मुख्य सामग्रीवर वगळा

निश्चयाचा महामेरू नानासाहेब (श्री.विलास भिकनराव मोरे,राष्ट्रीय महाविद्यालय,चाळीसगाव)

 

    जे का रंजले गांजले । 

त्यासी म्हणे जो आपुले ॥

 तोचि साधू ओळखावा ।

 देव तेथेची जाणावा।।१ ।।

 श्री संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या या अभंगात सांगितल्याप्रमाणे दुःखी , दीन , पिडीत , गोरगरिबांना आपले म्हणून त्यांना आपलेसे करुन त्यांचे दुःख दूर करुन , त्यांना प्रेम देवून , समाजात त्यांची घडी बसवितात , सुख देतात अशा महान पुरुषांच्या ठिकाणी संतांची लक्षणे दिसतात . आणि म्हणूनच ते ऋषीतुल्य , देवतुल्य वाटतात . अशा विचारांच्या , आचारांच्या नव्हे प्रत्यक्ष कृतिशिल ऋषीतुल्य असणारे आमच्या संस्थेचे जन्मदाते नानासाहेब तथा य . ना . चव्हाण हे आपल्या जीवनातील सुखदु : खाचे , कष्टमय अशा यशस्वी तपश्चर्येचे ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत आणि म्हणूनच आज त्यांचा ७५ वा ' अमृतमहोत्सवी ' वाढदिवस साजरा करतांना आनंद द्विगुणीत होत आहे . 

  आज दिनांक ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी आदरणीय नानासाहेबांचा अमृतमहोत्सव सोहळा राष्ट्रीय महाविद्यालयाच्या भव्य , दिव्य प्रागंणावर साजरा होत आहे . शिक्षण क्षेत्रातील थोर शिक्षणमहर्षि , समाजसेवक , आदर्श विचारवंत , कर्मयोगी असलेल्या सत्पुरुषांचा होणारा हा गौरव किंवा सत्कार !

    जसे आपण सूर्यनारायणास अर्ध्य म्हणून गंगेत उभे राहून  ओंजळभर पाणी वाहतो , ते पाणी त्या प्रकाशकापर्यंत कधिच पोहचत  नाही , पोहचावं अशी अपेक्षाही नसते . परंतु आपण त्यात आपली   भावना , आपलं त्या जीवनदात्या , अंधकार नष्ट करून जीवनास प्रकाश देणारया सूर्यावरचं  प्रेम प्रकट करीत असतो  तसेच शब्दरूपी अर्घ्य मा.नानांच्या कार्यास    .

   मानवी जीवनात देखील चालताना , बोलताना , जीवनाचे व्यवहार नियंत्रीत करतांना ज्या मुलभूत अशा काही भावना आपण एकमेकांबद्दल प्रकट करतो , त्यात एखाद्या महापुरुषाने आपल्यावर केलेल्या प्रेमाची , मदतीची , सहकार्याबद्दलची आपण जेव्हा प्रेमभावना  प्रकट करतो , तीचे नाव आहे कृतज्ञता . जेथे कृतज्ञता नाही तेथे  मानवता संपते . संस्कृती संपते आणि म्हणूनच !

    ज्या नानासाहेबांनी आम्हाला खुप काही दिलं . त्यान आम्हाला ज्ञानाची कवाडे उघडी झाली , सुसंस्कृत अस जीवन प्राप्त झालं , संसार बहरले , खेडी सुधारली , ज्ञानाची गंगोत्री खेड्यापर्यत पोहोचली . हजारो - लाखोंना जीवनाची दिशा मिळाली , जीवनानाला शिस्तबध्द गती मिळाली असे अनेकांचे जीवन सुखीकरणारया ज्यांनी  खेड्यात जन्म घेवून , खेड्यातून शहरात आणि शहरातून खेड्यात सर्वांसाठी शिक्षणप्रसाराचे महान असे कार्य केले.ते सर्व विद्यार्थी , शेतकरी , सहकारी , कर्मचारी ( यांच्या वतीने ) आम्ही सर्वजण माननीय नानासाहेबांचे ऋणी आहोत .त्याचे ऋण म्हणून, च्यावरील प्रेमाची भावना म्हणून , कृतज्ञता म्हणून , आम्ही हा " अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत . हा सत्कार ! प्रेमाचा , सत्पुरुषाचा , सत्गुरुचा , सत् विचारांचा आणि माणुसकीचा सत्कार आहे .

 आपण सर्व जाणतो की , माणसाचे व्यक्तिमत्व हे अनेक बरया  वाईट अनुभवांच्या संस्कारांच्या आडव्या - उभ्या धाग्यांपासून तयार होते . जीवनात आलेल्या अनेक संघर्ष , गरीबी , कष्ट व कष्टमय चळवळी , तुरुंगवास , आर्थिक ओढाताण या सर्वांतून तावून सुलाखून निघालेल्या या व्यक्तिमत्वाचा सत्कार होतांना विशेष आनंद होत आहे . परंतु आदरणीय नानासाहेबांचा सेवाभावी स्वभाव , स्वत:चा मान - सन्मानन; न वाढविण्याचा मनाचा मोठेपणा फक्त कर्म करीत राहावे  अशी भावना त्यांचे ठिकाणी नेहमी असते . या सोहळ्याने त्यांना नक्कीच अवघडल्यासारखे होत असेल . सुख - दुःखाने भारावलेल्या त्यांच्या मनात सारखे शब्द घोळत असतील की , 

मज पामराशी काय थोरपण । 

पायीची वहाण पायी बरी ।  

  एका सर्वसामान्य गरीब , कष्टाळू प्रामाणिक , सुसंस्कृत , धार्मिक स्वभावाच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सन्माननीय नानासाहेबांची जीवनाची वाटचाल ही खरोखर काटेरी होती . परंतु तिला संस्कार , धार्मिकता , सृजनशिलता , अध्यात्मता , अशा सद्गुणांचा सुगंध होता . म्हणूनच त्यांनी उच्चशिक्षणापर्यंत मजल मारली . गरीबीच्या जीवनातले अल्पसे शैक्षणिक अनुभव मी स्वतः अनुभवले आहेत . म्हणून सांगतो की , आपला उदरनिर्वाह व शैक्षणिक खर्च स्वतः भागवून कष्ट करून शिक्षण घेणे किती कठीण गोष्ट असते . आणि तरी गुलामगिरीत , पारतंत्र्यात पूर्ण करतांना दुर्दम्य अशा ध्येयवादातून , स्वातंत्र्य चळवळीत भाग घेवून स्वत : बरोबर इतरांच्या विकासासाठी समर्थांच्या विचारांप्रमाणे बाहेर पडण्यासाठी , वैचारिक व सामाजिक  क्रांतीसाठी " सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जे करील तयांचे'   या मंत्राचा अंगिकार करुन समाज परिवर्तनासाठी व प्रबोधनासाठी शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाटी वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी नोकरी , प्रपंच सांभाळून नानासाहेबांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . ' ची डिसेंबर १ ९ ५३ मध्ये स्थापना केली आणि हा ! हा ! म्हणता त्या वसतीगृह बी रूपी रोपटाचे , आज विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे . हजारो विद्यार्थी , त्यात ज्ञान घेत आहेत . सुंदर , भव्य इमारती ज्या श्रमतागातूवन , आत्मियतेतून उभारल्या गेल्या त्या ज्ञानाची मंदिर बनून डौलाने उभ्या आहेत .      पुष्कळदा आपण असं बघतो की , समाजसेवक , राजकारणी विचारवंत हे बोलण्यात आणि कृतीत भिन्न असतात . परंतू  याला मात्र आमचे नानासाहेब पूर्ण आपवाद आहेत . कारण ते कृतीत आणि वागण्यात एकच आहेत . याचे खरे प्रत्यंतर म्हणजे त्यांच्या विश्वासपूर्वक आणि तळमळीने , आत्मियतेने वागण्यात्या वृत्ती मुळे आज ते संस्थेच्या स्थापनेपासून ते आजमितीपर्यंत  सतत प्रमुख पदाधिकारी म्हणून राहीले आहेत. त्यांच्या सहकार्यांनी त्याचार पूर्ण विश्वास टाकलेला आहे . व त्यामुळे ते अजात शत्रु बनलेले आहेत . म्हणून अशा थोर समाज सेवकास त्यांच्या कार्यात शाक्ति ,सामर्थ्य , दीर्घायुष्य आयुरारोग्य मिळो अशी परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना  ! असे सर्वगुणसंपत्र , विचारवंत , तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते उत्तर प्रशासक , शिक्षणमहर्षी थोर संताला त्यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार प्रसंगी अत्यंत नम्रपणे अभिवादन करताना , नकळत ओटावर शब्द ओघळतात , " दिव्यत्वाची जेथे प्रचिती ! तो कर माझे जुळती ।!!

       ***

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...