातंत्र्य सैनिक व सामाजीक कार्यकर्ते ,चाळीसगाव)

 

आदरणीय नानासाहेबांचा व माझा फार जुना संबंध आहे.मी प्राथमीक शाळेत दुसरया वर्गात शिकत होतो अगदी तेव्हापासून परंतून ते नानासाहब कधिच नव्हते,नेहमी नानाच राहीले.या प्रदीर्घ काळातील त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी आज गर्दी करून माझ्या मन:चक्षू पुढे उभ्या राहत आहेत.या क्षणाला मला नानांच्या प्रथम भेटीचा दिवस आठवत आहे.त्यांचे  वडील बंधू स्व पूंडलीकाव है मी मराठी दुसरया झ्यतेत असताना माझ्या लाोणजे गावी बदली प्राथमिक शिक्षक  म्हणून होऊन आलेत . सुटीच्या दिवशी एकदा मी त्यांच्या घरी गलो असता ननांचे दर्दशन मला झाले . त्या लहन वयातील त्याच्या स्वभावजन्य शालीनतेने मला अगदी पहिल्या  भेटीतच आकृष्ट करून घेतले . बाेलणे बेताचेच परंतू त्यात गोडवा  विशेष ! आणि त्याच वेळी मी त्यांच्या मैत्रीच्या प्रेमात पडलो .पण खरे तर त्यांचे माझे संबध लौकीक अर्थाने मैत्रीचे असे कधीच नव्हतेच !  जगाला तसे तसे वाटत आले . परंतु माझ्या दृष्टने ते आहे एका भावगर्भ  पुजरयाचे ! नाना मला सदैव गुरुस्थानीय राहीलेत . त्यांच्या वागणूकीतील निस्वार्थ सेवाभावामुळे आणि त्यातही या सेदेचे यत् किंचीतही प्रदर्शन न करण्याच्या दुर्मिळ  प्रवृत्तीमुळे मी त्यांना गुरुस्थानी बसविले . तरी त्यांचे कार्यपद्धतीचा मी माझ्या स्वभाववैशिष्ट्यामुळे कधी अनुसरन  केले नाही.

   नानांच्या या विशेषस्वभावामुळे अगादी विद्यार्थी दशेतच त्याचे सहयोगी साथी विद्यार्थीच काय परंतू त्यांचे गुरुजन शिक्षकही पूजारी झालेत ! नाना मराठी प्राथमिक शाळेतील व्ह , फा . परिक्षा पास होऊन धुळे येथील शेतकी शाळेत पुढील शिक्षणासाठी गेले आणि अगदी थोड्या अवधीतच आपल्या वागणूकीमुळे आपल सहयोगी विद्यार्थी - शिक्षकांचे ' बापूजी ( गांधीजी ) होऊन बसलेत धुळे वास्तव्यातील या विद्यार्थी बापूजींचे अनेक मजेदार मनोहारी किस्से आहेत . त्यातला एक येथे कथन करणेचा मोह होत आहे . वसतीगृहात मुलांचे सामुदायिक भोजनाची व्यवस्था असते . या ' बापूजी ' बद्दल वसतीगृहातील विद्यार्थ्यां मधे इतका काही आदरभाव वाढला होता की ते जेवायला बसतांना ' बापूजी ' त्या वेळी जेवायला आलेले नसले तरी त्यांचे साठी पहीला मानाचा पाट रिकामा ठेऊनच दुसऱ्या क्रमाकांचा पाटापासून बसायला सुरुवात करायचे पहिल्या पाटावर कुणीच बसत नसत . पहिले वर्ष संपून ' बापूजी ' दुसऱ्या वर्षात गेले . दुसऱ्या वर्षी काही विद्यार्थी नवे आलेले होते . त्यांना या विद्यार्थी ' बापूजी ' बद्दल वा त्यांच्या साठी सोडावयाच्या पहिल्या पाटाची काहीच हकीकत माहीत नव्हती . पहिल्या दिवशी त्यातला एक विद्यार्थी जेवायला आला असता सहजगत्या ' बापूजी करीता सोडलेल्या खास राखीव मानाचे पाटावर जाऊन बसला . दुसऱ्या वर्षातील काही विद्यार्थ्यांच्या लक्षात हे येताच त्यांनी तो पहिला पाट सोडून दुसन्या पाटावर बसायला त्या नवख्या विद्यार्थ्याला सांगितले . परंतु त्या नवख्याला त्यात अपमान वाटला त्याने पहीला पाट सोडायचे  नाकारले व त्याचे परिणाम स्वरूप  नव्या जुन्याचे भांडन चांगलेच जुंपले . जुन्यांनी शेवटी त्या नवख्या  विद्यार्थ्याला  तो पहिला पाट सोडायला लावले.

