मुख्य सामग्रीवर वगळा

माझ्या आठनणीतले नानासाहेब(श्री.दगडू धना धनगर,चाळीसगाव,(शब्दांकन :प्रा आर.पी.निकम,चाळीसगाव)

 

आदरणीय नानासाहेबांचा पंचाहत्तरावा अमृतमहोत्सव  साजरा होणार ही बाबच किती आनंदाची आहे . या प्रसगी नानासाहेबांचा सर्व बाजूंनी त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याविषयी , कर्तृत्वाविषयी मुक्त कंठाने गौरव होत आहे . मी पण आजपर्यंत नानासाहेबांच्या सहवासातल्या काही आठवणी जीवापाड जपल्या आहेत . नानासाहेबांचे माझ्या आयुष्यात एक आगळे वेगळे महत्व आहे .
    आमचे मुळ गाव वाघळी ता . चाळीसगाव . जातीने धनगर . आमच्या कुटुंबात शिक्षणाचा व ज्ञानाचा गंध नव्हता . घरात अठराविश्व दारिद्रय , वडील मोल मजूरी करायचे . हातावरचे पोट . थोडीफार जमीन होती . पण ती संपूर्ण निसर्गावर अवलंबून असल्याने फारसे उत्पादन होत नव्हते . अशाही स्थितीत वडिलांची परमेश्वरावर प्रचंड श्रद्धा होती . रोज सकाळी भक्तीभावाने बंजरंग बलीची ते उपासना , पुजा , अर्चा करीत व प्रभात फेरीत जय - जय - राम - कृष्ण हरीच्या गजरात दंग होऊन जात . खरा कष्टातच त्यांचा परमेश्वर होता
     अशा गरीब अवस्थेतही अनंत अडचणींवर मात करुन मी वाघळी येथेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले ते नानासाहेबांनी स्थापन केलेल्या शाळेत , नानासाहेबांची शाळा ही ' बहुजन हिताय बहुजन सुखाय ' या ध्येयाने काम करीत असल्यामुळे माझ्यासारख्या दरिद्री व मागासलेल्या जातीतील मुलगा तेथे शिक्षण घेऊ शकला हे प्रामाणीक पणे नमूद करावेसे वाटते.        
     नानासाहेब शाळेवर नेहमी येत असत , ते आलेत  म्हणजे शाळेत जणू मंगलमय वातावरणाची निर्मिती होई . शाळेच्या उभारणीत स्वत : ला पूर्ण झोकून अगदी तन्मयतेने ते काम करीत असत . ' श्रमदानाचे ' , कष्टाचे व प्रामाणिकपणाचे बाळकडू नानासाहेबांकडून शाळकरी जीवनातच आम्हाला मिळाले .
     शिक्षण आटोपल्यानंतर पुढे काय ? हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला . आपल्यासारख्या सामान्य मुलाला कोण मार्गदर्शन करेल ? कोण आधार देईल ? तेव्हा नानासाहेब हे एकच आशास्थान माझ्या हृदयात होते . साधारण १ ९६७-६८ ची ती गोष्ट . त्यावेळेस चाळीसगाव येथील नानासाहेबांनी सुरु केलेल्या विद्यार्थी वसतीगृहाचे महत्त्व खेड्या - पाड्यात जाऊन पोहचले होते . गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांची येथे माफक दरात जेवणाची व रहाण्याची सोय होत होती . त्यामुळे ते पुढील शिक्षण घेऊ शकत होते . मी तर अगदी कफलक होतो आणि त्यात मागास जमातीचा पण नानासाहेबांनी त्यावेळेस हा होतकरु व कष्टाळू मुलगा आहे . येवढ्याच बाबी लक्षात घेऊन विद्यार्थी वसतीगृहात रात्रपाळीचे काम मिळवून दिले . त्यामुळे जेवण्याची , रहाण्याची सवलत मिळाली व बोडींगचा एकंदरीत खर्च मी भागवू शकलो . तेप्रसंग अजूनही आठवले की , नानासाहेबांबद्दलये भाव अत करणात दाटून येतात . नानासाहेबांकडून व आ ताईसाहेबांकडून भरपूर प्रेम मिळालं . वसतीगृहाचे संपूर्ण वातावरणस जणू एकत्र कुटुंब पद्धतीचे होते . सर्व जातीतील , धर्मातील , वर्गातील हाता विद्यार्थी आनंदाने व गुण्या गोविंदाने रहायचे . तेही शिस्तबद्ध पद्धतीने . वसतीगृहाच्या बाहेरच्या पटांगणात रात्री पहारा देत बसायचो . नानासाहेबांचे पूर्ण लक्ष माझ्याकडे रहायचे ? हा अभ्यास करतो की नाही ? का झोपला ? नानासाहेबांकडून रोज नित्य नियमाने काहीतरी प्रेरणा मिळत होती . त्यांची व ताईसाहेबांची सेवा करतांना जीवन कृतार्थ झज्यासारखे वाटे . अशा रितीने वसतीगृहामुळे व नानासाहेबांच्या मदतीमुळे व आश्रयामुळे मी १ ९७१-७२मध्ये बी.