मुख्य सामग्रीवर वगळा

गौरव नव्हे सौरभ ग्रंथ( प्रकाशभाई मोहाडीकर,संस्थापक,"अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला,मुबंई)

 कर्मवीर नानांच्याअसंख्य सदगुणी  चाहत्यांनो आणि भगिनींनो,
  सात जानेवारी हा आपल्या नानांचा जन्मदिन.पाहता पाहता सात दशक अधिक पाच वर्षे कशी धावत गेली पत्ताच लागला नाही.कोणी सांगे पहा ना याला मी पाळण्यात पहुडतानां पाहिले, कोणी म्हणे शाळेत लगबगीने दौडताना न्याहळले,कोणी पुसे हाच का तो यशवंता.अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत देत एवढ्या मोठ्या पदाला पोहोचला तर असंख्य साधी भोळी,भोळी भाबडी ,रानावनात भटकणारे ,अन्नाविना तडफडणारी बालके डोळ्यात आसवे दाटून हात जोडून म्हणतील," हा आमचा मायबाप" यांनीच आम्हाला बोटे धरून मायाने आणलं, शिकवलं ,वाढवलं मानाने जगण्याचा मार्ग दाखविला.आम्ही आमच्या या मायबापाला कसं विसरू?
 ती पाहा' घर घर में दिवाली है ,मेरे घर में अंधेरे'अशा अवस्थेतली अंध बालके एका व्रतधारी खादीतल्या  माणसाच्या अंगाला स्पर्श करताच 'आमचे नाना -नाना आमचे'असे नुसत्या स्पशाने ओळखुन  त्यांच्या सहवासाचा आनंद व्यक्त करतील व मनी म्हणतील 'यांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं ,आम्हाला ज्ञानाचा प्रकाश दिला स्वाभिमान शिकवला जोहार मायबाप जोहार'
        त्यांच्या अवतीभवती सातत्याने बागडणारी शिक्षक ,कार्यकर्ते ,संचालक आदी बडी बडी वडीलधारी मंडळी म्हणतील,' यांची किमया आगाध आहे, हा खरा कर्मवीर आहे ,बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीने आम्हाला मार्ग दाखवीतो,अत्यंत
निगर्वी परंतु तितका निग्रही व आग्रही असल्याने कामाचा प्रचंड डोंगर उपसतो व आमलातही आणतो.आम्ही प्रथम भांबावतो,अशक्य अशक्य अशा शंका व्यक्त करतो परंतु या सर्व संकल्पना प्रत्यक्षात अवतरलेल्या पाहताच विनम्रपणे त्याच्यातल्या शिल्पकाराला अभिवादन करतो.'
  असे विविध पैलूनीं साकारलेले तरीही अपुरे असलेले असे नानांचे,त्यांच्या जीवन कार्याचे,त्यांच्या स्वप्न पूर्तीचे,त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचे ओझरते दर्शन त्यांच्याअमृतमहोत्सवी गौरव समारंभाप्रित्यर्थ प्रकाशित होणारया या गौरवग्रथांत आपणास पाहावयास मिळेल.
      या गौरवग्रथांस प्रस्तावना लिहावी अशी माझ्या शिक्षक मित्रांनी मला विनंती केली.नानांचे व माझे शतजन्मीचे नाते असावे अशीच त्यांची धारणा असल्याने त्यांनी मला ही गळ घातली.मला तर माझा हा बहुमान वाटला.परंतु मित्रांनो,मी त्याला पात्र नाही असे मला सारखे वाटायचे.कोठे यशवंतनाना आणि कोठे मी!त्यांची ती विनम्र वृत्ती,तो निगर्वी स्वभाव,तो करारी बाणा,प्रसिध्दी पराडमुखता,सतत कामाचा ध्यास व त्यासाठी झपाटून पाठलाग करण्याची प्रवृत्ती पाहून खरया अर्थाने' दिव्यत्वाची जेथे प्रचीति तेथे कर माझे जुळती' हीच माझ्या मनीचा भावना झाली आणि माझ्या ह्रदयीच्या तळमळीतून वयाने माझा पाठलाग करणारया नानांना शुभेच्छा चिंतित त्यांनी ज्या ज्या संकल्पना मनातील खोल कप्प्यात अंकुरल्या असतील त्या त्या सर्व पुलकीत व्हाव्यात व त्या विस्तारलेल्या कार्यशाखेच्या शीतल छायेत असंख्य पांथस्थांना निर्मळ कार्य करण्याची पिढ्यान पिढ्या प्रेरणा मिळत राहावी हीच सद्भावना व्यक्त करतो.                                                हा गौरव ग्रथं नसून सौरभ ग्रंथ आहे.याला नांनाचा मंगल विचार ,आचार आणि अनेकांच्या प्रचाराचा सुगंध लाभला असल्याने असा सौरभ ग्रंथ सर्वांना हवाहवासा वाटावा, त्यातून प्रत्येक लेख व प्रसंग प्रेरणादायी ठरावे व या सौरभाचा सुगंध सतत दरवळत राहावा हीच या शब्दसुमनांच्या द्वारे नानांच्या कार्यरत चरणी अर्पण करून 'जीवेत शरद:शतम्' अशी प्रभुचरणी प्रार्थना करून माझ्या लेखणीला आराम देतो.जयहिंद!
                                       प्रकाशभाई मोहाडीकर
                                        संस्थापक
                                      अखिल भारतीय साने गुरूजी
                                       कथामाला,मुंबई   
                   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...