रा.स.शिक्षण प्रसारक मंडळास लाभलेला' परिस'अमृतमहोत्सवी शिक्षणमहर्षी श्री.नानासाहेब चव्हाण (प्रा.जी.बी.नाईक,चाळीसगाव)
' आधी राखावा आचार । मग पाहावा विचार । आचार - विचार पैलपार । पाविजेतो । ' ' आधी आचार सांभाळावा व मग निर्मळ होऊन विचार पाहावा , आचार व विचार ह्या दोहोंच्या साहाय्याने भवसमुद्राचे पैलतीर गाठावे ? समर्थ रामदासांच्या श्रीदासबोधातील या श्लोकानुसार ज्यांनी आपल्या लौकीक जीवनात सतत ' सदाचरण व सुविचार ' यांची सांगड घालून चाळीसगावातील पूर्ण विकसीत ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ ' या संस्थेची स्थापना व यशस्वी जडण - घडण करून तीस उभ्या महाराष्ट्रात ' प्रतीथयश , अग्रेसर शिक्षण संस्था ' म्हणून नावलौकीक प्राप्त करुन दिला व रा.स.शि.प्र.मंडळरुपी भवसागराचे पैलतीर गाठले ते ' थोर शिक्षणमहर्षि , श्री . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त संपन्न होत असलेल्या गौरवशाली सत्कार समारंभा प्रसंगी काही कृतज्ञतापूर्ण शब्द... महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील , पुरोगामी राज्यात विविध शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून ज्यांनी शिक्षणाची मूहर्तमेढ रोवून तळागाळातील सामान्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली , त्यात अग्रभागी आहेत , हिंगणे शिक्षण संस्थेचे , कै . महर्षि अण्णासाहेब कर्वे आणि रयत शिक्षणसंस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील . ' यांच्या इतकेच तोलामोलाचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करुन या मान्यवरांच्या पंक्तीत मानाचे स्थान प्राप्त केले आहे ते , ' श्री . नानासाहेब चव्हाणांनी चाळीसगाव शहरात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणा - याअनेक शिक्षणसंस्था आज कार्यरत आहेत . या सर्वाच्या अग्रभागी ' संख्यात्मक गुणात्मक यशाचा शिरपेच ' लेवून दिमाखाने उभे आहे , ते ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ ' ३१ डिसेंबर १ ९ ५३ रोजी स्थापन झालेल्या या इवलेसे रोपाचे बथता बथता प्रचंड वटवृक्षात रूपांतर झाले . संस्थेमुळे . आज शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सुमारे १००० जणांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे . भक्कम इमारती , सुसज्ज प्रयोगशाळा , समृद्ध ग्रंथालये , वृक्षसंवर्धनाने सुशोभीत केलेली भव्य पटागंणे ही तर संस्थेची वैशिष्ट्ये , याबरोबरच संस्थेनी केलेली गुणात्मक प्रगतीही लक्षणीय आहे . संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले कितीतरी विद्यार्थी आज आपापल्या अंगीकृत व्यवसायात स्वतःच्या कर्तृत्वाने यशाच्या अत्युच्च्य शिखरावर विराजमान झालेले दृष्टोत्पत्तीस येतात .
चाळीसगावातील या शिक्षणसंस्थेचा स्थापना करून तीस आजचे पूर्ण विकसीत स्वरुप प्राप्त करून देण्यास कारणीभूत असलेली व सागरातील दिपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरलेली एकमेव व्यक्ती म्हणजे श्री . नानासाहेब उर्फ य.ना. चव्हाण ' . 'परीस ' ही एक कागकल्पना , कोणी पाहिला नाही किंवा अनुभवलाही नाही , ' परीसस्पर्श ' मात्र सर्वांना ठाऊक , परीसस्पर्श लोह होई कनक ! ' नानांच्या रूपाने रा.स.शि.प्रमंडळास ' परीस ' लाभला . " सोने झाले संस्थेचे , ' वडील कै . नारायणराव चव्हाण व आई कै . लक्ष्मीबाई यांनी नानांच्या बालमनावर सुसंस्कार केले . अध्यात्म , धार्मिकवृत्ती , गीता , गीताई , ज्ञानेश्वरी यांचे नियमित पठण हा तर त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला . थोर . स्वातंत्र्यसैनिक , समाजसुधारक चुलते , कै . हरीभाऊ चव्हाण यांचा सहवास हा तर नानांना लाभलेला परीसस्पर्शच , या त्रिमूर्तीच्या उदात्त सहजीवनाने या सुसंस्कारीत बालकाचे एका ध्येयवादी , उमद्या तरुणात रुपांतर केले .श्रमदानाची तर जन्मापासूनच साथ आणि आवड .धुळ्यात शेतकी शाळेत शिकत असतांनाची गोष्ट उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आले असतांना एके दिवशी सकाळी सर्वांनी नानांचा घरात शोध घेतला . पण ते घरात नव्हतेच तर सापडतील कसे ? शेवटी कोणीतरी म्हणालं , ' अरे शेतात जाऊन बघू ! ' आणि काय आश्चर्य , खरंच , नाना भल्या पहाटे उठून शेतातील ' घस ' व ( कापलेल्या ज्वारीच्या तोट्याचा उर्वरीत भाग ) उपटण्याचे काम एकटेच एकाग्रपणे करीत होते . आजही त्यांच्या दैनंदीन जीवनात श्रमदानास अनन्यसाधारण महत्व आहे .