ए. झालो . पुढे नानासाहेबांच्याच संस्थेतल्या एखाद्या शाळेत शिक्षकाची तक नोकरी करुन नानासाहेबांच्या चरणी रहावे असा निश्चय मी केला . नानासाहेब माझी निवड करतीलच याची पूर्ण खात्री होती . पण बी.ए.ला मिळालेले गुण साधारण होते . त्यामुळे माझी निवड होऊ शकली नाही . आता पुढे काय हा प्रश्न निर्माण झाला . परिस्थिती तर गरीबीचीच त्यात मागासलेल्या जमातीचा . शेवटी माझे माता पिता नानासाहेबच होते . त्यावेळी नंदूरबार जि . धुळे येथील बी.एड् . कॉलेजमध्ये संस्थेचे माजी शिक्षक श्री . व्ही . डी . कासार हे प्राचार्य म्हणून आपली जबाबदारी सांभाळीत होते . त्यांच्याही आयुष्यात नानासाहेबांचे योगदान खूप होते . नानासाहेबांच्याच प्रेरणेमुळे ते पुढे गेले होते . 
    नानासाहेबांनी बी.एड् . प्रवेशासाठी आपले व्यक्तिगत खाजगी ५०० रुपये देऊन एक चिठ्ठी दिली की हा एक गरीब मागासलेल्या जमातीतील होतकरु , कष्टाळू विद्यार्थी आहे . त्याला योग्य ते सहकार्य करावे .
     हे वाचून प्राचार्य महोदयांनी मला त्यांच्याच मुलाची खाजगी शिकवणी मिळवून दिली . बी . एड् . चे शिक्षण पूर्ण होईस्तोवर खूप मदत केली . नानासाहेबांचे हे मोठेपण मी शब्दात व्यक्त करु शकत नाही . माझ्या सारख्या मागास गरीब विद्यार्थ्याला मदत करुन त्यांना काय मिळणार होते ? पण नानासाहेबांची दृष्टी ही कोणत्याही सीमांमध्ये अडकून पडणारी नव्हती . ती अफाट होती . अशी अनेक उदाहरणे देता येतील . मागासलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात नानासाहेबांचा नेहमीच पुढे असतो . त्यांच्या मुळेच मी बी.एड् तबद्ध चे शिक्षण पूर्ण करु शकलो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानासाहेबांच्याच देत संस्थेची सेवा करण्याचे ध्येय असल्याने मी अन्यत्र कुठेही जाण्याचा मोहपरला नाही . नानासाहेबांनी माझ्यातील गुणवत्तापारखून पुन्हा आश्रय दिला . त्यांच्याच कृपेने आज मी जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने व सुखासमाधानाने वेचतो आहे . नानासाहेबांमुळे मी यडू शकलो . पुढे येऊ शकलो व आमच्या मागासलेल्या जमातीत ए . संस्कारक्षम आयुष्य जगू शकलो व माझ्या कुटुंबावर मुलाबाळांवर नची त्यांचा परिणाम चांगला होऊ शकला . 
      माझा एक मुलगा गतवर्षी राष्ट्रीय विद्यालयात १२ वी सायन्स पण मध्ये ८५ % गुण मिळवू शकला व त्या बळावर त्याचा धुळे येथील ऊ गव्हर्मेट मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला . दूसरा मुलगा सचिन स्ती राष्ट्रीय विद्यालयातच ११ वी सायन्स वर्गात आहे . स्वभावाने नम व हुशार तिसरा मुलगा संदिप इयत्ता १० वीला असून दोन ते तीन इ . वर्गातून सातत्याने पहिला येतो . मुलगी मंदाकिनी आपल्या बार्य गुणवत्तेच्या बळावर मुंबई येथे डी.एड्.कॉलेजला प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाली . या व्यतिरीक्त आणखी कोणते समाधान हवे ते माणसाला ? संपूर्ण कुटुंबाचा होणारा हा विकास बघता सहज भी विचार करायला लागतो की यदाकदाचित नानासाहेबांनी मला पुढे गी आणले नसते , मदत व मार्गदर्शन केले नसते , प्रेम दिले नसते तर मी न्या परंपरागत चालत येणारा आमचा मेंदपान व्यवसायातच संपूर्ण पर्य आयुष्य घालविले असते . जीवनामध्ये इतके विविध रंग मी अनुभवू शकलो नसतो . म्हणून नानासाहेबांच्या माझ्या जीवनातील भी महत्त्वाच्या भूमिकेचा यथोचित गौरव आज ह्या क्षणाला श्रद्धापूर्वक अंत : करणाने करावासा वाटतो , नानासाहेबांकडून तळागाळातील त दलित , मागासवर्गीस , दुर्बल घटक व जातीजमातीच्या उत्थानाचे व  समाजातील विषमता , दारिद्रय , अज्ञान दूर होण्याचे काम असेच अव्याहतपणे होवो . त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो हीच परमेश्वर चरणी क प्रार्थना .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...