     नंतर काही दिवसांनी त्या अपमानीत विद्यार्थ्याला बापूजी बदलली बरीच माहिती हळूहळू कळली व  त्याला खुपच  वाईट वाटाले तो नानांना भेटून आपल्या चुकीबदल क्षमायाचना करू लागला ! नानानी त्याची समजूत काढली व नंतर ते आपल्या साठी राखून ठेवलेल्या मानाचे पाटावर कधीही बसले नाहीत.       धुळ्याला आम्ही शिकत असतांना घडलेली एक नानांच्या  व  माझ्याही जीवनातील अविस्मरणीय हृदयस्पर्शी घटना आठवते . मी . त्यावेळी देवपूर मधील राजेंद्र छागाळ्यात रहात होतो . नाना सुमारे ३/४ कि.मी. अंतरावरील शेतकी शाळेत ! नानांच्या भेटीची मला सतत ओढ लागून रहात असायची ! रविवारची सुटी लागली की सकाळचे जेवण झालेबरोबर शेतकी शाळेच्या दिशेने झपाझप  रस्ता कापीत चालू लागायचो . हा क्रम नेहमीचाच असायचा . एका वर्षी रविवारला जोडूनच दिवाळीची सुटी झाली . परंतु त्या रविवारी भी थोडा आजारी असलेने नानांच्या भेटीला नित्याप्रमाणे जाऊ शकलो नाही. नानांनी माझी वाट पाहिली . आणि नंतर तेच संध्याकाळी माझ्याकडे आले . मी आजारी असल्याचे त्यांचा लक्षात आले . त्यांनी मला विचारले , " सुटी लागली आहे . घरी जायचे ना ? " मी म्हणालाे , " होय , पण माझ्याजवळ भाड्या पूरतेही पैसे नाही . त्यानी सांगितले , " मजजवळ आहेत पैसे तू जा . मी नतर १/२ दिवसांनी येईन , माझे थोडे काम राहिले आहे ."  

    नंतर त्यांनी दुसरे दिवशी सकाळी मला तिकीट काढून गाडीत बसवून दिले आणि शिल्लक राहिलेल्या एक दीड आण्याची केळी खायला घेऊन ते पायी पायी धुळ्याहून रांजणगावी यायला निघाले . मला काही कळू न देताच ! मी घरी आलेनंतर दोन दिवसानी नानाच्या भेटीसाठी त्यांच्याघरी गेलो तर ते शेतात गेल्याचे कळले . आईने  सांगितले , " भाऊ , परवा तो थेट धुळ्याहून पायी पायीच घरी आला . त्याच्या तळव्यांना सुज आली होती . मी ते गरम पाण्याने शेकून काढले . आज जरा बरे वाटले तर सकाळी उठून शेतात नांगरायला निघून गेला . " काही दिवसांनी नंतर १ ९ ४२ चे स्वातंत्र्य आंदोलन सुरु झाले . आम्ही दोघेही त्यात स्वाभाविकपणेच ओढले गेलो . दोघांनाही अटक झाली . नाना धुळ्याच्या जेलमध्ये तर मी नाशिकच्या . तेथे नानांच्या आठवणींनी वरचेवर माझे डोळे डबडबायचे त्यांनी  अबोलपणे केलेल्या त्यागाच्या आठवणी होऊन . पुढे मोठेपणी देखील व्यापक समाजसेवेच्या क्षेत्रातही नानांनी याच वृत्तीचे दर्शन घडवले आहे . 

    आम्ही पुण्याला लॉ कॉलेजमध्ये शिकत असतांना नाना एक वर्ष माझ्यापुढे होते . शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपल्या भावी जीवनात करावयाच्या वाटचालीचा निश्चित निर्णय घेतला होता . पुण्यातील अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची माहिती घेऊन त्यांनी त्यांच्या घटना , नियम आणि पोटनियमांचा बारकाईने अभ्यास केला आणि ठरविले की , वकिलीची परिक्षा द्यावयाची परंतु वकिली व्यवसाय करावयाचा नाही . आपल्या तालुक्यातील सामान्य जनतेच्या मुलांसाठी एखादी शिक्षण संस्था स्थापन करुन त्यांचेत राष्ट्रीय प्रवृत्ती बाणवण्याचा प्रयत्न करायचा . राजकारणात अजिबात रस घ्यावयाचा नाही . राजकारणी माणसे कधीकधी सत्तेच्या डोंगर शिखरावर असतात तर कधी खोल दरीतही कोसळून पडतात . त्यांचे कडून समाजाचे काही भले होईलच याची निश्चिती नसते . नाना कोणताही महत्वाचा निर्णय कधीही घाईघाईने घेत नसतात . एखादी गोष्ट करण्यापूर्वी ते तिचा सर्वांगाने विचार करतात व विचारांती एकदाचा निर्णय घेतले नंतर त्या निर्णयाच्या परिपू्र्तते साठी स्थिरपणे जीव ओतून काम करायला लागतात. वकिली परीक्षा पास झालेनंतर शिक्षण कार्यात स्वतःला झोकून द्यायचे या पूर्वनियोजीत संकल्पनेस अनुसरुन नानांची एल् एल् बी ची शेवटची परीक्षा पास झालेनंतर सुरुवातीला चाळीसगाव येथील ए . बी . हायस्कुलमध्ये शिक्षकाची नौकरी पत्करली . त्या वेळी मी वकीली व्यवसायास सुरुवात करुन त्यासाठी चाळीसगावी राहु लागलो . शिक्षणसंस्था स्थापन करणेचा विचार स्थानिक सर्वपक्षीय प्रमुख नेते व काही सामाजिक कार्यकर्त्यांना पटवून देण्याच्या दृष्टीने नानांनी त्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली व त्यांना एकत्र आणून त्यांच्या सहकार्याने परंतु आपल्या विचारास अनुसरुन शिक्षणसंस्थेची घटना तयार करणेसाठी १ ९ ५३ सालचे उन्हाळ्याचे सुटीत त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली . परंतु बैठकींना कुणीना कुणी प्रमुख नेते काहीना काही कारणास्तव गैरहजर राहत गेल्याने काही कामकाज न होताच बैठका तहकुब होत असे . या बैठकांची वेळ बहुदा दुपारी १/२ वाजेची असायची . नाना यासाठी मे महीन्याच्या भर उन्हात ५/६ किलोमीटर पायपीट करीत रांजणगावहून चाळीसगावी यायचे या बैठकींना मी सुद्धा नियमीतपणे हजर असायचो . काही वेळेला बैठक तहकुब होण्याचे अगदी शुल्लक कारण असायचे , एका बैठकीला एकच महत्वाचे नेते वेळेवर आलेले नव्हते म्हणून नाना त्यांना बोलाविणेसाठी त्यांच्या घरी गेले . नेते घरीच होते . त्यांचे जेवण नुकतेच झाले होते व ते पलंगावर लोळत पहुडले होते . नानांनी त्यांना आर्जवी शब्दात बैठकीसाठी येण्याची विनंती केली . नेते हसत हसत म्हणाले , ' यशवंतराव , येवढ्यातच आमरसाचे जेवण खुप पोटभर झाले आहे , त्यामुळे मला जरा पडावेसे  वाटते . आपली बैठक एक - दोन दिवस पुढे ढकलली तर चालणार नाही का ? " नाना शांतपणे म्हणाले , ' काही हरकत नाही , दोन दिवसांनी घेऊ . ' ' असल्या बैठकी तहकुबीसाठी असली शुल्लक कारणे ऐकुन मी एकदा नानांना म्हणालो , ' तुम्ही वरचेवर इतके दुरवार पुन्हा चालून येता या नेत्यांपैकी कुणीना कुणी शुल्लक कारणांवरुन गैरहजर राहीले म्हणजे काही काम न होताच तुम्ही परत जाता . एखाद्या नेत्यासाठी बैठक तहकुब करायची काही गरजच नाही . ज्यांना या कार्याची कळकळ नाही असल्या नेत्यांसाठी कशाला थांबायचे ? " नाना म्हणाले , ' ' हिरालाल , एखाद्याचा संस्थेचा कामासाठी भलेही उपयोग होणार नाही , परंतु असल्या नेत्यालाही Nuisance value ( उपद्रव मूल्य ) असते . आपण त्यांना वगळले तर ते नाराज होऊन आपल्या कार्यात अडचणी निर्माण करु शकतात . म्हणून आपण अशांचाही राग न करता सर्वांचेच सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे . नानांचे दुरदर्शी विचार मला पटले आणि त्यांच्या या प्रयत्नातूनच एकदाची राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली . तद्नंतरही नानांनी कुणालाही कमी न लेखता समाजावर ज्यांचा काहीना काही प्रभाव आहे अशा सर्वच राजकारणी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या बद्दल आदरभाव बाळगून संस्थेचे विकासासाठी त्यांचे सहकार्य घेतले आहे . नानांचा व माझा काही बाबतीत समान दृष्टीकोन आहे.परंतू काही बाबतीत विचार भिन्नताही आहेच , त्यामुळे शिक्षणसंस्थेत काम करतांना कित्येक वेळा मतभेद होऊन त्यांचेशी माझे खटकेही उडाले पण त्यामुळे आमचे जिव्हाळ्याचे संबंधात कधीदुरावा निर्माण झाला नाही .

