मी अनुभवलेले नाना साहेब चव्हाण(श्री.केसरीनाथ पाटील,संयुक्त कार्यवाहक,अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला,मुंबई)
पू ज्य साने गुरुजींचा जन्म कोकणातील पालगड या गावी झाला . पण त्यांची कर्मभूमी मात्र खान्देशातील अमळनेर ही होती . गुरुजींच्या निधनानंतर आजही या खान्देशात त्यांच्या विचाराने प्रेरीत होऊन अनेक कार्यकर्ते काम करीत आहेत . त्यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे श्री.य. ना . तथा नानासाहेब चव्हाण हे अग्रगण्य आहेत . जनसामान्याच्या हितासाठी काम करण्याची सेवावृत्ती . अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची झुंझार वृत्ती , देशहितासाठी समर्पणाच्या भावनेने त्याग करण्याची ज्वलंत देशभक्ती , धार्मिक कार्याची आवड , एक प्रामाणिक व सचोटीचा सेवाभावी कार्यकर्ता , श्रमजीवी वर्गाशी असलेली अतूट बांधिलकी व शैक्षणिक कामाची आवड या सर्व गुणांनी बहरलेले नानासाहेब चव्हाण म्हणजे एक प्रभावी अटपैलू जीवनच म्हणावे लागेल .
साने गुरुजी कथामालेमुळे नानांचा माझा परिचय झाला . पुढे अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे वार्षिक अधिवेशन चाळीसगाव येथे फेब्रुवारी १ ९ ८३ मध्ये आयोजित करण्यात आले होते . नेहमीप्रमाणे सायंकाळी कथामाला दादर कार्यालयात मी आलो असता , कथामालेचे संस्थापक आदरणीय श्री . प्रकाशभाई मोहाडीकर कार्यालयात होते . त्यांनी मला जवळ बोलाविले व श्री . प्रकाशभाई म्हणाले , केसरीनाथ चाळीसगावच्या अधिवेशनास चार दिवस बाकी आहेत . तेव्हा तुला पूर्वतयारीसाठी आजच्या आज रात्रीच्या अमृतसर गाडीने चाळीसगावला जायचे आहे . तेथे श्री . नानासाहेब चव्हाण यांना भेटून अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने त्यांच्या व्यवस्थापन कामात मार्गदर्शन करण्याबद्दल सांगितले .
कार्यालयातून सायंकाळी घरी आल्यावर त्याच दिवशी रात्रीच्या अमृतसर गाडीने चाळीसगावला जाण्यास निघालो . माझ्याबरोबर कोणी नव्हते . परंतु श्री . प्रकाशमाई यांची प्रेरणा व पू . साने गुरुजींची पुण्याई सोबत होती . चाळीसगावला प्रथमच मी जात असल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर नानांची मुर्ति होती . पहाटे पाच दाजता चाळीसगाव येथे उतरल्यावर स्टेशनातच थोडा वेळ थांबून रहदारी सुरु झाल्यावर रिक्क्षाने नानांच्या घरी आलो . मी अचानक . आल्याचे पाहून नानांना आनंद झाला . प्रेमाने त्यांनी माझे स्वागत केले . मी आल्यामुळे नानांना बरे वाटले . सकाळी आंघोळ करुन व चहानाश्ताकरुन नानासाहेब यांच्या बरोबर अधिवेशन ज्या ठिकाणी घेण्याचे ठरले व्या ठिकाणी गेलो . तेथील शाळेचा परिसर पाहून समाधान वाटले . तेथे शाळेचे नवीन बांधकाम जोरात सुरु होते . नानासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील शिक्षण संस्थेचे शिक्षक व कार्यकर्ते अधिवेशनाच्या कामाला लागले होते . नानासाहेबांनी अधिवेशनाच्या विभागवार जागांची माहिती मला दिली . दोन दिवसांच्या मुक्कामात नानासाहेबांच्या प्रेमळ स्वभावामुळे व त्यांच्या कामाची पद्धत पाहुन मी थक्क झालो . कोणत्याही प्रकारे आरडाओरडा न करता आपल्या सहकार्याकडून शांतपणे नानासाहेब काम करुन घेत होते . नानासाहेब यांच्या बरोबर त्यांनी स्थापन केलेल्या काही संस्थांना भेटी देण्याचायोग आला . नानासाहेबांचे शैक्षणिक क्षेत्रातील प्रचंड काम पाहून मी थक्क झालो .
साने गुरुजी कथामालेचे चाळीसगावचे वार्षिक अधिवेशन यशस्वीरित्या पार पडले . याचे सर्व श्रेय नानासाहेबांना व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना द्यावे लागेल . या अधिवेशनानंतर नानासाहेबांच्या कार्याची कथामाला कार्यकर्त्यांना खरी ओळख झाली . चाळीसगावहून मुंबईला परत आल्यावर नानासाहेब यांच्याबद्दल माझ्या मनात आदराचे स्थान बनले . नानासाहेब आमच्या परिवारातील एक आहेत असे मात्र वाटू लागले .
साने गुरुजी कथामालेतर्फे किमान १००० शैक्षणिक संस्थातून " पूज्य साने गुरुजी आदर्श विद्यार्थी पुरस्काराची ' ' कार्यवाही करणे . त्यासाठी ५०० रुपये रक्कम कथामाला जमा करेल व अशा एकूण १००० / - रुपयांच्या व्याजाइतका पुरस्कार दरवर्षी त्या त्या संस्थेतील आदर्श विद्यार्थ्यांना दिला जाईल . आतापर्यंत ४६ शाळा सहभागी झाल्या आहेत . या योजनांची सर्व जबाबदारी नानासाहेब यांच्यावर सोपविण्यात आली . आज चाळीसगाव येथून नानासाहेब यांच्या यशस्वी मार्गदर्शनाने साने गुरुजी आदर्श विद्यार्थी पुरस्कार योजना राबवित आहे.
आज चाळीसगाव येथील " राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारण मंडळ" या संस्थेचे नानासाहेब हे शिल्पकार आहेत . चाळीसगावच्या = परिसरात शिक्षण प्रसाराचे कार्य करताना नानासाहेबांना अतिशय परिश्रम घ्यावे लागले . सारा परिसर ते पायी फिरत असत . आपल्या पद् यात्रेत सर्वांना प्रेमाने जवळ घेऊन ज्ञानदानाचा प्रचार व प्रसार करून त्यांनी ४६ शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत . यांच्या या सेवाभावी कार्याने नानासाहेब शिक्षण क्षेत्रातील शिल्पकार आहेत नानासाहेब चव्हाण यांचा ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी ७५ या अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव येथे संपन्न होत आहे . ही सर्व कार्यकत्यांना आनंद देणारी व विधायक कार्याची प्रेरणा देणारी घटना होय . नानासाहेबांच्या कार्यामुळे ते ७५ वर्षांचे झाले आहेत यावर कोणाचा विश्वास देखील बसणार नाही . पूज्य साने गुरुजींचा वारसा चालविणारे आदरणीय श्री . नानासाहेब चव्हाण यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यास उदंड आयुष्य लाभावे यासाठी जीवेत् शरदः शतम् !


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा