मुख्य सामग्रीवर वगळा

एक द्रष्टा(श्री.उदेसिंग रामसिंग पवार,बी.एस्.सी.(अँग्री.)श्रीकृष्ण सिनेमा समोर ,चाळीसगाव)

 

                   श्री. यशवंतराव नानांचे नाव कसल्याही कारणाने कुठेही निघाले की राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक उपक्रमांचा आलेख डोळ्यापुढे चटदिशी उभा राहतो . सन १ ९ ५० साली ग्रामीण भागातील शेतकरी व कामकरी समाजातील मुलांना उच्च चांगले शिक्षण मिळण्याच्या हेतूने श्री . नानांनी प्रथम मुलांसाठी फक्त एका वसतीगृहाची स्थापना केली . कदाचित त्यावेळेस याच एका मामुली उपक्रमाचा विस्तार आज झालेला आहे . येवढा विस्तार करावयाचा त्यांचे मनामध्ये कल्पनाही नसेल , परंतु चांगल्या माणसाने चालविलेल्या चांगल्या कामाला कुणीही सुज्ञ माणुस सहकार्य करतो या उक्तीप्रमाणे श्री . नानांना त्यांनी सुरु केलेल्या या शैक्षणिक कामास तालुक्यातील त्यावेळच्या सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांनी खुप मोठ्या प्रमाणात अगदी मनापासून मोलाची साथ दिली . त्यात कै . रामराव जिभाऊ , कै जे . एस् . आप्पा , कै . मोतीराम भाऊ , कै . राजाराम भाऊ , श्री . सोनूसिंग अण्णा , कै . रामभाऊ देशमुख , कै . भिकनरावदादा , कै महारु हाजी , कै . देवराम भाऊ या व आणखी अशा बऱ्याच कार्यकर्त्यांची नावे घेता येतील . राजकीय विचार काहीही असले तरी श्री.नानांचे संस्थेचे कामासाठी सर्वजण एकत्र येऊन अगदी एक विचाराने कुठलाही निर्णय घेत असत व त्यासाठी प्रयत्न करीत असत . हे मी स्वत : अनुभवलेले आहे . या सर्व भिन्न भिन्न विचाराच्या मंडळींना एकत्रित बसवून  त्यांच्याकडून श्री . नानांनी त्यांनी अंगिकारलेले हे पवित्र शिक्षणाचे काम करुन घेण्यासाठी जे कौशल्य दाखविले ते खरोखरच वाखाणण्या जोगेआहे .                                                               
    सामाजिक कार्यकर्ता म्हटला म्हणजे त्याचे काम एकाच संस्थेपुरते मर्यादित राहत नसते . त्यास अनेक संस्थांमधुन असावे अशी इच्छा निर्माण होते . श्री . नाना मात्र याबाबत अपवाद आहेत . मग तो कार्यकर्ता त्याचे इच्छेनुसार प्रत्येक संस्थेत जाण्यासाठी वाटेल त्याच्याशी सलगी करुन कुणाच्याही परिचयाची पर्वा न करता वाटेल त्या मार्गाचा अवलंब करुन प्रयत्न करीत असतो . त्यामुळे त्यास अनेक विरोधक निर्माण होतात व मग त्यास कुठलेही काम हे विरोधक नीट व्यवस्थित करु देत नाहीत व या अशा विरोधामुळे त्यास कुठलेही काम मग ते चांगले जरी असले तरी ते करणे शक्य होऊ शकत नाही . अशी शेकडो उदाहरणे आपण पहातो आहोत . परंतु श्री . नानांनी मात्र एक विशिष्ट ध्येय डोळ्यापुढे ठेऊन ते सर्वार्थाने परिपूर्ण करण्याकरीता शिक्षणप्रसाराचे कामाव्यतिरीक्त कुठल्याही इतर बाबींकडे दुरान्वयाने देखील लक्ष दिले नाही . त्यामुळेच त्यांना या शिक्षणसंस्थेचा एवढा मोठा पसारा वाढविणे शक्य होऊ शकले . त्यांना अनेकवेळा काही हितसंबंधी मंडळींनी त्यांच्या स्वत : च्या काही मनोकामना पूर्ण करुन घेण्यासाठी केवळ त्यांचा वापर करुन घेण्याच्या दृष्टीने इतर संस्थांमध्ये त्यांनी लक्ष घालावे असा अनेक वेळा आग्रह देखील करुन पाहिला . परंतु श्री . नानांना त्या बाबत  कधीच अभिलाषा झाली नाही व त्यांच्या त्या आग्रहाला ते बळीही पडले नाहीत आणि म्हणूनच त्यांना या एकाच संस्थेचे काम त्यांच्या कल्पनेप्रमाणे अगदीच व्यवस्थित करता येऊन त्यायोगे आज कितीतरी ग्रामीण व शहरी विभागातील मुलामुलींना त्याचे इच्छेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण मिळू शकत आहे .
   श्री . नानांचे स्वभावात काही दोष जरुर आहेत . बऱ्याच मंडळींचे त्यांचेशी काही प्रश्नांवरुन मतभेद होत असतात . परंतु संस्था व त्या संस्थेच्या विकासासाठी श्री . नाना करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे त्या मंडळींना देखील ते मतभेद विसरावे लागतात . एखाद्या प्रश्नांवरुन मतभेद झाला म्हणून त्याचा परिणाम एकंदरीत संस्थेच्या विकासाच्या आड येऊ न देणे हे खऱ्या कार्यकर्त्याचे प्रमुख लक्षण असते आणि अगदी तशाच विचाराची तालुक्यात बरीचशी कार्यकर्तेमंडळी असल्याने या संस्थेचा सर्वांगीन विकास होऊ शकलेला आहे . संस्थेच्या कामासाठी श्री . नानांचा मोठा अट्टाहास असतो . समोरच्या माणसास हो म्हणावेच लागतेे व काम करुन द्यावेच लागते . काही वेळेस शारीरिक क्लेश देखील संस्थेच्या कामासाठी श्री . नानांनी घेतलेले आहेत आणि म्हणून त्यांचे संबंधाने एक वेगळी आदराची भावना समजदार माणसाचे मनात निर्माण झालेली आहे . व नानां विना राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसार मंडळ ही कल्पनाही चांगल्या विचारी माणसाचे मनाला रुचत नाही व रुचणार नाही म्हणून काही स्वार्थी विचारांनी का होईना परंतु नानां परमेश्वराने चांगले आरोग्याचे दीर्घआयुष्य द्यावे हीच प्रार्थना .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...