 नानांचा एकूण जीवनपट पाहिला तर लक्षात येईल की , नाना स्वत : साठी फारसे जगलेच नाहीत , त्यांनी आयुष्यभर कष्ट उपसले ते निष्काम समाज सेवेसाठीच , त्यांच्या या कार्याचा मी साक्षीदार आणि थोडासा परंतु चिवट साथीदारही आहे . त्यांच्या प्रकृतीने बरेच दिवसापासून कुरबुरीला सुरुवात केली आहे . तरी नाना तीला थोपटत , पिटत आणि कुरवाळीत तिचेकडून सतत काम करवूनच घेत आहेत , विश्रांती कशी ती नाहीच.

   आता आम्ही दोघेही अखेरच्या मुक्कामाच्या दिशेने द्रुतगतीने वाटचाल करीत आहोत . आयुष्य पथावरील ही अखेरची पावले टाकीत असतांना मी नानांच्या धीर गंभीर मनोदशेची चाहुल घेत आहे . वृद्धापकाळाने त्यांना कधीच गाठले असले तरी , ' संध्या छाया भिवविते हृदया ' अशी त्यांची स्थिती झालेली नाही . नित्य अध्यात्मिक वाचनामुळे त्यांच्या मनाला स्थिरता आलेली आहे . ही त्यांच्या निष्काम समाजसेवेची फलश्रुतीही आहे . 

   मला या असल्या थोरसमाज सेवकाच्या संगतीचा आजन्म लाभ मिळालेला असल्याने त्यांच्या जीवनावर विस्ताराने भाष्य करण्याचा मोह होत आहे . परंतु त्यासाठी हे स्थळ नव्हे , या गोष्टीचे भानही मला ठेवावे लागत आहे . त्या मुळे म्हातारीचे जसे ' ताकापूरते रामायण ' तसे यशवंतराव नानांचे अमृतमहोत्सवी वाढदिवसापुरते यशोगान मी केले आहे . त्यात त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि चाहते हेही सहभागी होतील अशी अपेक्षा करीत आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...