' आधी केलं , मग सांगितलं ' या उक्तीनुसार स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतःच्या कातलेल्या सूतापासून विणलेले धोतर व तसाच शर्ट , पांढरी खादीची टोपी हा त्यांचा साधा पेहराव आजही नजरेत भरतो . शाळेच्या पायाभरणीचे काम असो किंवा महाविद्यालयाचे पटांगण तयार करण्याचे काम असो , नाना सतत सर्वांच्या पुढे . ' श्रमदान ' म्हटलं की जणू काही त्यांच्या अंगात वारं संचारतं . आजही पंचाहत्तरीत त्यांचा उत्साह तरुणास लाजविणारा आहे .
गेल्या ऑगस्ट महिन्यातीलच गोष्ट भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त देशात सर्वत्र विविध उपक्रम आयोजित केले गेले . नानांनी ठरवलं , ' श्रमदान व वृक्षारोपण सप्ताह ' साजरा करायचा . आम्ही २५/३० जण शिबीरात सामील झालो . पहिल्या दिवशी ' राष्ट्रीय कन्या शाळा , अंधशाळा , महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . खोदलेले खड्डे एकाच सरळ रेषेत आहेत किंवा नाहीत , दोन खड्ड्यांमध्ये सारखे अंतर आहे किंवा नाही , ह्याची स्वत : नाना ' दोरी ' लावून खात्री करून घेत . थोडेसे खत टाकल्यानंतर ' झाड लावले जायचे . पाणी घातल्यानंतर लगेचच त्यास सुरक्षिततेसाठी लाकडी पिंजरा लावला जायचा . कोठे गाजावाजा नाही . फोटो नाही कि व्हि . डी . ओ . शुटींग नाही . भाषणबाजी नाही . सारंच निराळं . दुपारी ' बौद्धिक व्हायचं . यात बहुधा अध्यात्मासंबंधी चर्चा व्हायची . असाच कार्यक्रम संपूर्ण आठवडाभर संस्थेच्या वाघळी , पातोंडा , सारवे , तळेगाव येथील शाळांमध्ये राबविण्यात आला , पूज्य साने गुरुजी , विनोबाजींच्या सहवासात राहिलेले व त्यांच्याच जीवनमुल्यांचा आपल्या दैनंदीन जीवनात पाठपुरावा करुन समाजकारण करणारं असं दुसरं व्यक्तिमत्व जिल्ह्यात इतस्त्र बघावयास मिळणार नाही .
संस्था उभारणीच्या कामात त्यांचा दूरदृष्टीकोन व भविष्यातीलनियोजन या गुणांचा क्षणोक्षणी प्रत्यय येतो . संस्थेच्या जवळजवळ सर्व शाळा , महाविद्यालयाच्या पायाभरणीपर्यंतचं काम कर्मचान्यांच्या श्रमदानानेचं केलेले . खिडक्या , दार , व्हेन्टीलेटरस , लोखमडी जाळ्या सारं काही संस्थेच्या तांत्रिक विभागातील तज्ज्ञ कर्मचारयांच्या योगदानातून साकार झालेलं . फक्त विटा , सिमेंट व लोखंड विकताचं . कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्यरित्या प्रोत्साहन देऊन त्यांच्या मदतीने संस्थेची भक्कम उभारणी करणाया नानांना त्यांच्याविषयी अपार सहानुभूती आहे . संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सुख - दुःखात प्रत्यक्षपणे सहभागी होणे , त्यांचे हितसंबंध जपणे व कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणीत त्यांना सढळ हाताने मदत करणं हे तर ते आपलं आद्यकर्तव्यच मानतात.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या कोषाध्यक्ष पदाची यशस्वी जबाबदारी नाना आजही सांभाळीत आहेत . यंदाचा ' साने गुरुजी कथामालेचा , रु . २५,००० / - रोख रक्कम , मानपत्र द स्मृतीचिन्ह यांचा समावेश असलेला अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार ' रा.स.शि.प्रसारक मंडळाला ' प्रदान करुन कथामालेने नानांचा या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला खऱ्या अर्थान गौरव केलेला आहे . त्यांच्या यशस्वी समाजकारणातील एक अत्युच्च मानबिंद म्हणून हा पुरस्कार शोभून दिसेल यात शंका नाही .
नानांचा स्वभाव काहीसा अबोल , मितभाषी , अथांग सागरासारखं मन . ऐकून सर्वांचं घेणार , पण करणार मात्र आपल्या मनातलंच . भेटीस आलेल्या प्रत्येकाचं हसून स्वागत करणं , पाणी व एखादं पेय देऊन त्याचं आदरातिथ्य करणं , त्याच्या अडीअडवाणी विचारुन त्यास योग्य ते मार्गदर्शन करणं , यामुळे तर ते सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनले आहेत .
नानाचं प्रापंचिक जीवन पूर्ण यशस्वी , समाधानी ति . सौ . सुशीलाताईंच्या रुपाने लाभलेली सुस्वभावी , आतिथ्यशील व संस्थेच्या उभारणीत आपलेही खारीच्या वाट्या एवढे योगदान देणारी प्रेमळ पत्नी , आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने नावलौकिक संपादन केलेली सुसंस्कृत , उच्चविद्याविभूषीत मुले , सुना व नातवंडे याच्या सहवासात नानाचं भावी आयुष्य सुख - समाधानाने व आनंदाने व्यतीत होवो व संस्थेची पर्यायाने समाजाची सेवा करण्यासाठी त्याना उदंड आयुरारोग्य लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना .
***

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा