आज देशात एक प्रकारची अस्थिरता दृश्यमान होत आहे. राजकीय व सामाजिक जीवनात प्रचंड उलथापालथ होत असल्याने देशाचे भवितव्य अंधकाराच्या गर्तेत सापडल्यासारखे दिसत आहे. अशा परिस्थितीतही सामाजिक बांधिलकीने, वैचारिक निष्ठेने व अथक कर्तृत्वाने ,परिश्रमाने पाय रोवून खंबीरपणे कार्यरत असलेले अनेक थोर पुरुष आढळतात.आशांमध्ये चाळीसगावचे श्री. यशवंत नारायणराव उर्फ नानासाहेब चव्हाण यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल. वयाच्या पंचात्तरीतही युवकांना लाजवेल असे काम ते जिद्दीने व नीरपेक्ष भावनेने करीत आहेत.गेली पन्नास वर्षे जळगाव जिल्ह्यात विशेषता चाळीसगाव, भडगाव ,पाचोरा या तालुक्यातून विद्यालये ,महाविद्यालये, आश्रमशाळा ,अंधशाळा इत्यादी समाजाभिमुख उपक्रमांद्वारे ज्ञानप्रसार करणारी 'राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमीटेड चाळीसगाव' ही संस्था नानासाहेबांच्या कर्तृत्वाचे साक्षात प्रतीक होय. कुठल्याही सत्ता लोभाला ,प्रसिद्धीचा हव्यासाला व वैयक्तिक लोभाला वश न होता नंदादीपाप्रमाणे शांतपणे तेवत राहणे हे नानानसाहेबांचे स्वभाव वैशिॆष्टयच होय. या स्वभावा मुळ...