मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्री. नानासाहेब य.ना.चव्हाण जीवन व कार्यपरिचय(श्री.यशवंत बळवंत क्षीरसागर,संपादक,'बालविकास',मुबंई)1

  आई वडिलांच्या ममतेने नानासाहेबांवर सतत प्रेम करणारी व त्यांच्या जीवनाला सार्वजनिक कार्यासाठी प्रेरणा देणारी थोर व्यक्ती म्हणून त्यांचे चुलते कै.हरिभाऊ चव्हाण यांचा निर्देश करावा लागेल.हे कट्टर गांधीवादी व विनोबावादी विधायक कार्यकर्ते होते.गांधीजींच्या आदेशानुसार ग्रामीण भागातून ते स्वदेशी प्रचार ,सामाजिक विषमते विरूध्द वैचारीक जागृती करित.ऋषितुल्य,त्यागमय,सेवाभावी जीवन व्यतीत करीत.भारतीय स्वातंत्र्या साठी लढणारया काँग्रेसचे ते निष्ठावान पाईक होते.1936 साली फैजपूर येथे भरलेल्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनात त्यांनी स्वयंसेवी वृत्तीने खुप कामही केले होते.श्री. नानासाहेबांच्या जीवनात आज आढळणारी राष्ट्रीयवृत्ती,देशप्रेम ,सेवाभाव,स्वावलंबन,साधी व शुद्ध राहणी ही कै.हरिभाऊच्या जीवनातून त्यांना मिळालेली सदगुण संपत्तीच होय.          रांजणगाव येथे प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवतांना छोट्या नानासाहेबांच्या जीवनावर दोन बहुमोल संस्कार घडले.आई-वडिलांना मदत म्हणून केलेल्या शेती व्यवसायामुळे त्यांच्या जीवनात श्रम-प्रतिष्ठेचे बीज पेरले गेले. तसेच शाळेभोवतालच्या  स...